महाराष्ट्र

महापालिका निवडणुकीआधी Uddhav Thackeray गटाची गळती

मातोश्रीतून 500 कार्यकर्ते Eknath Shinde यांच्या गटात

Post View : 25

Author

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तब्बल 500 कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा गट सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गोटात हलचालींना वेग आला आहे. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी ही वेळ कठीण ठरत आहे. गेल्या काही दिवसांत ठाकरेंच्या गटात सुरू असलेल्या अंतर्गत नाराजीचे चटके आता थेट पक्ष गळतीमध्ये रुपांतरीत झाले आहेत. आणखी 500 कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा गट सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र या बैठकीतून नाराजीचा सूर उमटत असल्याचे स्पष्ट झाले होते. अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटनेबद्दल तक्रारी नोंदवल्या होत्या, आणि या तक्रारींचा आता प्रत्यक्ष परिणाम पाहायला मिळत आहे. राऊत यांचा दौरा संपताच कार्यकर्त्यांनी शिंदे गटाचा मार्ग पत्करला.

विदर्भातील शेतकरी ठरले Mahayuti सरकारच्या उदासीनतेचे बळी

गळतीचा काळ

गेल्या दोन महिन्यांपासून ठाकरे गटाला गळतीचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी पाच माजी नगरसेवकांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता आणखी एक मोठा फटका बसला आहे. आज तब्बल 400 ते 500 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. यामुळे ठाकरे गटासाठी आगामी महापालिका निवडणुकीत आव्हाने आणखी वाढली आहेत.

मुंबईतील बाळासाहेब भवन येथे हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि मंत्री भरत गोगावले उपस्थित होते. या सोहळ्यानंतर 31 जानेवारी रोजी पुरंदर येथे होणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या सभेत काही माजी नगरसेवक देखील प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

वडिलांच्या हत्या प्रकरणावरून Zeeshan Siqqique यांचा मोठा दावा 

संजय राऊत चिडले

संजय राऊत यांच्या पुण्यातील दौऱ्यांनंतर पदाधिकाऱ्यांची गळती होत असल्यामुळे राजकीय वर्तुळात या दौऱ्यांची चर्चा जोरात सुरू आहे. पहिल्या दौऱ्यानंतर पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता दुसऱ्या दौऱ्यानंतर तब्बल 500 कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. ही गळती पक्षाच्या संघटनेच्या ढासळत्या परिस्थितीचे प्रतीक मानली जात आहे.

महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय पक्ष मोर्चेबांधणीसाठी कंबर कसत आहेत. मात्र ठाकरे गटासाठी कार्यकर्त्यांच्या या सातत्यपूर्ण गळतीमुळे निवडणुकीत मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. शिंदे गट आणि भाजपमधील वाढत्या शक्तीप्रदर्शनामुळे ठाकरेंच्या गटाचे महापालिकेतल्या स्थानावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्या दौऱ्यानंतर येणाऱ्या तक्रारी आणि नाराजीवरून पक्षसंघटनेत मोठ्या बदलांची गरज स्पष्ट होत आहे. स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवले नाहीत तर आगामी निवडणुकीत पक्षासाठी परिस्थिती आणखी कठीण होईल.

शिंदे गटाचा ‘मास्टरस्ट्रोक’?

शिवसेनेतून शिवसेनेत मोठ्या प्रमाणावरील पक्षप्रवेश शिंदे गटासाठी विजयाचे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. राजकीय पटलावर सुरू असलेल्या या हालचालींनी पुण्यासह महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आणला आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालावर या हालचालींचा परिणाम काय होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!