गेल्या काही दिवसांपासून अकोला भाजपमधील हिटरलशाही चांगलीच चर्चेत आहे. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते एकीकडे आणि हुकुमशाही करणाऱ्यांचा गट दुसरीकडे असे चित्र आहे. अलीकडेच यावरून सोशल मीडियावर एका नेत्याच्या मुलानं टाकलेल्या कमेंटमुळं भाजपमध्ये वादळ निर्माण झालं.
अकोल्याच्या भारतीय जनता पार्टीत अलीकडेच काही नियुक्ती प्रक्रिया राबविण्यात आली. या नियुक्ती प्रक्रियेनंतर भाजपच्या एका दिवंगत नेत्याच्या मुलानं फेसबुकवर टाकलेली कमेंट चांगलीच चर्चेत आली आहे. ही कमेंट दिल्लीत गेलेल्या एका नेत्याच्या फोननंतर डिलिट करण्यात आली. त्यानंतर नाराजी व्यक्त करणाऱ्याला एका पदाची ऑफरही देण्यात आली. पदही देण्यात आलं. मात्र या कमेंट प्रकरणातून पुन्हा एकदा भाजपमधील नाराजीनाट्य चव्हाट्यावर आलं आहे.
अकोल्याच्या भाजपकडे प्रदेश पातळीवरून पूर्णपणे दुर्लक्ष आहे. भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना मोर्णा नदीच्या पात्रातील त्या गटारात फेकून देण्यात आलं आहे, जिथे मोकाट जनावरंही जात नाहीत. ज्या दिवंगत आमदार लालाजी अर्थात गोवर्धन शर्मा यांच्या नावानं विधानसभा निवडणुकीत काही नेत्यांनी नौटंकी प्रेम दाखविलं, त्याच नेत्यांच्या चट्ट्याबट्ट्यांनी आता लालाजींच्या निकटवर्तीयांचे हाल सुरू केले आहेत. ‘गए तुम्हारे लालाजी अब स्वर्ग में. खतम हो गया तुम्हारे बम्मनो का राज’ अशा शब्दात लालाजीच्या अनेक कार्यकर्त्यांना आजही हिणवले जात आहे.
प्रदेश भाजपच्या नेत्यांचे आम्ही खिसे भरतो. पार्टीला पाहिजे तेवढे लक्ष्मी दर्शन करून देतो. त्यामुळे आमचे काही वाकडे होऊ शकत नाही, अशा खुलेआम धमक्या आता अकोला भाजपमधील निष्ठावान कार्यकर्त्यांना दिल्या जात आहेत. यात तथ्य वाटावे असे पाठबळही भाजपच्या प्रदेश पातळीवरून स्थानिक नेत्यांना मिळताना दिसत आहे. अनेकांनी तक्रार केल्यानंतरही भाजपचे प्रदेश पातळीवरील नेते आणि वरिष्ठही त्याच नेत्यांना डोक्यावर घेऊन नाचत आहेत, ज्यांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत.
अकोल्यातील एका विजय न मिळविलेल्या नेत्याचा मुलगा तर लोकांचा अपमान करण्यात चांगलाच पटाईत आहे. अलीकडेच कावड यात्रेत त्याने एका ज्येष्ठ नागरिकांचा सर्वांसमक्ष प्रचंड अपमान केला. भाजपच्या आणि संघाच्या संस्कृतीत न बसणारे अपमानास्पद शब्द या नेत्याच्या मुलाने वापरले. चहापेक्षा केटली जास्त गरम असल्यानेच विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला. अशा सर्व केटल्या थंड्या करून जरा माणुसकीत राहा, असा सल्ला अकोला भाजपमधील अनेकांना देण्याची वेळ आता आली आहे. याच अतिगरम चालणाऱ्या केटल्यांमुळेच फेसबुक कमेंटचे नाराजीनाट्य घडले आहे.
भाजपमधील काही नियुक्ती झाल्यानंतर एका नेत्याच्या मुलाने फेसबुकवर लांबलचक कमेंट टाकली. अकोल्याच्या भाजपमध्ये गटबाजी सुरू आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात आहे, असा स्पष्ट उल्लेख या कमेंटमध्ये होता. या कमेंटबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर दिल्लीतील एका नेत्यानं कमेंट टाकणाऱ्या व्यक्तीला फोनवर संपर्क केला. ‘तुम्ही तरी अशी कमेंट करायला नको. काय नाराजी असेल ते सांगा’, असे या नेत्याने विचारले.
