महाराष्ट्र

Anil Deshmukh : राजकीय दबावामुळे पोलिसांचा खोटा अहवाल?

Political Drama : मुख्यमंत्री फडणवीसांवर अनिल देशमुखांचा पलटवार

Post View : 16

Author

महाराष्ट्राच्या राजकारणात अनिल देशमुख हल्ला प्रकरणाने नव्या वादळाला तोंड फोडले आहे. एकीकडे देशमुखांनी फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे हल्ला खरा असल्याचा दावा केला, तर दुसरीकडे पोलिसांनी तोच प्रकार बनावट ठरवला आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर पुन्हा एकदा नवा ड्रामा रंगला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित दगडफेक प्रकरणाने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खळबळ माजवली आहे. एकीकडे देशमुख यांनी फॉरेन्सिक अहवालाच्या बळावर हल्ल्याचा दावा पक्का केला आहे. दुसरीकडे पोलिसांनी हा सारा प्रकार बनावट ठरवून खळबळ उडवली आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात आगडोंब उसळला असून, सत्य काय आणि खोटं काय, याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर आणि पोलिसांवर गंभीर आरोपांचा मारा केला. तर सत्ताधारी गटाने याला निवडणुकीचा डावपेच म्हणून हिणवले आहे.

नरखेड ते काटोल दरम्यान 19 नोव्हेंबर 2024 रोजी देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा दावा त्यांनी केला. या घटनेत त्यांच्या कपाळाला गंभीर जखम झाली आणि रुग्णालयात दाखल व्हावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावर तीव्र निदर्शने करत राजकीय वातावरण तापवले. मात्र, नागपूर ग्रामीण पोलिसांनी सत्र न्यायालयात सादर केलेल्या ‘बी फायनल’ अहवालाने सगळ्याच दाव्यांना छेद दिला. पोलिसांचा ठाम दावा आहे की, हा हल्ला बनावट असून, फॉरेन्सिक तपासात कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. या प्रकरणाने आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा ज्वालामुखी उसळला आहे.

Akash Fundkar : राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळांचा आढावा

फॉरेन्सिक अहवाल

देशमुख यांनी पत्रकार परिषदेत फॉरेन्सिक अहवालाचे निष्कर्ष सविस्तर मांडले. त्यांच्या मते, अहवालात स्पष्ट उल्लेख आहे की, गाडीवर लहान दगडांसह 10 किलो वजनाचा मोठा दगड फेकण्यात आला. ज्यामुळे गाडीची काच तडकली आणि त्यांच्या डोक्याला जखम झाली. रस्त्यावरील वळणामुळे गाडीचा वेग कमी होता. तेव्हाच हा हल्ला घडल्याचा त्यांचा दावा आहे. याउलट, पोलिसांनी अहवालात नमूद केले की, दगड जर खरोखर फेकला गेला असता, तर तो गाडीच्या मधल्या किंवा मागच्या भागावर पडला असता, पण प्रत्यक्षात तो पुढच्या सीटवर आढळला. यामुळे पोलिसांनी हा हल्ला बनावट असल्याचा निष्कर्ष काढला.

Amravati BJP : ‘शिकवे मिटे, भारतीय घर लौटे’

देशमुख यांनी पोलिसांवर राजकीय दबावाचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी थेट सत्ताधारी नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत, त्यांनी या प्रकरणाला ‘सलीम-जावेदची स्टोरी’ म्हणून हिणवल्याचा उल्लेख केला. देशमुख यांनी फॉरेन्सिक अहवाल जनतेसमोर आणण्याचे आश्वासन दिले आहे. यातून सत्य उघड होईल, असा दावा केला आहे. दुसरीकडे, सत्ताधारी गटाने या प्रकरणाला निवडणुकीत सहानुभूती मिळवण्याचा डाव म्हणून हास्यास्पद ठरवले. या वादाच्या केंद्रस्थानी असलेला फॉरेन्सिक अहवाल आता राजकीय रणधुमाळीचा नवा इंधन ठरला आहे. ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे तर्कट आणि कटकारस्थानांचे जाळे विणले जाण्याची शक्यता आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!