भंडारा जिल्ह्यातील दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने सत्ता काबीज आहे.
भंडाऱ्याच्या वैनगंगेच्या किनाऱ्यावर सत्ता काबीज करणाऱ्या महायुती सरकारचा प्रभाव आता भंडारा जिल्ह्यात दडपून दिसतोय. भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीने काँग्रेसला मोठ्या पराभवात टाकत दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत सत्तेचा सिंहासन पटकावले आहे. मात्र या यशामागचा खराखुरा माणूस म्हणजे भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके.भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक, दुग्ध उत्पादक संघ, तसेच इतर अनेक क्षेत्रांमध्ये महायुतीच्या सत्तेसाठी डॉ. परिणय फुके यांनी नितांत परिश्रम घेतले आहेत.
बँक निवडणूक असो किंवा दुग्ध संघाची निवडणूक, डॉ. फुके यांच्या प्रयत्नांमुळे महायुतीने प्रत्येक ठिकाणी आपली पकड मजबूत केली आहे. भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या अध्यक्षपदावर डॉ. फुके यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बाजी मारली असून, त्यामुळे पूर्व विदर्भात भाजपचा झेंडा नेहमीच उंचावलेला दिसतो. डॉ. फुके यांच्या नेतृत्वाखाली 10 ऑगस्ट 2025 रोजी भंडारा जिल्ह्यात दूध संकलन व दूध संघाच्या वाटचालीवर सखोल चर्चेचे आयोजन करण्यात आले. या वेळी नव्याने निवडलेले संचालक मंडळाचे सत्कार देखील करण्यात आले. ज्यामुळे दूध संघाची नवी ऊर्जा आणि नवचैतन्य निर्माण होण्याची आशा दिसते.
Sameer Shinde : शोषितांच्या हक्कासाठी झटणाऱ्या शहर प्रमुखांना समितीवर स्थान
संघाचा शाश्वत विकास
भंडारा जिल्ह्यात सध्या दररोज सुमारे 4 लाख लिटर दूध उत्पादित होते. मात्र त्यापैकी केवळ 50 हजार लिटर दूधच संघाकडे संकलित होत असल्याचा उल्लेख डॉ. ;परिणय फुके यांनी केला. शेतकरी बांधवांनी अधिक दूध संघाकडे द्यावे, यामुळे दूध दरांवर सकारात्मक परिणाम होईल, असे त्यांनी सांगितले. दूध संघाने आतापर्यंत 35 कोटी रुपयांची गुंतवणूक करून प्रोसेसिंग आणि पावडर प्लांटसारखी भौतिक प्रगती साधली आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये भंडारा दूध संघ टिकून आहे, ही आपली अभिमानाची गोष्ट आहे, असे डॉ. फुके यांनी नमूद केले.
दूध संघाच्या शाश्वत विकासासाठी ते सातत्याने काम करत राहणार असल्याचा त्यांचा निर्धारही यावेळी स्पष्ट झाला. या कार्यक्रमात दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, माजी आमदार राजु कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे, भंडारा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथजी फेंडर, भाजप जिल्हाध्यक्ष आशूजी गोंडाने यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची भंडारा जिल्ह्यातील सत्ता आता दृढ होत चालली असून, भविष्यातही दूध संघाच्या प्रगतीसाठी त्यांचा प्रवास अनवरत राहील, असा विश्वास वावरतो.