महाराष्ट्र

नेत्यानच केली Amravati मध्ये फसवणूक 

पोलिसांकडून Shiv Sena शहराध्यक्षाविरुद्ध गुन्हा

Post View : 17

Author

राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. अशात शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या शहराध्यक्षाने नोकरीचे आम्हीच दाखवून केली नागरिकांची फसवणूक. 

राज्यात नोकरी लाऊन देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करण्याचे प्रमाण अधिक झाले आहे. काही दिवसांपूर्वी बुलढाणा येथे नोकरीचे आमिष दाखवून तब्बल 2 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. असेच आणखी एक प्रकरण अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथून समोर आले आहे. तर या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचा समावेश आहे.

रेल्वे विभागात नोकरी लाऊन देतो, असे आमिष देऊन 17 तरुणांकडून तब्बल एक कोटी 56 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार अंजनगाव पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर चार जणांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या फसवणुकीत अंजनगाव सुर्जीयेथील शिवसेना शिंदे गटाचे शहराध्‍यक्ष योगेश उर्फ मुन्‍ना इसोकार यांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

मंगेश हेंड (वय 38) रा. रामटेकपुरा, अकोट, असे तक्रारदाराचे नाव आहे.  त्‍याआधारे पोलिसांनी योगेश उर्फ मुन्ना इसोकार, श्रीकांत फुलसावंदे, विलास जाधव आणि मॉन्टी उर्फ मेघराजसिंह चव्हाण ठाकूर अशा चार जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

रेल्वे विभागात नोकरीचे आमिष

डिसेंबर 2021 मध्ये मंगेश हेंड यांची शिंदे गटाचा शहराध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना इसोकार याच्यासोबत ओळख झाली होती. त्यावेळी मुन्ना इसोकारने मंगेश हेंड यांना सांगितले की, शिवेसेनेतील एका माजी आमदारासोबत  मी तुमचा परिचय करुन देतो. त्याच माध्यमातून तुम्हाला रेल्वे विभागात नोकरीदेखील मिळवून देणार. परंतु त्‍यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार. तसेच दहा ते पंधरा उमेदवारही लागतील. प्रत्येकाला नोकरीसाठी दहा लाख रुपये खर्च येणार आहे. तो तुम्हाला करावा लागणार. इसोकारच्या या बतावणीमुळे मंगेश हेंड यांनी अकोट येथील त्यांच्या काही नातेवाईक व मित्र परिवारातील तरुणांना याबाबत माहिती दिली.

Government नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक 

पैसे मागून केला Scam 

त्यानंतर हळू हळू मुन्ना इसोकार यांच्यासोबत मंगेश हेंड यांचा व्यवहार सुरू झाला. मुन्ना इसोकार यांच्या सांगण्यावरुन श्रीकांत फुलसावंदे यांच्यासोबत संपर्क साधला व काही रक्कम त्याच्याकडे करण्यात आली. तसेच ‘आरटीजीएस’द्वारे नागपुरातील एका बँकेतदेखील रक्कम जमा करण्यात आली होती. यानंतर सर्व उमेदवारांना मुंबईतील भायखळा येथील सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल येथे बोलावण्यात आले. सर्व उमेदवारांची वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात आली. लवकरच अंजनगाव सुर्जी येथे रेल्वे अधिकाऱ्यांसोबत आपली भेट घालून देणार, असेही उमेदवारांना सांगण्यात आले होते.

रक्कम प्राप्त झाल्यानंतर आरोपींनी उमेदवारांना सांगितले की, आम्ही तुमची ‘ऑर्डर’ काढतो आणि तुम्हाला कळवितो. तुम्हाला परीक्षा देण्याची गरज अजिबात नाही.  आपआपल्या पत्त्यावर सर्व उमेदवारांना ‘जॉइनिंग लेटर’ मिळणार. त्यानंतर सर्व उमेदवार रूजू होण्यासाठी मुंबई येथे गेले. त्यावेळी त्यांची अधिकारी हजर नाहीत, असे सांगून टाळाटाळ करण्यात आली.

रूजू करून घेणारे अधिकारी सुद्धा सुट्टीवर असल्याचे सर्व उमेदवारांना सांगण्यात आले.  ते परत आल्यानंतर तुम्हाला रूजू करतील, असेही त्यांना सांगितले. त्यानंतर उमेदवारांनी मुन्ना इसोकारसोबत संपर्क साधला. परंतु त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली, असेही दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!