महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या विधान आणि शिस्तीचा शिजवला खमंग संदेश 

Monsoon Session : सडलेल्या वरणावरून सभागृह तापले वातावरण 

Post View : 27

Author

आमदार निवासातील सडलेल्या वरणावरून पेटलेले आमदार संजय गायकवाड थेट कॅन्टीन कर्मचाऱ्यावर तुटून पडले. मात्र त्यांच्या या कृतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत शिस्तीचा ठाम संदेश दिला.

आमदार निवासातील एका जेवणाच्या ताटातून उडालेला वास आता थेट विधानपरिषदेच्या सभागृहात दरवळू लागला आहे. शिवसेना (शिडणे गट) चे आमदार संजय गायकवाड यांनी ‘निकृष्ट वरण’ प्रकरणावरून थेट कॅन्टीन कर्मचाऱ्यावर हात उगारला. मात्र या प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दांत नाराजी व्यक्त करत लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या हिंसक कृतींवर खडा घातला आहे.

घटनेचा केंद्रबिंदू ठरला आहे आमदार निवास. जिथे रात्रीच्या जेवणासाठी शिवसेना सिंदखेड आमदार संजय गायकवाड यांनी वरण-भात आणि पोळीची ऑर्डर दिली. त्यांनी घेतलेला पहिला घासच इतका आंबट-खवट होता की, तात्काळ त्यांच्या पोटातल्या प्रतिक्रिया ओक्यांमध्ये उमटल्या. वरण तपासले असता ते पूर्णपणे सडलेले होते, असा दावा त्यांनी माध्यमांपुढे केला. गायकवाड म्हणाले, हे केवळ माझ्याच नव्हे, तर इतर हजारो लोकांच्या आरोग्याशी खेळ आहे. मी यापूर्वीही यासंदर्भात तक्रार केली होती. पण हलगर्जीपणा सुरूच आहे. मी जे केलं, ते योग्यच केलं. कोणताही पश्चाताप नाही.

विधानभवनात संतापाचा वास 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर विधानपरिषदेत बोलताना थेट गायकवाड यांना जाब विचारला. ते म्हणाले, सत्तेच्या बळावर जर कोणी मारहाण करत असेल, तर तो लोकशाहीचा अपमान आहे. चुकीच्या गोष्टी असतील, तर कारवाईची व्यवस्था आहे, पण त्यासाठी हात उगारणे योग्य नाही. यामुळे जनतेत चुकीचा संदेश जातो. फडणवीसांनी जणू या वक्तव्याने सत्तेच्या खुर्चीत बसलेल्यांना आरशात बघायला लावलं. त्यांनी स्पष्ट सांगितले की, याप्रकरणी कारवाई होणारच आणि ती कठोरही असू शकते.

या घटनेवरून विरोधकांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. काहींनी गायकवाडांच्या वागणुकीवर टीका केली, तर काहींनी हा सत्तेचा उन्माद आहे. सामान्य कर्मचाऱ्यांना मारहाण करणं ही लोकशाहीची घृणास्पद थट्टा आहे, असं म्हणत सरकारलाच प्रश्न विचारले. गायकवाड यांनी जेवणाच्या दर्जाबाबत उपस्थित केलेला प्रश्न रास्त असला, तरी त्याचा मार्ग चुकीचा असल्याचं आता राजकीय व सामाजिक स्तरावर बोललं जातंय. जेवणातील त्रुटी म्हणजे आरोग्याशी खेळच. पण त्यावर उपाय म्हणजे चपलेचा मार नव्हे, तर कडक व्यवस्था.

Parinay Fuke : भ्रष्ट आयएएस अधिकाऱ्यांचा आमदाराने केला पर्दाफाश

राजकीय शिस्तीचा धक्का?

राज्यातील लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणं आता वेळेची गरज आहे, हे फडणवीसांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं. त्यांच्या कारवाईच्या घोषणेनंतर गायकवाड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. ही घटना केवळ एका आमदाराच्या जेवणापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती सत्तेच्या वापराचा, व्यवस्थेच्या दोषांचा आणि लोकशाहीच्या शिष्टाचारांचा आरसा ठरतेय. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलेली गंभीर दखल हे दाखवून देते की, सत्ताधाऱ्यांसाठीही आता नियम हेच जेवणाचे खरं मसालेदार गुपित आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!