प्रशासन

Teacher Recruitment Scam : नागपूरच्या माजी उपसंचालकाला अटक

Shalartha ID : शिक्षणाची सिस्टीम झाली हॅक

Author

नागपूर जिल्ह्यात शालार्थ आयडी घोटाळ्यात बनावट शिक्षकांच्या नावावर करोडोंचा अपहार उघड झाला आहे. अनेक वरिष्ठ शिक्षण अधिकारी अटकेत.

गेल्या काही महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या वातानुकुलीत दालनात केवळ निर्णय नव्हते, तर भ्रष्टाचाराचे सौम्य झोत वाहत होते. मात्र, नागपूर जिल्ह्यात नुकतेच उघडकीस आलेले शालार्थ आयडी घोटाळ्याचे प्रकरण म्हणजे शांत पाण्यातील खळबळ, वादळाची खरी नांदीच ठरली. शिक्षक भरतीपासून ते शासकीय यंत्रणेतील संगणकीय सिस्टीमच्या गैरवापरापर्यंतचा हा गुंता केवळ धक्कादायक नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे करणारा आहे. या घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ होतोय, असे स्पष्ट दिसते. शिक्षण व्यवस्थेचा पाया डळमळीत करण्याचे काम काही मोजक्या भ्रष्ट अधिकार्‍यांनी संगनमताने केले.

नागपूर पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह अनेकांना अटक केली. पण जशी तपासाची गती वाढली, तसतशी पानांआड लपलेली स्फोटक माहिती समोर येऊ लागली.या प्रकरणात आता संभाजीनगर शिक्षण मंडळाच्या सचिव आणि नागपूर विभागाच्या माजी उपसंचालक वैशाली जामदार यांनाही अटक झाली आहे. त्यांच्या विरोधात बनावट कागदपत्रांच्या आधारे अपात्र शिक्षकांच्या नियुक्तीला मंजुरी दिल्याचा आरोप आहे. जामदार यांना यापूर्वी अनेकदा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, पण त्या सातत्याने अनुपस्थित राहात होत्या. ज्यामध्ये अटक झालेले उल्हास नरड यांच्याआधी त्या नागपूर विभागात कार्यरत होत्या, हेही विशेष लक्षात घेण्याजोगे आहे.

Praful Patel : सत्तेच्या समरात राष्ट्रवादीचे स्वबळावर सिंहगर्जन

चौकशी समिती गोंधळात

उल्हास नरड यांच्या संगणकीय पासवर्डचा वापर करून बनावट आयडी तयार करण्यात आले, ही बाब संशयाच्या भोवऱ्यात अधिकाधिक लोकांना खेचून घेणारी आहे. 22 मे रोजी पोलिसांनी लक्ष्मण मंघाम नावाच्या मुख्य आरोपीला अटक केली. वाडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये लपून बसलेल्या मंघामने उपसंचालक नरड यांचा पासवर्ड चोरून घरीच बसून 580 बनावट शालार्थ आयडी तयार केल्याचे निष्पन्न झाले. हे आयडी बनावट शिक्षकांच्या नावे तयार करून, त्यांना बेकायदेशीरपणे वेतन मंजूर करण्यात आले होते. या कारवायांमध्ये संलग्न असलेले अनेक अधिकारी, कर्मचारी आणि बनावट शिक्षक अटकेत आले आहेत.

अनिल पारधी, नीलेश मेश्राम, पराग पुडके, संजय दुधाळकर आणि सूरज नाईक यांचाही समावेश आहे. बहुतेकजण सध्या जामिनावर आहेत, मात्र चौकशी अजून संपलेली नाही. या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक पैलू म्हणजे चौकशी समितीच्या अध्यक्षालाच अटक झाली आहे. चिंतामण वंजारी जे माजी शिक्षण उपसंचालक असून याच प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या समितीचे प्रमुख होते. यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी सादर केलेल्या अहवालात 580 बनावट आयडींचा उल्लेख केला होता, पण प्रत्यक्षात ते स्वतःच त्या कारवायांमध्ये सामील असल्याचे उघड झाले.

Devendra Fadnavis : पाकव्याप्त काँग्रेस एक नवा धोका 

पडसाद मंत्रालयात पोहोचले

वर्ष 2019 पासून सुरू झालेला हा शालार्थ घोटाळा आता इतक्या मोठ्या प्रमाणावर उघडकीस आला आहे की, त्याचे पडसाद मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत. अनेक शिक्षक आमदारांनी याविषयी वारंवार विधानसभेत आवाज उठवला होता, मात्र तोपर्यंत केवळ मौन आणि दुर्लक्षच दिसून येत होते.शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यामध्ये लक्ष घातल्याने कारवाईस गती मिळाल्याचे बोलले जात आहे. पण हा घोटाळा केवळ आर्थिक नाही, तर नैतिकतेच्या अधःपतनाचेही उदाहरण आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत खेळणार्‍या प्रणालीत सुधारणा होणे अत्यावश्यक आहे.शालार्थ आयडी घोटाळ्याने दाखवून दिले आहे की, सिस्टीम हॅक होऊ शकते, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नुकसान रोखणे आता शासन आणि समाज दोघांचीही जबाबदारी आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!