महाराष्ट्रात सध्या सर्वत्र गणेशोत्सव सुरू आहे. उत्सवाच्या रंगात रमलेल्या लोकांसाठी पोलिसांना वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मोठ्या मेहनतीने काम करावे लागत आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम सध्या जोरात सुरू आहे. गल्लीबोळांपासून ते घराघरांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले आहे. ढोल-ताशांचा नाद, रंगीबेरंगी सजावट आणि भक्तांच्या उल्हासाने वातावरण भरले आहे. प्रत्येकजण बाप्पाच्या चरणी रिद्धी-सिद्धीची प्रार्थना करताना दिसतो. पण या सणाच्या उत्साहात खरा विघ्नहर्ता ठरतोय तो म्हणजे महाराष्ट्र पोलीस. वाहतुकीचे नियमन, सुरक्षेची खबरदारी आणि उत्सवातील शांतता अबाधित ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांवर आहे. गणेशोत्सवात लाखो भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी रस्त्यावर उतरतात.
अशा वेळी वाहतूक कोंडी होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि प्रत्येकजण सुरक्षितपणे उत्सवाचा आनंद लुटू शकेल, यासाठी पोलीस रात्रंदिवस झटत असतात. पण यंदा अकोल्यात या जबाबदारीला एका अनोख्या आनंदाची जोड मिळाली आहे. कारण, स्वतः पोलीस अधीक्षक आर्चित चांडक यांनी ढोलाच्या तालावर ठेका धरत बाप्पाच्या भक्तीत रंगले आहे. अकोला शहराने गेल्या काही काळात दंगली आणि राजकीय अस्थिरतेचा अनुभव घेतला होता. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात कोणताही विघ्न येऊ नये, यासाठी आर्चित चांडक यांनी कंबर कसली आहे. त्यांनी आपल्या पोलीस यंत्रणेला सज्ज ठेवले आहे.
Nagpur Solar Blast : दोन दिवसांत कारवाई नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव
व्हायरल व्हिडीओ
वाहतूक नियंत्रण, मिरवणुकींची सुरक्षा आणि नागरिकांचे संरक्षण यासाठी त्यांनी अचूक नियोजन केले आहे. पण या सगळ्या धावपळीतही त्यांनी गणेशोत्सवाचा आनंद उपभोगण्याची संधी सोडली नाही. अकोल्यातील एका गणेश मंडळाला भेट देताना, ढोल-ताशांच्या गजरात आर्चित चांडक यांनी स्वतः ढोल हातात घेतला आणि बाप्पासाठी ताल धरला. त्यांच्यासोबत भाजप नेते रामप्रकाश मिश्रा यांनीही ढोल वाजवत उत्सवात सहभाग घेतला. हा क्षण इतका मनोरंजक आणि प्रेरणादायी होता की, त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. आर्चित चांडक यांनी केवळ कर्तव्यच पार पाडले नाही, तर खाकी वर्दीला एक मानवी चेहरा दिला.
चांडक यांनी दाखवून दिले की, जबाबदारी आणि आनंद यांचा सुंदर मेळ घालता येऊ शकतो. त्यांच्या या कृतीने अकोल्यातील नागरिकांचे मन जिंकले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या ढोल वाजवण्याच्या व्हिडीओला मिळणारी पसंती आणि कौतुक यावरूनच त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना येते. गणेशोत्सवाच्या या रंगतदार वातावरणात आर्चित चांडक यांनी केवळ उत्सवाचा आनंदच लुटला नाही, तर पुढील काळात येणाऱ्या सणांसाठीही तयारी केली आहे. गणेशोत्सवानंतर अकोल्यात ईदची मोठी मिरवणूक निघणार आहे. या सणासाठीही त्यांनी आपल्या टीमसह सुरक्षेची भक्कम तयारी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अकोला पोलीस यंत्रणा सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि आनंदी वातावरण देण्यासाठी सज्ज आहे.
Parinay Fuke : शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी सातव्या हप्त्याचा मार्ग मोकळा