महाराष्ट्र

Ravindra Singhal : नशाविरोधात पोलिसांचा लढा अधिक तीव्र

Nagpur : रवींद्र सिंघल यांच्या भाषणाने विद्यार्थ्यांच्या मनात रुजवले यशाचे बीज

Post View : 21

Author

नागपूरमध्ये आयोजित विदर्भ शायनिंग स्टार्स उपक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

नागपूरच्या सुरेश भट सभागृहात पार पडलेल्या विदर्भ शायनिंग स्टार्स उपक्रमाच्या तिसऱ्या सत्रात दहावी आणि बारावीमध्ये विशेष यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे शिक्षणात मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान वाढवण्याबरोबरच, त्यांच्या यशामागील शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या मनात नवे विचार रोवणारा ठरला.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांचे मार्गदर्शन. आपल्या साध्या आणि प्रभावी शैलीत त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि पालकांना जीवनातील योग्य दिशा दाखवणारे विचार दिले.

Chandrashekhar Bawankule : वाघांपासून जीव वाचवणार एआय कॅमेरे

समाजहिताचा ठाम निर्धार

डॉ. सिंघल यांनी आपल्या भाषणात ऑपरेशन थंडर या मोहिमेचा विशेष उल्लेख करत, नशाविरोधात पोलिस विभागाने उचललेल्या पावलांबद्दल माहिती दिली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, विद्यार्थ्यांनी जीवनात कधीही चुकीच्या मार्गाला वळू नये. नशेच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांचे भवितव्य उद्ध्वस्त झाले आहे. अशा साखळीत आपलीही नोंद होऊ नये यासाठी सजग राहणे आवश्यक आहे. पोलिस विभाग केवळ कायदा अंमलबजावणीसाठी नसून, तरुण पिढीला योग्य मार्ग दाखवण्यासाठीही कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांना त्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचारसरणी यांचे महत्त्व पटवून दिले. आयुष्यात अडथळे येतातच, मात्र त्यावर मात करण्याची जिद्द अंगी बाळगली पाहिजे, हा मूलमंत्र त्यांनी दिला.

स्वतःचा संघर्ष उलगडत डॉ. सिंघल यांनी विद्यार्थ्यांशी अतिशय आत्मीयतेने संवाद साधला. दिल्लीच्या एका सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा पुत्र असताना त्यांनी शैक्षणिक आणि प्रशासकीय आयुष्यातील अनेक अडथळे पार करत पोलिस आयुक्तपदापर्यंतचा प्रवास केला. यश हे प्रयत्नांचे फळ असून, परिस्थिती काहीही असो, प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर काहीही अशक्य नाही, हे त्यांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिले. ते पुढे म्हणाले की, त्यांच्या यशामुळे आज त्यांच्या पालकांना अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांनीही असेच आयुष्य जगावे, ज्यामुळे त्यांचे पालक, शिक्षक आणि समाज त्यांच्यावर अभिमानाने नजर ठेवतील.

Ashish Shelar : तुकडे गँगच्या चिंतेत उबाठा सेना

नशेविरोधात जनजागृती

डॉ. सिंघल यांनी जागतिक दर्जाच्या आयरन मॅन स्पर्धेत स्वतःच्या आणि त्यांच्या मुलीच्या सहभागाबाबत सांगितले. काही गुण कमी पडल्यामुळे मुलीला अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र तिने हार न मानता पुन्हा तयारी केली. अंतिमतः यश प्राप्त केले. त्यांनीही स्वतः या कठीण स्पर्धेत भाग घेऊन आयरन मॅन किताब मिळवला आहे. हे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, कोणतीही अडचण ही आपल्याला रोखण्यासाठी नसते, तर आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी असते.

शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचे महत्त्व स्पष्ट करत डॉ. सिंघल यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचा सजग सल्ला दिला. त्यांनी स्पष्ट सांगितले की, व्यसनांचे दुष्परिणाम केवळ आरोग्यावरच नाही, तर संपूर्ण आयुष्यावर होतात. म्हणूनच, शिक्षण घेण्यासोबतच आपल्या शरीराची आणि मनाची योग्य काळजी घेणे ही आजची गरज आहे. त्यांनी तंबाखू, ड्रग्स यांसारख्या सवयींना दूर ठेवण्याचे आवाहन करताना विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याची जाणीव करून दिली. चुकीच्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवणे. योग्य निर्णय घेणे हाच यशाचा खरा मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!