महाराष्ट्र

Sulbha Khodke : पालकमंत्र्यांच्या टेबलावर विकासाची फोडली डरकाळी

Amravati : रुग्णांपासून खेळाडूंपर्यंत प्रगतीचा प्रकाश

Post View : 22

Author

अमरावतीच्या विकासासाठी आमदार सुलभा खोडके यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महापालिकेसाठी अतिरिक्त निधीची मागणी केली.

राजकारण हे फक्त सत्तेची खुर्ची मिळवण्यापुरते मर्यादित नाही, तर ते समाजाला नवी दिशा देण्याचे, सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवण्याचे प्रभावी साधन आहे. हे सिद्ध करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अमरावतीच्या आमदार सुलभा संजय खोडके यांनी आपल्या कणखर नेतृत्वाने आणि विकासाच्या दृष्टिकोनाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे. शुक्रवारी, (29 ऑगस्ट 2025 रोजी) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सुलभा खोडके यांनी अमरावतीच्या विकासासाठी जोरदार मागण्या मांडत उपस्थितांना विचार करायला भाग पाडले.

सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. त्यांच्यासमोर सुलभा खोडकेंनी अमरावतीच्या विकासाची खरी गरज स्पष्ट केली. सुलभा खोडकेंच्या प्रत्येक शब्दातून त्यांचा सामाजिक बांधिलकीचा आणि अमरावतीच्या प्रगतीचा ध्यास स्पष्ट झाला. त्यांनी अमरावती महानगरपालिकेसाठी मागील काही वर्षांत निधी वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. यंदाच्या 2025 -26 नियोजनात महापालिकेसाठी 62 कोटींची तरतूद झाली असली, तरी शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेता, हा निधी अपुरा आहे, असे सुलभा खोडकेंनी ठणकावले. त्यांनी थेट 100 कोटींचा निधी मंजूर करण्याची मागणी मांडली. जेणेकरून मूलभूत सुविधा आणि विकासकामांना गती मिळेल.

Parinay Fuke : जरांगेंच्या आंदोलनामागे मविआचा रिमोट कंट्रोल

शैक्षणिक संस्थांची दुरुस्ती

सुलभा खोडकेंच्या मागण्यांचा आवाका केवळ निधी पुरता मर्यादित नव्हता. तर त्यांनी सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजांवरही लक्ष केंद्रित केले. विशेषत: जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) परिसरात रुग्णांच्या नातेवाइकांसाठी प्रतीक्षालय बांधण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा जोरकसपणे मांडली. मेळघाटसारख्या दुर्गम आदिवासी भागातून येणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक रुग्णालय परिसरात निवारा आणि सुविधांविना ताटकळत राहतात. यासाठी 495.95 लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे. सुलभा खोडकेंनी हा मुद्दा प्रत्येक बैठकीत सातत्याने मांडत या गरजेकडे लक्ष वेधले आहे. यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निधी नियोजनासाठी समितीला सूचना केल्या. ज्यामुळे प्रतीक्षालयाच्या स्वप्नाला आता खऱ्या अर्थाने बळ मिळेल.

शिवाय, सुलभा खोडकेंनी अमरावतीच्या क्रीडा क्षेत्राकडेही विशेष लक्ष दिले. जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी स्वतंत्र 5 कोटींचा निधी आणि नवीन लेखाशीर्ष (हेड) निर्माण करण्याची मागणी त्यांनी मांडली. खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी त्यांचा हा आग्रह होता. त्याचबरोबर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि शासकीय शैक्षणिक संस्था जसे की शासकीय तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या दुरुस्ती व देखभालीसाठीही स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली. या संस्था 50-60 वर्षे जुन्या असून, त्यांच्या जीर्ण अवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, हे सुलभा खोडकेंनी स्पष्ट केले.  अमरावतीच्या विकासाची नवी पहाट उगवण्याच्या दृष्टीने खोडके यांचे महत्त्वाचे पाऊल पडले.

Sanjay Rathod : कुशीत घेतलेल्या जिल्ह्याच्या आवाजाला पालकमंत्र्यांचा प्रतिसाद

आभा चव्हाण | Abha Chavhan

आभा चव्हाण | Abha Chavhan

आभा चव्हाण् यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात द लोकहित लाइव्हपासून केली. त्यांना ऑनलाइन मीडिया आणि तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान आहे.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!