महाराष्ट्र

Parinay Fuke : मुख्यमंत्र्यांचा साक्षीने दादांनी दिले सशक्त महायुतीचे संकेत 

Bhandara Mahayuti : आदिशक्तीच्या साक्षीने तीन नेत्यांची भेट

Post View : 99

Author

राज्यामधील काही पक्षांचे नेते भारतीय जनता पार्टीवर टीका करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये महायुतीची गाडी सुसाटच असेल, असे संकेत देणारी घटना घडली आहे.

सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचे हेवीवेट नेते माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या घरी देखील दुर्गा उत्सव साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुके यांच्या निवासस्थानी भेट देत दुर्गा पूजन केले. यावरून मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये डॉ. फुके यांच्याप्रति असलेला स्नेहभाव प्रकर्षाने दिसून आला. इतकेच नव्हे तर फडणवीस म्हणा किंवा फुके, दोन्ही एकच आहेत असा संदेशही गेला.

दुर्गा उत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल हे देखील डॉ. फुके यांच्या निवासस्थानी पोहोचले. आजपर्यंत फारसे कोणासोबत न मिसळणारे खासदार पटेल सध्या आमदार डॉ. परिणय फुके यांच्या जवळ आले आहेत. महायुतीचा धर्म पाळत आमदार फुके यांनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे रोपटे वटवृक्ष केले आहे. त्यांच्या या प्रयत्नांना प्रफुल पटेल यांची देखील साथ मिळत आहे. प्रफुल पटेल आणि डॉ. परिणय फुके यांचे आदिशक्तीच्या साक्षीने भेटणे म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महायुतीची घोडदौड कायम राहणार असल्याचे संकेत मानले जात आहेत.

Akash Fundkar : राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळांचा आढावा

विरोधकांना उत्तर 

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये महायुतीत वितुष्ट निर्माण करण्याचे प्रयत्न काही नेत्यांकडून झाले. विशेषतः जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला शह देण्याचा प्रयत्न झाला. परंतु आमदार फुके सर्वांना पुरून उरले. त्यांनी असा हुकमाचा एक्का काढला, की काँग्रेसला जिल्हा परिषद मिळवून देखील कोणताही फायदा झाला नाही. यानंतर दोन्ही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अनेक निवडणुकीत महायुतीने यश मिळवले. या यशाची शिल्पकार परिणय फुके हेच असल्याचे सिद्ध झाले आहे. भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांचे ते पालकमंत्री होते. या दोन्ही जिल्ह्यातील राजकारणावर आजही फुके यांची पकड आहे.

Amravati BJP : ‘शिकवे मिटे, भारतीय घर लौटे’

गोंदिया जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांची होमपीच आहे. मात्र आता खासदार पटेल हे परिणय फुके यांच्यासोबत आल्याने ही जोडी कमाल की’ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नक्कीच कमाल करतील, असे सांगितले जात आहे. लवकरच होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रफुल पटेल यांचे परिणय फुके यांच्यासोबत येणे हा महायुतीसाठी पूर्व विदर्भात शुभ संकेत मानला जात आहे. त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार फुके हेच मुख्यमंत्री असल्याचे वाटते, असे केलेले विधान फुके यांची ताकद किती वाढली आहे हे सिद्ध करते. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यांना भारतीय जनता पार्टीला पूर्व विदर्भ काबीज करणे सोयीचे होईल असे दिसत आहे. यामागे आमदार डॉ. परिणय फुके यांची बुद्धिमत्ता आणि कुटनिती नक्कीच आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!