महाराष्ट्र

Anil Deshmukh : बळीराजाच्या मरणावर मंत्र्यांचा पत्त्यांचा उत्सव 

Manikrao Kokate : देशमुख यांची सत्ता विचारसरणीवर बोचरी टीका

Post View : 27

Author

सभागृहात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे रम्मी खेळत असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर राज्यातील राजकारण पेटलं आहे. या प्रकारावर आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट हल्लाबोल करत सरकारच्या संवेदनाशून्यतेवर जळजळीत टीका केली आहे.

जमिनीवर शेतकरी गडगडतोय आणि सभागृहात मंत्री रम्मी खेळतोय. अनिल देशमुखांचा स्फोटक सवाल सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही आणि दुसरीकडे राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या संवेदनशून्य वागणुकीने जनतेचा संताप उफाळून आला आहे. शेतकऱ्यांची शोकांतिका सुरू असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ‘रम्मी’च्या खेळाने राजकारणाचा पट पूर्णपणे उलटून गेला आहे. आता या रमीकांडावरून माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेते अनिल देशमुख यांनी संतापाचा भडिमार करत, थेट कृषिमंत्र्यांच्या वर्तनावर घणाघाती हल्ला चढवला आहे.

अनिल देशमुख म्हणाले, दररोज सरासरी 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत. दुष्काळ, नापिकी, कर्जाचा बोजा, बाजारभाव कोसळलेले आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री रम्मी खेळतात? ही बाब केवळ धक्कादायक नाही, तर बेशरम आहे. ते म्हणाले, “राज्यातील बळीराजाची अवस्था अत्यंत बिकट आहे, आणि ज्यांच्या खांद्यावर त्याच्या जीवनाचा भार आहे ते मंत्री… रम्मीच्या पत्त्यांवर मश्गुल? हे सरकार मातीच्या घामाचा आदर करत नाही, असा संतप्त सवालही देशमुखांनी सभागृहाच्या वर्तनावर केला.

प्रत्येक दिवस वेदनेत 

त्यांनी आणखी गंभीर बाब उघड करत सांगितले की, शेतकऱ्यांसाठीच्या अनेक योजना दीड वर्षांपासून रखडल्या आहेत, त्यांचे पैसे अडवले गेले आहेत. सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचा प्रत्येक दिवस भीती आणि वेदनेमध्ये जातोय. पण सत्ता मात्र मजेत रमीचा डाव मांडतेय.आम्ही इतकी वर्षे अधिवेशनात होतो, पण सभागृहात ‘जंगली रमी’ खेळणारे मंत्री पहिल्यांदाच पाहिले! असा खोचक टोला त्यांनी लगावत कोकाटेंच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उभं केलं.

शेतकऱ्याच्या आत्महत्यांमागे केवळ निसर्ग नाही, तर सरकारची बेफिकिरी आणि व्यवस्थेची कुचकामी मानसिकताही कारणीभूत आहे, असा अप्रत्यक्ष इशाराही देशमुखांनी दिला. शासनाने संवेदना गमावल्या आहेत का? शेतकऱ्याचं दुःख, त्याचा अश्रू, त्याचं मरण… यावर सत्ताधाऱ्यांचा पत्त्यांचा खेळ चालू आहे. हे महाराष्ट्र आहे, इथं माती बोलते आणि ती माती आज ओरडतेय, असा जळजळीत शाब्दिक बाण देशमुखांनी सोडला. अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन करत म्हटले की, ही सगळी नौटंकी थांबवा. शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ थांबवा. कोकाटे यांचा तातडीने राजीनामा घ्या, नाहीतर महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास तुम्हाला माफ करणार नाही.

Vijay Wadettiwar : शेतकरी फासावर अन् कृषीमंत्री पत्त्यांच्या डावावर

विरोधकांनी धरले धारेवर

या प्रकरणावर विरोधकांचा आक्रमक सूर अधिक तीव्र होत चालला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले, शेतकरी मेल्यावर ‘रम्मी’ खेळणं ही केवळ असंवेदनशीलता नाही, तर शेतकऱ्यांच्या आत्म्यालाही ठेच देणं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी कोकाटेंवर थेट वार करत म्हटलं, मंत्रिपद नावालाच आहे, काम काहीच नाही, म्हणून रम्मी खेळतात. हे सरकार म्हणजे ‘तुमचं तुम्ही बघा’ हे एकमेव धोरण.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!