प्रशासन

Akola Eid Celebration : शांतता भंग करणाऱ्यांवर पोलिसांची तीक्ष्ण नजर 

Riot Fear : ईदच्या मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम एकतेचा प्रयत्न

Post View : 33

Author

अकोला हे शहर सुरुवातीपासूनच दंगलीचे शहर म्हणून चर्चेत राहिले आहे. येथे अनेकदा दंगली व जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.

अकोला शहर, जे पूर्वी दंगलीच्या आगीत होरपळलेले होते. आता हळूहळू शांततेच्या मार्गावर वाटचाल करीत आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीत एक अनपेक्षित वळण आले. ज्याने शहराच्या जुन्या जखमांना पुन्हा उकरून काढले. शहरातील हिंदू आणि मुस्लिम समाजाने एकत्र येऊन सौहार्दाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ईद-ए-मिलादची मिरवणूक तीन दिवस पुढे ढकलण्यात आली होती. जेणेकरून दोन्ही समाज एकमेकांच्या उत्सवांचा आदर करू शकतील.

अकोला, जे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते, येथे अशा छोट्या छोट्या कृतींमधून एकात्मतेचे बीज रोवले जात होते. मंगळवारी (9 सप्टेंबर 2025 रोजी) निघालेल्या मिरवणुकीत टिळक रोडवरील कापड बाजार चौकात एक विचित्र दृश्य घडले. काही युवकांनी ‘तानाजी’ चित्रपटातील औरंगजेबाच्या पोस्टरला दुधाने अभिषेक घातला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरला आणि शहरात एक नवे वादळ उठले. व्हिडीओत हे युवक औरंगजेबाच्या फोटोसह मिरवणुकीत नाचताना दिसत आहेत.

Sudhir Mungantiwar : गोंडवाना विद्यापीठ उपकेंद्राच्या स्थापनेला वेग

अकोला पोलिसांची कारवाई

हरिहर पेठ, शीतला माता मंदिर चौकासारख्या भागांत अशी पोस्टर्स दिसून आली आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, तपास सुरू आहे. 9 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेत आठ ते दहा व्यक्ती औरंगजेब इब्राहिम गाझीच्या पोस्टरवर जलाभिषेक करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओने शहरात चर्चेचे वातावरण निर्माण केले आहे. पोलिसांनी फिर्यादीच्या अहवालावरून गुन्हा नोंदवला असून, शहरातील शांतता अबाधित राहावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या 8 ते 10 अनोळखी इसमांविरुद्ध पोलीसांनी त्वरित कारवाई केली आहे. या घटनेमुळे जिल्हाधिकारी यांच्याद्वारे जारी केलेल्या आदेशांचे उल्लंघन झाले असून, यांची लेखी तक्रार देण्यात आली आहे. घटनेमुळे शहरातील शांतता आणि धार्मिक सलोखा धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेत सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अकोल्याची ओळख दंगलीचे शहर म्हणून आहे. पण गेल्या काही वर्षांत शहर विकासाच्या दिशेने पावले टाकत आहे.

शहरातील शांतता टिकवण्यासाठी पोलीस सातत्याने कार्यरत आहेत. या सर्व धामधुमीत पोलीसांनी आपली दक्षता जपत सीसीटीव्ही आणि इतर कॅमेऱ्यांमधून सर्व फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. अकोला शहरात शांतता नांदावी आणि सामाजिक सलोखा टिकावा यासाठी पोलीस प्रशासन सतत तत्पर राहिलेले आहे.

Nandu Rahangdale : साहेबांच्या कट्टर समर्थकाने दादांची घड्याळ बांधली

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!