देशात पुन्हा एकदा राष्ट्रीयीकरणाची लाट उसळण्याची चिन्हे दिसत आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली हर्षवर्धन सपकाळ यांनी अदानी-अंबानींच्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
देशाच्या आर्थिक आणि सामाजिक बदलांच्या प्रवासात राष्ट्रीयीकरण हा शब्द एक ऐतिहासिक क्रांतीचे प्रतीक ठरला आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या संपत्तीवर ब्रिटिश सरकारने नियंत्रण घेतले. तेव्हाच शासनाने ‘कंपनी राज’चा अंत घडवून आणला होता. त्याच धर्तीवर, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तेल कंपन्यांनी लष्कराला तेल देण्यास नकार दिला. त्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करून देशाच्या सुरक्षेच्या दिशेने धाडसी निर्णय घेतला. नंतर बँकांचे राष्ट्रीयीकरण करून आर्थिक स्वावलंबनाचा पाया मजबूत करण्यात आला.
आज पुन्हा देश त्या वाटेवर उभा आहे. जिथे आर्थिक असमानता आणि उद्योगपतींचा वर्चस्ववाद समाजाच्या संतुलनावर घाला घालत आहे. अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी इतिहासाचा धागा पकडत नव्या क्रांतीचा नारा दिला आहे. जो आपल्याला आर्थिक न्याय देऊ शकतो.
कंपन्यांच्या राष्ट्रीयीकरणाचा संकल्प
मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या घर हक्क परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाम भूमिका मांडली. ती अशी की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 2029 मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यावर अदानी आणि अंबानी यांच्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करून देशातील संसाधने जनतेच्या हक्कात आणली जातील. राहुल गांधी यांचा लोकशाही, कामगार आणि भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी सुरू असलेला संघर्ष आता नवा टप्पा गाठत आहे. त्यांच्यातूनच देशाला आशेचा नवा किरण दिसत असल्याचे सपकाळ म्हणाले.
मुंबईसारख्या महानगरात घराचे स्वप्न आज सर्वसामान्यांसाठी दुरावले आहे. जमिनींवर धनिकांचा कब्जा वाढत आहे. गरीबांच्या डोळ्यांत घराचे स्वप्न धूसर होत आहे. ‘परवडणारे घर’ प्रत्येक नागरिकाचा जन्मसिद्ध हक्क आहे.ही फक्तच योजना नाही आहे. या भावनेतून सपकाळ यांनी ‘घर हक्क परिषद’ आयोजित केली. या परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, अर्थतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून घरांच्या प्रश्नावर सरकारच्या अपयशावर प्रखर टीका केली.
Mahayuti : राष्ट्रवादीच्या आमदाराने भाजपवर फोडला पाच कोटींचा बॉम्ब
कॉंग्रेस शिक्षक विभागाने आयोजित केलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याने शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्वाला सलाम केला. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यभरातून आलेल्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील आदर्शवत कार्याचा गौरव करून काँग्रेसने समाजातील विचारशील परिवर्तनाची परंपरा जपली. शिक्षक आमदार जयंत आसगावकर, प्रकाश सोनावणे यांच्यासह अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. कॉंग्रेसने या उपक्रमाद्वारे शिक्षण क्षेत्रातील प्रेरक व्यक्तींना प्रोत्साहन देऊन समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश दिला.
