महाराष्ट्र

लाडक्या बहिणींचं लक्ष; सांग सांग भोलानाथ दादा पुन्हा पावणार का?

राज्याच्या अर्थसंकल्पात Ajit Pawar देणार कोणतं गिफ्ट

Post View : 52

Author

‘एकच वादा अजितदादा’ ही घोषणा अजित पवारांचे चाहते नेहमीच देत असतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी दादांनी जादुई काडी फिरवली. लाडकी बहीण योजना आणली. दादांची ही जादू अशी काही चालली की, महायुतीला ‘छप्पर फाडके’ बहुमत मिळालं. महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील बहिणींनी चांगलीच धोबीपछाड दिली. या ‘सुपरडुपर हिट’ योजनेनंतर तर अजितदादा ‘सब पर छा गए’ असं झालं.

दादांचा ‘लुक’च बदलला. दादा अन् त्यांचा पक्ष ‘गुलाबी जॅकेट अन् यश भरमार’ असा उदयास आला. दादा पुन्हा येत आहेत. त्यांच्या  हातात एक बॅग असेल. त्या बॅगमध्ये राज्यासाठी असलेल्या नव्या योजनांची, घोषणांची यादीच असेल. एकापाठोपाठ दादा घोषणा करीत जातील अन् महाराष्ट्राला नवं काही तरी देतील. या घोषणा असतील अर्थसंकल्पीय अधिवेशनातील. राज्यासाठी असलेल्या अर्थसंकल्पाचा मुहूर्त केव्हा असेल हे दादांनी आता सांगितलं आहे. लवकरच महाशिवारात्रीचा उत्सव साजरा होणार आहे. अशात राज्यातील लाडक्या बहिणी महादेवाकडं एकच मागणं मागत आहे की देवा लाडक्या बहिण योजनेचे 2 हजार 100 रुपये मिळू दे. त्यांची संध्या एकच प्रार्थना सुरू आहे. सांग सांग भोलानाथ दादा पुन्हा पावणार का? योजनेतील घोळ संपून नवी रक्कम मिळणार का?

मुख्यमंत्री Devendra Fadnavis म्हणाले, यंदाच बजेट मध्यमवर्गीयांसाठी  स्वप्नपूर्तीचं

 

अर्थसंकल्पातून नव्या आशा 

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आता राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे महत्त्वपूर्ण घोषणा केली की महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सादर केला जाईल. हा अर्थसंकल्प केवळ आकडेवारीचा दस्तऐवज नसून नव्या आशा पेरणारा आर्थिक संजीवनी ठरणार आहे. 

Shiv Sena UBT: पक्षाला लागलेल्या गळतीला थांबवण्यासाठी निर्णायक पाऊल

बळीराजासाठी क्रांतिकारी योजनांची आखणी केली जात असून कर्जमाफी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पीक विमासाठी विशेष पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या हातात संपन्नतेचा सुवर्णकाळ आणण्याचा सरकारचा निर्धार आहे. महिलांसाठी सक्षमीकरणाच्या दिशा ठरवण्यासाठी स्वयंपूर्ण महिला गटांना प्रोत्साहन देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.तरुणांसाठी रोजगारनिर्मितीच्या संधींचा महामार्ग खुला करण्याचे संकेत पवार यांनी दिले आहेत. बारामतीला पुण्याच्या धर्तीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित रोजगार केंद्र बनवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. आता होळीच्या आधी अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणात आणि अर्थव्यवस्थेत कोणते नवीन रंग भरतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या भविष्याचा ‘ब्लूप्रिंट’ तयार होणार हे निश्चित! त्यामुळं राज्याच्या अर्थसंकल्पाकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!