राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. प्रत्येक पक्ष कंबर कसून तयारीला लागला असताना काँग्रेसने नवीन खेळी करत जनतेच्या मनात घर करण्याचे काम सुरू केले आहे.
महाराष्ट्रात सध्या निवडणुकींचा धुमाकूळ सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्याचे आदेश दिल्याने प्रत्येक राजकीय पक्ष कमर कसून मैदानात उतरला आहे. लोकांच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी पक्षांनी विविध योजना आणि उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. यात काँग्रेस पक्षाने एक अनोखे पाऊल टाकले आहे. सत्तेत नसतानाही तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी ते सक्रिय झाले आहेत. उच्च शिक्षित तरुणांना रोजगार मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने रोजगार मेळाव्यांचे आयोजन करून एक नवा अध्याय सुरू केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले की, यापुढे प्रत्येक जिल्ह्यात असे मेळावे भरवले जातील. ज्यामुळे हजारो तरुणांना संधी मिळेल.
/टिळक भवनमध्ये आयोजित या मेळाव्यात आयटी, बँकिंग, विमा अशा विविध क्षेत्रातील ७५ कंपन्यांनी भाग घेतला. शेकडो तरुणांची निवड झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. या कार्यक्रमाचे उद्घाटन खुद्द प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केले. यावेळी विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार भाई जगताप, माजी खासदार कुमार केतकर, प्रदेश उपाध्यक्ष ऍड गणेश पाटील, मोहन जोशी, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, भूषण पाटील, सरचिटणीस धनंजय शिंदे उपस्थित होते. हे मेळावे फक्त नोकरी देणारे नाहीत, तर तरुणांच्या मनात आत्मविश्वास आणि नव्या विचारांची बीजे रोवणारे आहेत. काँग्रेसने हे दाखवून दिले की, सत्ता असो वा नसो, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर आहेत, असे सपकाळ म्हणाले. सपकाळ यांनी बोलताना भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
IPS Rashmitha Rao : सायलेन्सरचा आवाज थांबला, झोन चारचा सूर गाजला
जात, धर्म वाद
सपकाळ म्हणाले, राज्यात अडीच लाख सरकारी पदे रिक्त आहेत. तर केंद्रात अडीच कोटींहून अधिक जागा खाली पडल्या आहेत. पण भाजप भरती करत नाही. दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचे वल्गने हवेत विरले. हे सरकार तरुणांचे शोषण करून श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढवत आहे. सपकाळांनी व्यंग्यात्मकपणे सांगितले की, भाजप राजवटीत ‘राष्ट्रीय शेठ’ असतात, ज्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरले जाते. पण सामान्य तरुणांसाठी काहीच नाही. हे शब्द तरुणांच्या मनातील असंतोषाला आवाज देतात. विजय वडेट्टीवार यांनीही या मुद्द्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, बेरोजगारीचा दर आठ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. 40-50 वर्ष वय झालेल्या तरुणांना नोकरी मिळत नाही. महाराष्ट्रातील रोजगार दुसऱ्या राज्यात जात आहेत. पुण्यातील आयटी कंपन्या गुजरात किंवा इतर राज्यांकडे वळल्या आहेत.
भाजपाच्या काळात उद्योग आणि गुंतवणूक राज्याबाहेर गेली. जात आणि धर्माच्या नावाने वाद निर्माण करून ते परिस्थिती गढूळ करतात. मग रोजगार कसा निर्माण होईल? वडेट्टीवारांच्या या शब्दांनी राजकीय वातावरण तापले आहे. ते पुढे म्हणाले, काँग्रेसने तरुणांना खंबीरपणे साथ दिली आहे, जे भाजप करू शकले नाही.आमदार भाई जगताप यांनी काँग्रेसच्या या उपक्रमाची स्तुती केली. ते म्हणाले, काँग्रेसने करून दाखवले आहे. ज्यांनी नोकरी देण्याचे आश्वासन दिले, त्यांनी ते पूर्ण केले नाही. तरुण, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी संघटना निर्माण करण्याचे काम काँग्रेसने प्रथम केले. हे मेळावे अत्यंत स्तुत्य आहेत. ते राज्यभर राबवले पाहिजेत. आमच्या पक्षाने फक्त आश्वासने नाही दिली, तर प्रत्यक्ष कृती केली आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंचाहत्तराव्या (75) वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना सपकाळांनी व्यंग्य केले.
Prakash Ambedkar : द्वेष, जातीयता अन् मृत्यूचे व्यापारी आहेत मोदी
सपकाळ म्हणाले, संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुचनेनुसार, वयाच्या 75 नंतर वानप्रस्थाश्रमात जावे. मोदी आता राजधर्माचे पालन करणार का? लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची 75 वर्षाचे कारण देत मार्गदर्शक मंडळात रवानगी केली. तसेच मोदीही त्या मंडळात जाणार का? हे शब्द राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. सपकाळांच्या या टीकेने भाजपला अस्वस्थ केले असणार. या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुखपत्र ‘शिदोरी’च्या ‘बेरोजगारचं दाहक वास्तव’ या विशेषांकाचे प्रकाशन झाले. हा अंक बेरोजगारीच्या समस्येवर प्रकाश टाकतो आणि काँग्रेसच्या उपाययोजनांचा उल्लेख करतो. हे प्रकाशन तरुणांसाठी एक मार्गदर्शक ठरेल. ज्यात वास्तविक आकडेवारी आणि समाधानांचा उल्लेख आहे.
