सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावातील बेकायदेशीर मुरूम उत्खनन प्रकरणात अजित पवारांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवरून कारवाई थांबवण्याचे तंबी दिले. मात्र हा वाद अद्यापही शांत झालेला दिसत नाही.
महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा जल्लोष सर्वत्र पसरलेला असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावात बेकायदेशीर मुरूम उत्खननाचा प्रकार उघडकीस आला आणि त्यावर कारवाईसाठी धडकलेल्या प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना चक्क अजित पवारांनी फोनवरून तंबी दिली. हे प्रकरण इतके चिघळले की, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली.
सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे, ज्या तालुका अध्यक्षासाठी दादांनी हा सगळा राडा केला, तोच बाबा जगताप आता चिलम फुंकताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कुर्डू गावात मुरूम उत्खननाच्या तक्रारीवरून अंजना कृष्णा यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तिथे गावकऱ्यांशी शाब्दिक चकमक सुरू असताना, राष्ट्रवादीच्या बाबा जगताप याने थेट अजित पवारांना फोन लावला आणि अंजनाच्या हातात फोन दिला. ‘मी डीसीएम अजित पवार बोलतोय, कारवाई थांबवा’ असा दम दादांनी भरला. पण अंजना कृष्णा यांनीही मागे हटायचे नाव घेतले नाही.
Amol Mitkari : आधी चौकशीचा डोस, मग माफीनाम्याचा स्मूद यूटर्न
राजकीय वाद वाढला
‘माझ्या फोनवर कॉल करा,’ असं त्यांनी ठणकावलं. यावर दादांचा पारा चढला आणि ‘तुझी इतकी हिंमत? मी तुझ्यावर अॅक्शन घेईन’ असा इशारा देत त्यांनी व्हिडीओ कॉलवर चेहरा दाखवला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात टिपला गेला आणि सोशल मीडियावर याचा धमाका झाला. आता दादांच्या या ‘पॉवरफुल’ दमबाजीवर टीकेची झोड उठली आहे.पण हा ड्रामा इथेच थांबला नाही. ज्या बाबा जगतापसाठी अजित पवारांनी आयपीएस अधिकाऱ्याला खडसावले, तोच बाबा आता पंढरपूरात चिलम फुंकताना व्हिडीओत सापडला आहे.
धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपासून ते विरोधकांपर्यंत सगळ्यांचे डोळे विस्फारले. यापूर्वीही बाबा अवैध मुरूम उत्खनन, सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यांना धमकावण्याच्या प्रकरणांमुळे चर्चेत होते. आता त्याच्या या ‘नशिल्या’ कृत्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे. ज्याच्यासाठी दादांनी इतका रिस्क घेतला, तोच आता चिलम फुंकतोय? असा सवाल उपस्थित होत आहे. या सगळ्या प्रकरणाने अजित पवारांच्या अडचणींत भर पडली आहे.
एकीकडे आयएएस महिला अधिकारीच मुद्दा तापला असताना, दुसरीकडे बाबा जगतापचा नवा कारनामा यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. कुर्डू गावातील नागरिक आणि अंजना कृष्णा यांच्यातील शाब्दिक जुगलबंदी, अजित पवारांचा धमकीचा फोन आणि आता बाबा जगतापचा चिलम व्हिडीओ हे सगळं म्हणजे राजकीय नाट्याचा परिपूर्ण मसाला. सोशल मीडियावर या प्रकरणावरून टीकांचा पाऊस पडतोय. ‘दादा, आता काय?’ असा प्रश्न विरोधकांसह सामान्य जनतेलाही पडला आहे.
