प्रशासन

Chandrapur Police : ब्रह्मपुरीच्या डीवायएसपींची चौकशी

Bramhapuri : एफआयआर नसताना ट्रकची जप्ती

Post View : 31

Author

चिमूर पोलीस ठाण्यात दहा दिवसांपासून उभ्या असलेल्या ट्रकचे प्रकरण गाजत आहे. याप्रकरणाची आता चौकशी सुरू झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्याविरोधात निष्क्रियतेच्या आरोपांमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गस्तीच्या वेळी जाधव यांनी वाळूने भरलेला ट्रक जप्त केला होता. हा ट्रक चिमूर पोलीस ठाण्यात उभा करण्यात आला. दहा दिवसांपर्यंत याबाबत कोणतीही एफआयआर दाखल करण्यात आली नाही. पंचनामा (चौकशी अहवाल) करण्यात आला नव्हता.

पोलिसांनी जप्तीची प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे पोलिस विभागात चर्चेला पेव फुटले होते. ही बाब कळल्यानंतर पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर काटकडे यांच्यामार्फत एसडीपीओ जाधव यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू केली आहे. जाधव यांच्या चौकशीमुळे त्यांच्यासह काही अधिकारी अडचणीत येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Nagpur : आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांसाठी अपार्टमेंट

आर्थिक देवाणघेवाण

28 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री गस्तीवर असताना, एसडीपीओ राकेश जाधव यांनी चिमूर येथील हजारे पेट्रोल पंपाजवळ वाळूने भरलेला एक हिवा ट्रक जप्त केला. ट्रक पोलिस ठाण्यात उभा करण्यात आला. मात्र परंतु कोणताही चौकशी अहवाल तयार करण्यात आला नाही. स्टेशन डायरीत देखील याची नोंद करण्यात आली नव्हती. ट्रक दहा दिवस पोलिस ठाण्यातच बेवारसपणे उभा राहिला. चिमूर पोलीस ठाण्याचे अधिकारी दिनेश लबडे यांनी यावर आक्षेप घेतला. संपूर्ण घटनेचा लेखी अहवाल पोलीस अधीक्षकांना पाठवला. त्यानंतर 8 नोव्हेंबरला एफआयआर दाखल करण्यात आला.

तपासात अनेक धक्कादायक बाब पुढे आली. ट्रकचे मालक धनपाल गभणे यांनी याबाबत माहिती दिली. भंडारा जिल्ह्यातील सावर्ला गावातील विवेक राजू दोनाडकर यांना हा ट्रक विकला होता. तपासात वाळू तस्करीसाठी ट्रक वापरला जात असल्याचे उघड झाले. चौकशीत दोनाडकर यांनीही ट्रक जप्त केल्यानंतर आर्थिक व्यवहार झाल्याचे कबूल केले. या आर्थिक व्यवहारामुळे 10 दिवस पोलिस ठाण्यात कोणतीही कारवाई झाली नसल्याची चर्चा पोलिस विभागात आहे.

IPS Transfer : राज्य पोलिस दलात लवकरच फेरबदल

प्रकाराची पुनरावृत्ती

13 ऑक्टोबर रोजी एसडीपीओ राकेश जाधव यांनी नागभीडमध्ये नोंदणी नसलेल्या ट्रॅक्टरविरुद्ध कारवाई केली. ट्रचा वापर करून बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक केल्याचा यात आरोप होता. ट्रॅक्टरला जप्त करण्यात आले. परंतु एका लोकप्रतिनिधीच्या आवाहनानंतर ट्रॅक्टर सोडण्यात आले. यात फक्त दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्याच दिवशी वाळूने भरलेला हाच ट्रॅक्टर ब्रह्मपुरी सीमेवर आला. ब्रह्मपुरी पोलिसांनी ट्रॅक्टर पुन्हा ताब्यात घेतला. त्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. मुमक्का सुदर्शन यांनी आर्थिक व्यवहाराची तक्रार प्राप्त झाल्याने चौकशी केल्याचे स्पष्ट केले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!