महाराष्ट्र

Ashish Jaiswal : जंगल टू ग्लोरी; जयस्वालांचा आदिवासी एम्पॉवरमेंट मिशन

Nagpur : जंगलाच्या सावलीतून विकासाचा दिवा

Post View : 56

Author

वनराईच्या कुशीत राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा निर्धार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला आहे. वैयक्तिक सक्षमीकरणालाच खरी विकासाची गुरुकिल्ली मानत, निधीच्या नव्या वाटपाचा त्यांनी ठाम आग्रह धरला.

वनराईच्या शांत सान्निध्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या जीवनात बदल घडवायचा असेल, तर तो फक्त घोषणा देऊन नाही तर योजनांचा हात धरूनच होऊ शकतो. याच विचाराचा झरा वाहतोय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या कामातून. विकास हा सामूहिक देखील असावा, पण वैयक्तिक सक्षमीकरणाचाही वेग तेवढाच जास्त असावा, असे ठाम मत त्यांनी व्यक्त करत, सध्याच्या धोरणात बदल घडवून आणण्याची मागणी केली आहे.

जयस्वाल यांनी स्पष्ट सांगितले की, 80 टक्के निधी सामूहिक विकासासाठी आणि 20 टक्के निधी वैयक्तिक विकासासाठी ही जुनी चौकट आता बदलली पाहिजे. किमान 50 टक्के निधी थेट वैयक्तिक सक्षमीकरणासाठी गेला पाहिजे, जेणेकरून गरिबीच्या बेड्यांपासून आदिवासी बांधव लवकर मुक्त होतील. त्यांच्या या दृष्टिकोनामागे अनुभवाचं वजन आहे. अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’ साकारली गेली. ज्यातून बोरवेल व सौरपंपांच्या तरतुदींनी गडचिरोली आणि रामटेकमधील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणि आशा दोन्ही पोहोचले.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या शरद पवारांना कृतीचा मंत्र

शेतकऱ्यांना दिलासा

वनक्षेत्रात राहणाऱ्या लोकांना जंगलाचं मोल जितकं आहे, तितक्याच त्यातून अडचणीही आहेत. यावर उपाय म्हणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक घेऊन जयस्वाल यांनी ‘मुख्यमंत्री वन व पर्यावरण संवर्धन योजना’ या नव्या मसुद्याचा आराखडा तयार करून सरकारकडे सादर केला आहे. तो लवकरच मंत्रिमंडळाच्या टेबलावर येईल आणि राज्यातील वनक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

जयस्वाल यांनी केवळ योजनांपुरतंच लक्ष केंद्रित न करता संस्कृतीलाही भक्कम आधार दिला आहे. गोंडवाना म्युझियम प्रश्न मार्गी लावताना ‘कुंवारा भिवसेन महोत्सव’ सुरू करून त्यांनी आदिवासी कला आणि संस्कृतीला नवीन मंच मिळवून दिला. ही अद्वितीय संस्कृती जगासमोर यावी, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. याच संकल्पनांच्या धाग्यातून विणलेल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जयस्वाल ‘विरांगणा राणी दुर्गावती आदिवासी महिला सबलीकरण व सक्षमीकरण मेळावा’ येथे उपस्थित राहिले.

Devendra Fadnavis : गरुड दृष्टीची नजर, गुन्हेगारांचा चुरम्यासारखा चुरा

विकासाचा निर्धार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वाखाली न्यूक्लिअस बजेट अंतर्गत जाहीर झालेल्या महिला सक्षमीकरण योजनेचं त्यांनी मनापासून कौतुक केलं. समाजाच्या खरी गरज लक्षात घेऊन योजना आखणे हेच आमच्या सरकारचं धोरण आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात समाजातील शेवटच्या घटकाचा विकास साध्य करण्याचा निर्धार त्यांनी पुनः उच्चारला. शेवटी, आदिवासी समाजाच्या दैदीप्यमान इतिहासाला आधुनिक युगातील प्रगतीचा उजेड देण्याची शपथ घेतली.

अभिजित कराळे | Abhijeet Karale

अभिजित कराळे | Abhijeet Karale

पत्रकारिता, बातम्या हा अभिजित यांच्या आवडीचा विषय. पत्रकारितेचा कोर्स केला नसला तरी त्यांनी न्यूज रिपोर्टिंगच्या आवडीतून त्यांनी आपलं लेखन कौशल्य विकसित केलं. ‘द लोकहित लाइव्ह’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेतील आपला प्रवास सुरू केला. पुण्यातून त्यांनी संगणशास्त्र, वेब डेव्हलपमेंट, कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचे शिक्षणही पूर्ण केले आहे.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!