महाराष्ट्र

Pratibha Dhanorkar : भद्रावती-वरोरात काँग्रेसची ध्वस्त अवस्था

Chandrapur : भाजप-शिवसेनेत नव्या ताकदीचा शिरकाव

Post View : 32

Author

भद्रावती-वरोरा मतदारसंघात काँग्रेसचा बालेकिल्ला कोसळत असून निष्ठावंत नेत्यांचा भाजप-शिवसेनेकडे ओघ सुरू झाला आहे. या घडामोडींनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या राजकीय भविष्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

भद्रावती-वरोरा विधानसभा मतदारसंघ, जो कधीकाळी काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचा अभेद्य किल्ला मानला जात होता, तो आता खिळखिळा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या निष्ठावंत नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात उडी घेतली आहे. माजी नगरसेवक, बाजार समिती संचालक आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याने पक्षाची अवस्था दयनीय झाली आहे. हा पक्षांतराचा लोंढा खासदार धानोरकर यांच्यासाठी मोठा धक्का ठरला आहे. त्यांच्या राजकीय प्रभावाला तडा गेल्याची चर्चा आहे.

भद्रावती नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसला नगराध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवारच शोधणे कठीण झाले आहे. पक्षातील निष्ठावंत नेत्यांनी एका पाठोपाठ एक पक्षत्याग केल्याने काँग्रेसची पाळेमुळे कमकुवत झाली आहेत. या घडामोडींमुळे खासदार धानोरकर यांच्यासमोर राजकीय संकट उभे ठाकले आहे. पक्षाचे स्थानिक पातळीवरील नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचा आधार उखडला गेल्याने काँग्रेसची निवडणूक रणनीती कोलमडण्याची भीती आहे.

Akash Fundkar : घरचे कर्तव्य निभावून पालक जिल्ह्याचाही जपला वारसा

निष्ठावंतांचा पक्षत्याग

काही दिवसांपूर्वीच खासदार धानोरकर यांचे भासरे आणि भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी सात माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी ठाकरे गटाचे मुकेश जीवतोडे यांनी काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांना सोबत घेऊन शिवसेना (शिंदे गट) मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले रवींद्र शिंदे यांची चंद्रपूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली. आता बाजार समितीचे संचालक राजेंद्र डोंगे यांनीही भाजपमध्ये प्रवेश करत बाजार समितीच्या सभापतीपदावर कब्जा केला आहे. या सततच्या पक्षांतरामुळे काँग्रेसची ताकद क्षीण झाली आहे.

Akola Politics : गुलाबरावांनी पठाणांना दिला आता कोणता कानमंत्र?

काँग्रेसचे दिवंगत नेते बाळू धानोरकर यांनी भद्रावती नगर परिषदेत एकहाती सत्ता प्रस्थापित करत आपल्या राजकीय कारकिर्दीची दमदार सुरुवात केली होती. मात्र, आज त्याच काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. खासदार धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांच्या सल्ल्याने राजकारण करणाऱ्या प्रतिभा धानोरकर यांच्यासमोर आता भद्रावतीत हक्काचा कार्यकर्ताही शिल्लक राहिलेला नाही. पक्षाच्या या अधोगतीमुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस कशी लढणार, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!