मनाने अत्यंत चांगला, वागणुकीला सभ्य आणि नवीन दमाचा असलेला दिल्लीतील हा नेता खरोखर अकोल्यासाठी काहीतरी करू इच्छित आहे. मात्र त्याच्या आजुबाजूला लबाड कोल्ह्यांची फौज आहे. हे लबाड कोल्हे लचके तोडायला तयारच आहेत. त्यांच्यापासून स्वत:ला वाचवत हा नेता सध्या अकोल्यासाठी सरसावला आहे. या नेत्याने कमेंट करणाऱ्याची नाराजी समजून घेतली. ती संबंधितांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर नाराज असलेल्या व त्यातून फेसबुकवर कमेंट करणाऱ्या व्यक्तीला चांगले पद देण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यासारखे ‘सुपर पावरफूल’ नेते आणल्यानंतरही अकोला विधानसभा निवडणुकीत पराभव का झाला याचा विचार अद्यापही भाजप करताना दिसत नाही. अतिशहाणपणा आणि अहंकार यामुळे भाजपचा पराभव झाला आहे. कार्यकर्त्यांना काही नेते पायातील चपलेला लागलेल्या शेणाप्रमाणे समजत आहे. इतक्या वाईट पद्धतीने त्यांना वाळीत टाकण्यात आले आहे. काही विशिष्ट गटातील लोकांनाच डोक्यावर घेऊन नाचण्यात येत आहे.
अकोला विमानतळावर आजही चोट्टे, गुन्ह्यांची नोंद असलेल्याची गर्दी नेत्यांच्या स्वागतासाठी होत आहे. निष्ठावंतांना अद्यापही ‘तुम्ही येथे अपेक्षित नाही’, हे शब्द ऐकायला मिळत आहे. वारंवार भाजपच्या नेत्यांना ते कुठे चुकत आहेत, याची जाणीव करून देण्यात येत आहे. मात्र काही नेते आजही जमिनीपासून 30 हजार फूट हवेत आहेत. आपले काहीच वाकडे होऊ शकत नाही, असा त्यांचा गोड गैरसमज आहे. हिटरल, रावण, मुसोलिनी यांचे काय झाले? याचा त्यांना विसर पडला आहे. सूर्य कितीही आकाशात चमकत असला तरी तो अस्ताला जातोच याचाही त्यांना विसर पडला आहे.
गेम कभी भी हो सकता
भाजप कधी कोणाचा गेम करेल हे सांगता येत नाही. भाजपमध्ये पक्षाच्या इच्छेशिवाय कुणीच मोठे होत नाही. पक्षाच्या इच्छा नसेल तर कुणीही एका चुटकीत खल्लास होतो. संघाची, पक्षाची इच्छा आणि इशारा नसेल तोपर्यंत कोणत्याही नेत्याच्या विरोधात एक अक्षरही लिहिण्याचे धाडस करू शकत नाही. एवढं असतानाही अकोला भाजपमधील काही नेत्यांना अक्कल येत नसेल तर त्यांच्यापेक्षा शेखचिल्ली हुशार होता असेच म्हणण्याची आता वेळ आली आहे.
लवकरच महापालिका निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप अपयशी लोकांच्या हाती सूत्रं देणार की नवीन उमेदीचे चेहरे निवडणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. काही नेत्यांनी तर विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच साथ न देणाऱ्यांचे तिकिट कापणार अशी खुलेआम धमकी दिली होती. आता त्यापैकी काही नेत्यांची भाषा बदलली आहे. अद्याप तिकिटाबद्दल काहीच फायनल नाही. त्यामुळे कुणीही कोणाचेही नाव फिक्त समजू नका असे गोड शब्द आता तोंडातून बाहेर पडू लागले आहेत. काही नेत्यांची बुद्धी बऱ्यापैकी जागेवर आलेली दिसत आहे. उर्वरित नेत्यांनाही ही सुबुद्धी येवो अशी प्रार्थना भाजपमधील निष्ठावान कार्यकर्ते करीत आहेत.
