प्रशासन

Buldhana Police : खाकी वर्दीचे रक्षक बनले भक्षक

Corrupt Cops : वाहन चालकांनी केला पोलिसांच्या लुबाडणीचा भांडाफोड

Author

बुलढाण्यातील पोलिसांनी वाहन चालकांकडून जबरदस्तीने खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन आता फक्त सुरक्षा देणारा आहे की लुबाडणीसाठीच आहे, असा सवाल महाराष्ट्रातील जनतेच्या मनात उगम पावत आहे. बुलढाण्यातील घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने या प्रश्नाला बळ दिले आहे. जिथे पोलिसांच्या वर्दीतूनच गुन्हेगारीचे डोके वर काढत आहेत. खाकीतील या खंडणीखोर पोलिसांनी लोकांच्या जीवाशी खेळण्याचा धोकादायक प्रकार उघड केला आहे. चिखली तालुक्यातील या प्रकरणात कर्नाटकातून आलेल्या काही वाहन चालकांकडून पोलिसांनी जबरदस्तीने पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही, तर यामध्ये समाविष्ट पाच वाहतूक पोलिसांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल होऊन पोलिस प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे.

अशा पोलिसांमुळे खाकीचा माणूस रक्षक न राहता भक्षक ठरला आहे, अशी चिंता सर्वत्र पसरली आहे. कर्नाटकातील चल्लकेरे येथील ताज रहमान हे आपल्या सहकाऱ्यांसह एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी मलकापूरकडे जात होते. चिखली- बुलढाणा मार्गावर दोन वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवून वाहनाची कागदपत्रे मागितली. मात्र, या कागदपत्रांच्या मागणीनंतर पोलिसांनी कारवाई टाळण्यासाठी 3 हजार रुपयांची मागणी केली. यापैकी 1 हजार 500 रुपये पेटीएमद्वारे जवळच्या चहावाल्याकडे दिले असता त्यांना पुढे जाण्याची मुभा मिळाली. परंतु हा त्रास यावर संपला नाही. काही अंतरावर पुन्हा तीन पोलिसांनी ताज रहमान यांना अडवले आणि त्याच्या वाहनात असलेल्या एअर रायफलच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तब्बल 2 लाख रुपयांची मागणी केली.

Prashant Padole : खताच्या वाळवंटातून संघर्षाची मशाल पेटली दिल्ली दरबारात

भ्रष्टाचाराची वाढती छाया

तडजोडीत 50 हजार रुपये देण्याचा निर्णय झाला. पण ताजला संशय आल्यामुळे त्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्याला पैसे नको पण आम्हाला खाली उतरवा अशी सांगितली. या धक्कादायक प्रसंगात वाहनाचा नियंत्रण सुटून अपघात देखील झाला. या खळबळजनक प्रकरणानंतर ताज रहमान यांनी चिखली पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी अभय टेकाळे (चिखली पोलिस स्टेशन), गजानन भंडारी (जिल्हा वाहतूक शाखा), विठ्ठल काळुसे, विजय आंधळे, संदीप किरके (महामार्ग मदत केंद्र) या पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांवर मृत्यू होण्याची शक्यता असलेल्या कृतीचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करण्याची धमकी देणे, शारीरिक इजा करणे आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या वर्तनाविरोधात विशेष कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

संपूर्ण घटनेने महाराष्ट्रातील पोलिस प्रशासनाचा एक गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आणला आहे. रक्षक असावे अशी अपेक्षा असलेल्या पोलीस आता जनता आणि सरकार यांच्यात एक मोठा आव्हान ठरत आहेत. तरुणांवर पोलिसांकडून अशा प्रकारची खंडणी आणि धमक्या यामुळे जनतेत पोलिसांविरुद्धच गैरसोय आणि भय निर्माण झाला आहे.बुलढाण्यातील हा प्रकार महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाची प्रतिष्ठा धोक्यात आणणारा आहे. ही घटना केवळ एका विभागातील नाही तर व्यापकपणे पोलिसांमध्ये चालत असलेल्या भ्रष्टाचाराचे द्योतक आहे. यामुळे सामान्य माणसाच्या मनात पोलिसांविषयीचा विश्वास घटत आहे. जर पोलिसच नागरिकांचे रक्षण करण्याऐवजी त्यांच्यावरच अत्याचार करतात, तर समाजाची सुरक्षितता कशी होईल?

Yashomati Thakur : चोर की दाढ़ी में तिनका, आयोगावर भाजपचा मुखवटा

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!