महाराष्ट्र

Amravati : विधानसभेतील मतभेद स्थानिक निवडणुकीत रिपीट होणार नाही

Devendra Fadnavis : राणा विरुद्ध खोडके दाम्पत्य वादाला पॉज

Post View : 34

Author

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. अशातच अमरावती जिल्ह्यातील राजकारणही आता तापायला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुमाकूळ सुरू झाला आहे. अमरावती जिल्हा यंदा या लढतीत केंद्रबिंदू ठरतोय. जिथे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत पराभव सहन करावा लागला. पण विधानसभेत एकत्र येऊन त्यांनी सत्ता काबीज केली. मात्र, या दोन पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर मतभेदांची ज्वाला धगधगत आहे. विधानसभा निवडणुकीत राणा दांपत्य (नवनीत राणा आणि रवी राणा) आणि खोडके दांपत्य (सुलभा खोडके आणि संजय खोडके) यांच्यातील लढत ही अमरावतीच्या राजकीय इतिहासातील एक रोमांचक अध्याय ठरली. राणा विरुद्ध खोडके अशी ही चुरशीची टक्कर होती. ज्यात खोडके दांपत्याने मोठा विजय मिळवला.

रवी राणानेही आमदारकी जिंकली. पण या लढतीत राजकीय वैर इतके तीव्र झाले की, ते आता स्थानिक निवडणुकीतही पसरेल की काय, अशी शंका सर्वांना सतावत होती. पक्षाचे नेते आता कंबर कसून तयारीला लागले आहेत. बैठक सत्र, दौरे आणि रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. अमरावतीत महायुतीच्या दोन पक्षांमध्ये अंतर्गत लढत होण्याची शक्यता होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 13 ऑक्टोबरला अमरावतीत पार पडलेल्या भाजपच्या आढावा बैठकीत फडणवीसांनी नेत्यांना स्पष्ट आदेश दिले. विधानसभेतील चुका स्थानिक निवडणुकीत पुन्हा करू नका. राणा आणि खोडके दांपत्यातील वाद प्रदेश पातळीवर पोहोचला होता, ज्यामुळे महायुतीत फूट पडण्याची भीती होती. पण वेळीच हे सर्व शांत झाले. पण स्थानिक पातळीवर हा वाद कधी कधी समोर येतोच.

Chandrapur : घराघरातील होम मिनिस्टर फिफ्टी फिफ्टीच्या खेळात सज्ज 

महायुतीच्या एकजुटीचा प्रभाव

मुख्यमंत्र्यांनी महापालिका निवडणुकीबाबत मोठे विधान केले, ज्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांना दिलासा मिळाला आहे. आता लोकसभा आणि विधानसभेतील जागावाटपाच्या वादाची पुनरावृत्ती होणार नाही. अमरावती महापालिकेत रवी राणा आणि राष्ट्रवादीच्या पालखी वाहण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. लोकसभा आणि विधानसभेत महायुतीने एकत्र लढत असताना जागावाटपावरून मोठे वाद झाले होते. भाजपच्या नेत्यांनी बंडखोरी केली. मित्रपक्षासाठी काम करण्यास नकार दिला होता. महापालिका निवडणुकीत महायुती कायम राहिल्यास आणखी असंतोष होण्याची शक्यता होती. पण फडणवीसांच्या विधानाने हे चित्र बदलले. सोमवारी अमरावती महापालिकेच्या आढावा बैठकीत त्यांनी भाजपचे इरादे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा असते.

उमेदवारांची संख्या भरपूर असते. प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून स्थानिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतले जातील. जिथे शक्य तिथे युती आणि जिथे नाही तिथे समोरासमोर लढत, असा फडणवीसांचा मंत्र आहे. निवडणुकीसाठी भाजपची यंत्रणा सज्ज आहे. युतीबाबत स्थानिक पातळीवर अधिकार दिले जात आहेत. युती शक्य असलेल्या ठिकाणी ती केली जाईल. पण न झाल्यास मित्रपक्षावर टीका करू नये, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही पक्षांना चांगले यश मिळेल, असा दावा फडणवीसांनी केला. अमरावतीच्या राजकीय पटलावर हे बदललेले वारे कसे वाहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे महायुतीची एकजूट, दुसरीकडे स्थानिक मतभेद ही लढत आता अधिक रोमांचक होणार आहे.

Local Body Election : महाराष्ट्र अनुभवणार दर वीस दिवसांनी राजकीय थरार

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!