Akola BJP : सोशल मीडियावरील नाराजी अन् पदाची ऑफर
Facebook Comment : नियुक्तीनंतरची कमेंट ठरली चर्चेत नंतर डिलिट
Author
अकोल्याच्या भारतीय जनता पार्टीत अलीकडेच काही नियुक्ती प्रक्रिया राबविण्यात आली. या नियुक्ती प्रक्रियेनंतर भाजपच्या एका दिवंगत नेत्याच्या मुलानं फेसबुकवर टाकलेली कमेंट चांगलीच चर्चेत आली आहे. ही कमेंट दिल्लीत गेलेल्या एका नेत्याच्या फोननंतर डिलिट करण्यात आली. त्यानंतर नाराजी व्यक्त करणाऱ्याला एका पदाची ऑफरही देण्यात आली. पदही देण्यात आलं. मात्र या कमेंट प्रकरणातून पुन्हा एकदा भाजपमधील नाराजीनाट्य चव्हाट्यावर आलं आहे.
अकोल्याच्या भाजपकडे प्रदेश पातळीवरून पूर्णपणे दुर्लक्ष आहे. भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना मोर्णा नदीच्या पात्रातील त्या गटारात फेकून देण्यात आलं आहे, जिथे मोकाट जनावरंही जात नाहीत. ज्या दिवंगत आमदार लालाजी अर्थात गोवर्धन शर्मा यांच्या नावानं विधानसभा निवडणुकीत काही नेत्यांनी नौटंकी प्रेम दाखविलं, त्याच नेत्यांच्या चट्ट्याबट्ट्यांनी आता लालाजींच्या निकटवर्तीयांचे हाल सुरू केले आहेत. ‘गए तुम्हारे लालाजी अब स्वर्ग में. खतम हो गया तुम्हारे बम्मनो का राज’ अशा शब्दात लालाजीच्या अनेक कार्यकर्त्यांना आजही हिणवले जात आहे.
जरा मुलांना समजवा
प्रदेश भाजपच्या नेत्यांचे आम्ही खिसे भरतो. पार्टीला पाहिजे तेवढे लक्ष्मी दर्शन करून देतो. त्यामुळे आमचे काही वाकडे होऊ शकत नाही, अशा खुलेआम धमक्या आता अकोला भाजपमधील निष्ठावान कार्यकर्त्यांना दिल्या जात आहेत. यात तथ्य वाटावे असे पाठबळही भाजपच्या प्रदेश पातळीवरून स्थानिक नेत्यांना मिळताना दिसत आहे. अनेकांनी तक्रार केल्यानंतरही भाजपचे प्रदेश पातळीवरील नेते आणि वरिष्ठही त्याच नेत्यांना डोक्यावर घेऊन नाचत आहेत, ज्यांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत.
अकोल्यातील एका विजय न मिळविलेल्या नेत्याचा मुलगा तर लोकांचा अपमान करण्यात चांगलाच पटाईत आहे. अलीकडेच कावड यात्रेत त्याने एका ज्येष्ठ नागरिकांचा सर्वांसमक्ष प्रचंड अपमान केला. भाजपच्या आणि संघाच्या संस्कृतीत न बसणारे अपमानास्पद शब्द या नेत्याच्या मुलाने वापरले. चहापेक्षा केटली जास्त गरम असल्यानेच विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला. अशा सर्व केटल्या थंड्या करून जरा माणुसकीत राहा, असा सल्ला अकोला भाजपमधील अनेकांना देण्याची वेळ आता आली आहे. याच अतिगरम चालणाऱ्या केटल्यांमुळेच फेसबुक कमेंटचे नाराजीनाट्य घडले आहे.
तुम्ही नको हे करायला
भाजपमधील काही नियुक्ती झाल्यानंतर एका नेत्याच्या मुलाने फेसबुकवर लांबलचक कमेंट टाकली. अकोल्याच्या भाजपमध्ये गटबाजी सुरू आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात आहे, असा स्पष्ट उल्लेख या कमेंटमध्ये होता. या कमेंटबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर दिल्लीतील एका नेत्यानं कमेंट टाकणाऱ्या व्यक्तीला फोनवर संपर्क केला. ‘तुम्ही तरी अशी कमेंट करायला नको. काय नाराजी असेल ते सांगा’, असे या नेत्याने विचारले.
