महाराष्ट्र

Navneet Rana : माजी खासदारांना जीवघेणा संदेश

Amravati : सोशल मीडियाने नेत्यांच्या सुरक्षेला दिला मोठा धक्का

Author

भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सुरक्षेचा उडाला पुन्हा एकदा फज्जा.

वादग्रस्त वक्तव्यांनी सतत चर्चेत राहणाऱ्या भाजपच्या माजी खासदार नवनीत राणांवर पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या काही कृती आणि वक्तव्यांमुळे सातत्याने ट्रोलिंग आणि वाद निर्माण होत असताना, आता त्यांना धमक्यांचा सामना करावा लागत आहे. नुकताच नवनीत राणांनी किसी के हाथ न आयेगी ये लड़की या गाण्यावर पावसात रील तयार करून पोस्ट केली होती. ज्यामुळे सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ झाला. मात्र या रीलवरून सोशल मीडियावर त्यांना ट्रोलही करण्यात आले.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या वारंवार मिळत आहेत. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना नागपूरमधील त्यांच्या निवासस्थानी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यापासून काही दिवस न उलटता नवनीत राणांनाही धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही नवनीत राणांना पाकिस्तानकडून धमक्या आल्या होत्या. त्या काळीही त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. आता या धमक्यांनी पुन्हा एकदा राजकारणात सुरक्षिततेचा प्रश्न उभा केला आहे.

Devendra Fadnavis : सत्तेच्या पराभवाचे सत्य कडवट वाटते

सुरक्षा सुधारण्याची गरज

नवनीत राणांना दिलेल्या धमक्यांमध्ये सोशल मीडियावर तयार करण्यात आलेल्या रील्सचा वापर झाला आहे. अमरावती येथील राजापेठ पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे.  नवनीत राणांचे सहाय्यक विनोद गुहे यांनी याबाबत पोलिसांमध्ये अर्ज केला आहे. धमकी देणाऱ्या इंस्टाग्राम अकाउंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिस तपास करत आहेत. धमकी देणाऱ्याने सोशल मीडियावरची धमकी देणारी पोस्टही डिलीट केली आहे. हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढ़ने वाली थोड़े दिन की मेहमान है, जल्दी उड़ने वाली है असे संदेश नवनीत राणांना मागील धमक्यांमध्ये पाठवण्यात आले होते.

धमक्यांचे स्रोत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान असल्याची माहिती आहे. नवनीत राणांनी ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला झालेल्या नुकसानीवर टीका केली होती. त्यानंतर त्यांना अधिकाधिक धमक्या येऊ लागल्या. मात्र अशा धमक्यांच्या पार्श्वभूमीवरही पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा कठोर करण्याकडे अजून काही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. राजकीय नेत्यांवर सतत होणाऱ्या धमक्यांवर पोलीस प्रशासन कधी लक्ष देणार? या प्रश्नाचे उत्तर अजूनही अस्पष्ट आहे. अशी परिस्थिती असल्यामुळे राजकीय क्षेत्रात आणि सामान्य जनतेतही सुरक्षिततेच्या बाबतीत चिंता वाढली आहे. नवनीत राणांवर होणाऱ्या धमक्यांवर तत्पर आणि प्रभावी कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी संबंधितांकडून होत आहे.

Devendra Fadnavis : देवाभाऊ फुकेंना का म्हणाले मुख्यमंत्री?

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!