महाराष्ट्र

आधी स्वतःची लंगोट Sanjay Raut यांनी सांभाळावी

सामना वृत्तपत्रातील लेखावर Nitesh Rane यांचा घणाघात 

Post View : 24

Author

शिवसेना उद्धव ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. 

राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर विरोधक आणि अनेक नेते राज्य सरकारवर टीका करत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जणू सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचे कामच हाती घेतले, असे वाटत आहे. राऊत सातत्याने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत आहेत. शिवसेनेच्या सामना वृत्तपत्रातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर राऊत यांनी निशाणा साधला आहे. फडणवीस आणि शिंदे यांची मतं जुळत नाहीत, असं संजय राऊत म्हणाले होते. यानंतर आता भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊत बाबत दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

भाजप नेते नितेश राणे राऊतांवर निशाणा साधत म्हणाले की, संजय राऊत लवकरच काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. संजय राऊत यांनी आधी स्वतःची लंगोट सांभाळावी नंतर दुसऱ्यांच्या घरात डोकवावे. संजय राऊत स्वतः एका खासदारांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी केला आहे. आता संजय राऊत हे किती काळ शिवसेना उद्धव ठाकरेंसोबत राहतात याचे दिवस मोजा, असेही नितेश राणे म्हणाले आहेत.

Matoshree वर लिंबू आणि काळी जादू?

मातोश्रीवर लेख लिहिण्याचा सल्ला 

नितेश राणे पुढे म्हणाले, शिवसेना ठाकरे गटात आदित्य ठाकरे यांच्याबद्दल नाराजी दिसून येत आहे. आदित्य ठाकरेंमुळे ठाकरे गटात जी खदखद आहे, त्यावर संजय राऊत यांनी सामनामध्ये लिहावे, असा सल्लादेखील देखील नितशे राणे यांनी संजय राऊत यांना दिला आहे. दुसऱ्याच्या घरात काय चाललं आहे. यापेक्षा मातोश्रीला मुख्यमंत्रिपद न मिळाल्यामुळे किती लिंबू फोडले जात आहेत. किती उपवास ठेवले जात आहेत, यावर सुद्धा संजय राऊत यांनी लेख लिहिला पाहिजे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद मिळाले नाही यामुळे राऊत किती बुवांकडे गेले, याची माहिती महाराष्ट्राला त्यांनी द्यावी, असा टोलाही नितेश राणे यांनी राऊतांना लगावला आहे.

राणे पुढे म्हणाले की, संजय राऊत यांना आता कुणीच गांभीर्याने घेत नाही. सामना सकाळी पुसण्यासाठी वापरला जातो. शिवसैनिक सुद्धा सामना वृत्तपत्र वाचत नाहीत. सामना आता शिवसेनेचा वृत्तपत्र कमी आणि काँग्रेसचं मुखपत्र जास्त झालं आहे. सामनाची दखल घेण्याची काहीही गरज नाही, असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे.

यावेळी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत नितेश राणे म्हणाले, भाजपच्या पक्षश्रेष्ठींना मिळेल तिथे भेटण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहे. ठाकरेंना प्रतिसाद भेटत नसला तरी प्रयत्न मात्र जोरदार सुरू आहेत. खुर्चीवर नाही तर स्टूलवर बसवा, अशा पद्धतीच्या विनवण्या करण्यात येत आहेत. मात्र कुणी भीक घालत नाही, असा घणाघात नितेश राणेंनी केला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!