मनाने अत्यंत चांगला, वागणुकीला सभ्य आणि नवीन दमाचा असलेला दिल्लीतील हा नेता खरोखर अकोल्यासाठी काहीतरी करू इच्छित आहे. मात्र त्याच्या आजुबाजूला लबाड कोल्ह्यांची फौज आहे. हे लबाड कोल्हे लचके तोडायला तयारच आहेत. त्यांच्यापासून स्वत:ला वाचवत हा नेता सध्या अकोल्यासाठी सरसावला आहे. या नेत्याने कमेंट करणाऱ्याची नाराजी समजून घेतली. ती संबंधितांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर नाराज असलेल्या व त्यातून फेसबुकवर कमेंट करणाऱ्या व्यक्तीला चांगले पद देण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यासारखे ‘सुपर पावरफूल’ नेते आणल्यानंतरही अकोला विधानसभा निवडणुकीत पराभव का झाला याचा विचार अद्यापही भाजप करताना दिसत नाही. अतिशहाणपणा आणि अहंकार यामुळे भाजपचा पराभव झाला आहे. कार्यकर्त्यांना काही नेते पायातील चपलेला लागलेल्या शेणाप्रमाणे समजत आहे. इतक्या वाईट पद्धतीने त्यांना वाळीत टाकण्यात आले आहे. काही विशिष्ट गटातील लोकांनाच डोक्यावर घेऊन नाचण्यात येत आहे.
अकोला विमानतळावर आजही चोट्टे, गुन्ह्यांची नोंद असलेल्याची गर्दी नेत्यांच्या स्वागतासाठी होत आहे. निष्ठावंतांना अद्यापही ‘तुम्ही येथे अपेक्षित नाही’, हे शब्द ऐकायला मिळत आहे. वारंवार भाजपच्या नेत्यांना ते कुठे चुकत आहेत, याची जाणीव करून देण्यात येत आहे. मात्र काही नेते आजही जमिनीपासून 30 हजार फूट हवेत आहेत. आपले काहीच वाकडे होऊ शकत नाही, असा त्यांचा गोड गैरसमज आहे. हिटरल, रावण, मुसोलिनी यांचे काय झाले? याचा त्यांना विसर पडला आहे. सूर्य कितीही आकाशात चमकत असला तरी तो अस्ताला जातोच याचाही त्यांना विसर पडला आहे.
गेम कभी भी हो सकता
भाजप कधी कोणाचा गेम करेल हे सांगता येत नाही. भाजपमध्ये पक्षाच्या इच्छेशिवाय कुणीच मोठे होत नाही. पक्षाच्या इच्छा नसेल तर कुणीही एका चुटकीत खल्लास होतो. संघाची, पक्षाची इच्छा आणि इशारा नसेल तोपर्यंत कोणत्याही नेत्याच्या विरोधात एक अक्षरही लिहिण्याचे धाडस करू शकत नाही. एवढं असतानाही अकोला भाजपमधील काही नेत्यांना अक्कल येत नसेल तर त्यांच्यापेक्षा शेखचिल्ली हुशार होता असेच म्हणण्याची आता वेळ आली आहे.
लवकरच महापालिका निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप अपयशी लोकांच्या हाती सूत्रं देणार की नवीन उमेदीचे चेहरे निवडणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. काही नेत्यांनी तर विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच साथ न देणाऱ्यांचे तिकिट कापणार अशी खुलेआम धमकी दिली होती. आता त्यापैकी काही नेत्यांची भाषा बदलली आहे. अद्याप तिकिटाबद्दल काहीच फायनल नाही. त्यामुळे कुणीही कोणाचेही नाव फिक्त समजू नका असे गोड शब्द आता तोंडातून बाहेर पडू लागले आहेत. काही नेत्यांची बुद्धी बऱ्यापैकी जागेवर आलेली दिसत आहे. उर्वरित नेत्यांनाही ही सुबुद्धी येवो अशी प्रार्थना भाजपमधील निष्ठावान कार्यकर्ते करीत आहेत.
prasannaajakate
More Posts
Related Post
Akola BJP :संजय गोटफोडेंची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
Akola BJP : सावरकर अलीमचंदानींना वाट्टेल तसं बोलले…
Akola : निवडणुकीच्या उंबरठ्यावर अकोटमध्ये रक्तरंजित सकाळ
Bhandara : भाजप उमेदवारांच्या कृतीने वादाचा भडका
Nagpur Elections : एकाच चेहऱ्याने सजलेली अनेक नावे
Washim : लोहा नगरपरिषदेत घराणेशाहीचा उतू चाललेला उन्माद
Bhandara : दहा लाखाची लाच; पाच आता, कामानंतर
Winter Session : थकबाकीच्या सावटाखाली थांबली कामांची धावपळ
IPS Ramnath Pokale : आयजी एसपींशी असे वागतात
Health Department : आरोग्य विभागाविरोधात फैजान मैदानात