महाराष्ट्र

Anandacha Shidha : शिंदेंच्या योजनांना देवभाऊंचा पूर्णविराम

Nana Patole : भाजप नेत्यांना वाय-प्लस सुरक्षा, शिंदे गटाच्या आमदारांना धोका

Post View : 17

Author

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांचा अंतर्गत संघर्ष वाढताना शिंदे सरकारच्या योजनांना फडणवीस सरकारने अडथळे आणल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विशेषतः आनंदाचा शिधा योजना बंद केल्याने जनतेत नाराजी आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची जोरदार चर्चा सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना विविध मुद्द्यांवरून धारेवर धरत आहेत. मात्र, यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा राजकीय संघर्ष. महायुती सरकारमध्ये असूनही दोन्ही नेत्यांमध्ये वाढती दरी स्पष्ट दिसून येत आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आरोप केला आहे की, शिंदे सरकारने घेतलेले निर्णय आणि सुरू केलेल्या योजनांना फडणवीस सरकार पूर्णविराम लावत आहे.

राज्य सरकारच्या अनेक लोकहिताच्या योजना बंद केल्या जात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यामध्ये विशेषतः ‘आनंदाचा शिधा योजना’ बंद करण्यात आल्याने जनतेत नाराजीचा सूर उमटला आहे. ही योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतांना यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली होती, ज्यातून राज्यातील तब्बल 1 कोटी 63 लाख लोकांना लाभ मिळत होता. दिवाळी, गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीसारख्या सणांच्या वेळी केवळ 100 रुपयांमध्ये गरजूंना 5 वस्तू पुरवले जात होते.

Chandrashekhar Bawankule : जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता पोलिस पडताळणी 

विरोधकांचा हल्लाबोल

राज्याच्या तिजोरीतील तुटीमुळे ही योजना बंद केल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. परंतु, विरोधक यामागे वेगळे कारण असल्याचा दावा करत आहेत. विशेषतः, लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी वितरित केल्याने आनंदाचा शिधा योजनेला फटका बसला आहे असे बोलले जात आहे. शिंदे गटाच्या आमदारांना सुरक्षा कमी भाजपा आमदारांना मात्र वाय प्लस सुरक्षा अशीही चर्चा सुरु आहे.

नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात अनेक नवनवीन योजनांची घोषणा करण्यात आली. मात्र आंदनदाचा शिधा योजना टाळताना दिसली. आनंदाचा शिधा योजना बंद झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा निवडणुकीपूर्वी मतांसाठी वापरले आणि आता त्या योजना बंद केल्या असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.

Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रीजी आप आगे बढो, हम आपके साथ है 

महायुतीत संघर्ष

महाराष्ट्राच्या राजकारणात महायुती सरकारमधील विसंवाद आणि राजकीय खेळी अधिक उघड होत आहेत. भाजप आणि शिंदे गटातील तणाव सुरुवातीपासूनच स्पष्ट होता, मात्र आता हा संघर्ष अधिकच उफाळून येत आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, भाजप शिंदे गटाला बाजूला करून नवीन समीकरणं रचण्याच्या तयारीत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!