महाराष्ट्र

Nagpur : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात एव्हिएशनचा झेंडा फडकणार

Chandrashekhar Bawnkule : नागपूर ठरेल जागतिक ‘जेट सिटी’

Author

भाजप सरकारच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने, मेक इन इंडियाला चालना देत नागपूरच्या आकाशात प्रथमच फाल्कन प्रकल्प भरारी घेणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार सत्तेवर आली आणि विकासाची गाडी थांबली नाही. उलट ती अधिक वेगाने धावू लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ‘विकास’ हेच आपले प्रमुख शस्त्र बनवले आणि याचा ठसा त्यांच्या गृहजनपदात नागपूरमध्येही प्रकर्षाने दिसतो आहे.नागपूर हा उपराजधानीचा शहर म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आता ‘डिफेन्स हब’ नंतर ‘एव्हिएशन हब’ म्हणूनही नावारूपास येत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आता फाल्कन 2000 या प्रगत बिझनेस जेटची निर्मिती नागपूरमध्ये होणार असल्याची घोषणा. हे विमान भारतात पहिल्यांदाच आणि फ्रान्सबाहेर प्रथमच तयार होणार आहे.

ऐतिहासिक प्रकल्पाचा करार पॅरिसमध्ये डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस यांच्यात नुकताच झाला आहे.राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही याबाबत माहिती देताना सांगितले की, नागपूरच्या मिहान प्रकल्पात होणारी फाल्कन 2000 निर्मिती भारताच्या एरोस्पेस क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. हे प्रकल्प ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने मोठे पाऊल आहे. हा करार म्हणजे भारताची जागतिक पातळीवरील उपस्थिति अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न आहे. अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, ब्राझील या देशांच्या पंक्तीत आता भारताचाही समावेश झाला आहे.

Harshwardhan Sapkal : मराठीच्या पाठीवर हिंदीचा कट्यार 

यशाचा नागपुरी रनवे

नागपूरमधील डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड (DRAL) हे उत्पादन केंद्र आता ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून उदयास येणार आहे.फाल्कन 2000 शिवाय याच केंद्रात फाल्कन 8X आणि 6X  असेम्ब्लीसुद्धा होणार असल्याने नागपूरचं नाव जागतिक विमानन नकाशावर झळकणार आहे. या प्रकल्पातून 2028 पर्यंत पहिले मेड इन इंडिया फाल्कन जेट तयार होणार असून त्याचा वापर कॉर्पोरेट तसेच लष्करी वापरासाठी केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले, नागपूर आणि महाराष्ट्रासाठी ही मोठी बातमी आहे. फाल्कन 2000 बिझनेस जेट्स आता ‘मेड इन नागपूर’ म्हणून ओळखली जातील.

फ्रान्सबाहेर प्रथमच डसॉल्टने ही जबाबदारी भारतावर सोपवली आहे, ही गोष्ट महाराष्ट्रासाठी गौरवाची आहे. 2017 मध्ये स्थापन झालेली DRAL आता या नव्या उत्पादन क्षमतेमुळे हजारो अभियंते, तंत्रज्ञ यांना रोजगार देणार आहे. हे केंद्र केवळ नागपूरच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या एव्हिएशन आणि डिफेन्स क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून येईल. डसॉल्ट एव्हिएशन ही कंपनी जगभरातील सुमारे 90 देशांना विमाने पुरवते. त्यांनी आतापर्यंत 10 हजार पेक्षा अधिक लष्करी आणि नागरी विमाने तयार केली आहेत. राफेलपासून ते फाल्कनपर्यंत त्यांच्या यशस्वी विमानांची यादी मोठी आहे. या प्रकल्पामुळे भारताला ना केवळ ‘मेक इन इंडिया’ ला चालना मिळणार आहे. तर जागतिक पातळीवर भारताची क्षमता अधिक दृढ होणार आहे. नागपूर आता यशाचा ‘रनवे’ ठरत आहे. त्यावरून फक्त विमाने नव्हे, तर संधीही भरारी घेणार आहे.

Nana Patole : महायुतीने पुसला मातृभाषेचा वारसा

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!