महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : सत्य बोलणं गुन्हा असेल, तर मला पण फाशी द्या

Tushar Gandhi : भाजपला हरवू शकतो, पण RSS नावाचं विष कसे संपवणार

Author

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तुषार गांधींच्या वक्तव्याला पाठिंबा देत भाजप आणि RSS वर घणाघाती टीका केली. त्यांनी म्हटलं, सत्य बोलणं गुन्हा असेल, तर आम्हाला फाशी द्या, पण आम्ही सत्य बोलत राहू.

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केरळमधील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनता पक्षावर (BJP) जोरदार टीका केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः केरळमध्ये तर सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही संघ परिवारावर एकत्रितपणे निशाणा साधला आहे. दुसरीकडे, भाजप आणि RSS नेत्यांनी तुषार गांधी यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया देत माफीची मागणी केली आहे.

तुषार गांधींच्या विधानावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपवर हल्लाबोल करत म्हटले की, ‘तुषार गांधी यांनी जे काही सांगितलं ते 100 टक्के खरं आहे. जर सत्य बोलणं हा गुन्हा असेल, तर त्यांना फाशी द्या. पण तुषार गांधी असोत किंवा कोणीही, आम्ही सत्य बोलत राहू. सत्य दडपण्याचे प्रयत्न नेहमीच केले गेले आहेत, मात्र सत्याला संपवणं अशक्य आहे.

Manikrao Kokate : मंत्रिपद वाचलं, पण कोर्टाच्या निरीक्षणाची चर्चा रंगली

काय म्हणाले गांधी?

वडेट्टीवार यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधत पुढे म्हटले की, भाजप सरकार सत्य बोलणाऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न करत आहे. हे सरकार कितीही प्रयत्न करू दे, आम्ही सत्याचा आवाज बुलंद ठेवणार. तुषार गांधी यांनी जे बोललं, ते धाडस दाखवून बोललं आणि सत्य म्हटलं.

गुरुवारी केरळमधील तिरुअनंतपुरम येथे स्वातंत्र्यसैनिक गोपीनाथन नायर यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात तुषार गांधी यांनी आरएसएस आणि भाजपवर कठोर शब्दांत हल्लाबोल केला. त्यांनी संघाच्या विचारसरणीला ‘विष’ संबोधत म्हटलं, ‘आपण भाजपचा पराभव करू शकतो, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा विषासारखा आहे. तो देशाच्या आत्म्यावर हल्ला करत आहे. जर आत्माच नष्ट झाला, तर देशाचा गाभाच उध्वस्त होईल. ही भीती आपल्याला वाटली पाहिजे.’

BJP vs MNS :धुळवडीच्या दिवशी रंगांचा नाही, तर आरोपांचा पिचकारी

व्यक्त केला ठाम निर्धार

तुषार गांधी यांच्या या विधानानंतर भाजपा आणि आरएसएस कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत त्यांना माफी मागण्यास सांगितले. मात्र तुषार गांधी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, मी माफी मागणार नाही. माझं विधान मी मागे घेणार नाही. कारण मी जे काही बोलतो, ते विचारपूर्वक आणि सत्यावर आधारित असतं.

तुषार गांधी यांच्या या ठाम भूमिकेमुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता असून विरोधी पक्ष भाजप आणि आरएसएसवर अजूनही आक्रमक होईल, असं दिसत आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर भाजप काय उत्तर देतो आणि पुढील राजकीय समीकरणं कशी बदलतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!