महाराष्ट्र

Maharashtra Government : देवाभाऊंकडून अधिकाऱ्यांना खास गिफ्ट

Police Officer : राज्यात फडणवीस सरकारचे प्रमोशन सेशन

Post View : 51

Author

राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनातील मोठे निर्णय घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर पदोन्नती देण्यात आल्या आहेत. या पदोन्नतींमुळे अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राज्यातील महत्वाच्या विभागांमध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना या पदोन्नतीमध्ये स्थान देण्यात आले आहे. मुंबई सायबरचे विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव यांना मुंबई सायबरच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. नागरी हक्क संरक्षण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांची पुणे कारागृह आणि सुधारसेवा विभागात पोलिस महासंचालकपदी पदोन्नती झाली आहे. तर महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या अश्वती दोर्जे यांना नागरी हक्क संरक्षण आणि महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी बढती मिळाली आहे.

Vijay Wadettiwar : अनाचाऱ्यांचे सरकार अन् मंत्र्यांचा भ्रष्टाचार

बदली सत्र कायम

राज्य सरकारने काही युवा अधिकाऱ्यांनाही मोठ्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगावचे सहाय्यक पोलिस अधीक्षक तेजवीर सिंग संधू यांची नाशिक ग्रामीण मालेगाव येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली आहे. धीरज कुमार बच्चू यांना अमरावती ग्रामीण अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी बढती मिळाली आहे. तर पुण्याचे सहाय्यक पोलिस अधीक्षक एम. व्ही. सत्य साई कार्तिक यांची गडचिरोलीतील अहेरी येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली आहे.

राज्याच्या गुप्तचर विभागातही मोठ्या पदोन्नती झाल्या आहेत. राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी संस्थेचे आर. बी. डहाळे यांची विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बढती झाली आहे. मुंबई कायदा व सुव्यवस्था विभागातील मनोज कुमार शर्मा यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. राज्य राखीव पोलिस बल विभागाचे अशोक मोराळे यांना पुणे मोटार परिवहन विभागात विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बढती मिळाली आहे.

सरकारवर टीकास्त्र

या मोठ्या प्रमाणावर झालेल्या पदोन्नतींमुळे विरोधकांनी फडणवीस सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांनी यापूर्वीही विधानसभा निवडणुकांनंतर फडणवीस सरकारवर बदल्या आणि पदोन्नतीच्या निर्णयावरून आरोप केले होते. राज्यात बदल्यांचा सपाटा सुरू आहे. गरज नसताना हे सर्व निर्णय घेतले जात आहेत. अधिकारी हे सरकारच्या सोयीसाठी बदलले जात आहेत, असा आरोप विरोधक करत आहेत. आता पुन्हा मोठ्या प्रमाणावर झालेल्या या पदोन्नतींमुळे विरोधकांना संधी मिळाली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!