महाराष्ट्र

राज ठाकरेंनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर फडणवीस देतील: Sanjay Raut

EVM प्रश्नावर हल्लाबोल

Post View : 16

Author

संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप करत फडणवीस सरकारच्या धोरणांची तीव्र निंदा केली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा EVM संदर्भात वाद उफाळला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी EVM संदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, झालेले मतदान कुठे गेले? हे एक रहस्य असल्याचे म्हटले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर तोफ डागली आहे. फडणवीसांनीच या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

राज ठाकरे यांनी विद्यमान आमदार राजू पाटील यांचे उदाहरण देत त्यांच्या गावातील हक्काचे मतं कुठे गेली? असा सवाल केला होता. गावात चौदाशे मतदार असूनही एकही मत न मिळणे आश्चर्यकारक असल्याचे ठाकरे म्हणाले होते. या प्रकारावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी हे प्रश्न गंभीर असल्याचे सांगत फडणवीसांनी उत्तर दिलेच पाहिजे असे स्पष्ट केले.

भाजपचा मास्टरस्ट्रोक? Uddhav Thackeray गटाचे सहा खासदार भाजपच्या वाटेवर!

भाजपच्या काळात वाढ

संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील वाढत्या जातीय राजकारणावरही घणाघात केला. भाजपने राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्य जात, उपजात, पोटजातीत विभागले गेले आहे. मराठा विरुद्ध ओबीसी आणि ओबीसी विरुद्ध दलित असे राजकारण रंगले असल्याची टीका राऊत यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीच्या राजकारणाला खतपाणी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यात धर्म आणि जातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ज्याच्या मागे जातीचे पाठबळ आहे त्याच्यासाठी कायदा नरम आणि वाकलेला असतो. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हेही जातीचा विचार करून निर्णय घेत आहेत, असे राऊत म्हणाले.

दावोसमध्ये एका चिमुकल्याने मारला Devendra Fadnavis यांचा ‘मी पुन्हा येईन’ हा डायलॉग 

 

धनंजय मुंडे प्रकरणावरही टीका

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरही संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री फडणवीसांनी अंतिम निर्णय अजित पवार घेतील असे सांगितल्यावर राऊत यांनी ही टोलवा-टोलवी आहे, असे म्हटले. देशाचे गृहमंत्री अमित शाह काय करत आहेत? राज्यातील सरकार त्यांच्या कृपेने आले आहे. त्यांनीच EVM सेट केले आहेत, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

राज्याचे भविष्य धोक्यात असून सातत्याने शिवसेनेला तोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी दिल्लीतील सत्ता कामाला लागली आहे, असेही राऊत म्हणाले.

शिवसेनेच्या बाजूने भूमिका घेणे हे सध्या प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगत संजय राऊत यांनी राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत, अशी मागणी केली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!