महाराष्ट्र

Devendra Fadnavis : देवाभाऊंच्या वेगवान विचारांमुळे उपराजधानीला गतीची भेट

Vande Bharat : नागपूर-पुणे प्रवासाला नवी गती देणारा विकासदूत

Post View : 54

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे 10 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

नागपूर आणि पुणे यांच्यातील रेल्वे प्रवासाचा वेग आणि सोय वाढवण्यासाठी एक मोठा टप्पा गाठण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि सक्रिय प्रयत्नांमुळे 10 ऑगस्ट 2025 रोजी नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ही ट्रेन नागपूर- पुणे मार्गावरील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस ठरली आहे. जी केवळ १२ तासांत प्रवाशांना या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये सहज आणि जलद प्रवासाची सोय देणार आहे. ही वेगवान रेल्वे सेवा सुरू झाल्याने विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील संपर्क अधिक घनिष्ट होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ अर्थातच देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही कार्यक्रमात उपस्थित होते.

नागपूर- पुणे प्रवासाची वेळ आधीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी होणार असून, प्रवाशांना आधुनिक वंदे भारतच्या सुविधांचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी रेल्वेमंत्र्यांना स्वतः विनंती केली होती. नागपूर ते पुणे मार्गावरील प्रचंड ट्रॅफिक आणि प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी या वंदे भारत एक्सप्रेसची मागणी केली होती. नागपूर-पुणे प्रवासासाठी एक वेगवान आणि आरामदायक ट्रेन गरजेची आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली आणि रेल्वेमंत्र्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. फडणवीस यांनी प्रवाशांच्या कष्टांना समजून या ट्रेनचा प्रारंभ करून राज्याच्या विकासाला नवा वेग दिला आहे. त्याचबरोबर, नागपूर-पुणे मार्गाचा विस्तार करण्यासाठी पुढील योजना देखील त्यांनी मांडली आहे.

Mahayuti : भाऊ-दादांचा जलवा गाजे, साहेबांचा सूर कुठे लाजे?

भविष्यातील धोरण

नगरवरून थेट पुण्यासाठी रेल्वे मार्ग पाहिजे, असे त्यांनी सांगितले आणि संभाजी नगर ते अहिल्यानगर ते पुणे असा नवीन एक्सप्रेस वे तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. यामुळे पुढील काळात नागपूर- पुणे अंतर शंभर किलोमीटर पेक्षा अधिक कमी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेच धोरण आहे की नागपूरला उपराजधानी म्हणून त्याचा विकास वेगाने आणि परिणामकारक पद्धतीने घडवून आणला पाहिजे. त्यामुळे त्यांनी रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणासंबंधीही सुसज्ज तयारी केली आहे. ज्यामुळे नव्या रेल्वे मार्गासाठी अवघड न येता कामे लवकर होऊ शकतील. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहराच्या विकासासाठी विविध क्षेत्रांत अनेक प्रकल्प राबवले जात आहेत.

नागपूर- पुणे वंदे भारत ट्रेन हा त्यांचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. ज्यामुळे या भागातील लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून येणार आहे. नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस अजनी (नागपूर)हून वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड या ठिकाणांवर थांबताना अखेर पुणे येथे पोहोचणार आहे. या नवीन प्रवासामुळे व्यवसाय, शिक्षण, आणि पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. नागपूरच्या या विकासाच्या प्रवासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठसा जरी स्पष्ट दिसत आहे, तरी येणाऱ्या काळात त्यांचे धोरण आणखी विस्तारेल, याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात ही फडणवीसांच्या सततच्या प्रयत्नांचीच फलित आहे, जी नागपूर शहरासाठी आणि विदर्भ प्रदेशासाठी विकासाचा नवा वारा ठरली आहे.

Chandrashekhar Bawankule : रेतीच्या वाळवंटात कायद्याचा गडगडाट

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!