महाराष्ट्र

Congress : चंद्रपूरच्या निवडणुकीत खळबळजनक खुलासे

Chandrapur : काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

Author

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात मतचोरीचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. काँग्रेसच्या तक्रारीनंतरही निवडणूक आयोग आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतचोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँग्रेस पक्षाने याबाबत सातत्याने तक्रारी केल्या असून, तब्बल 6 हजार 853 बोगस मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. मात्र, या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोलीस अद्याप पोहोचलेले नाहीत. निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाने केवळ गुन्हा दाखल करण्यापुरतीच कारवाई केल्याने संताप व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकरणाने जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

घडलेल्या प्रकरणाने स्थानिक निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेस नेते सुभाष धोटे आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप लावताना निवडणूक आयोगाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले. त्यांनी भाजपचे आमदार देवराव भोंगळे यांच्या विजयावरही संशय व्यक्त केला असून, मतचोरीमुळे त्यांचा विजय झाल्याचा दावा केला आहे. यासोबतच, निवडणूक काळात भोंगळे यांच्याकडे सापडलेले प्रचार साहित्य आणि 61 लाख रुपये रोख रक्कम यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी कारवाई थंडबस्त्यात आहे, असे धोटे यांनी नमूद केले.

Central Railway : खिडकीवरची रांग गायब, मोबाईलवर आलं रेल्वे तिकीटाचं गाणं

मतचोरीचा खळबळजनक पुरावा

राजुरा मतदारसंघात असंख्य फोन नंबरद्वारे बोगस मतदारांची नोंदणी झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. याबाबत तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवला गेला, परंतु त्यापुढील कारवाई ठप्प आहे. केवळ राजुराच नव्हे, तर वरोरा आणि जिल्ह्यातील इतर मतदारसंघांमध्येही असाच प्रकार घडल्याचा आरोप आहे. निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी करूनही ठोस पावले उचलली गेली नसल्याने काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्ह्यातील वाळू माफियांच्या अनिर्बंध कारवायांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, राजुरा येथे सात जणांचा बळी गेला आहे. खासदार धानोरकर यांनी रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षपदावरून याबाबत वारंवार तक्रारी केल्या, परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जिल्हाधिकारी आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. वाळू माफियांवर कारवाईची मागणीही त्यांनी लावून धरली आहे.

Abhijit Wanjarri : आमदाराच्या फलकावर काळा डाग

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची काँग्रेसची भूमिका आहे, परंतु ओबीसींवर अन्याय होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे धोटे आणि धानोरकर यांनी स्पष्ट केले. तसेच, लाडकी बहीण योजनेचे पोर्टल बंद झाल्याने गरजू महिलांना लाभ मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याने पीकविमा, शिवभोजन थालीसारख्या योजनाही बंद पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!