प्रशासन

Police Bravery : अंधारावर मात करत गडचिरोलीच्या मातीचा दीपोत्सव

Gadchiroli Police : शहीद कुटुंबीयांसाठी विशेष दिवाळी फराळ

Post View : 38

Author

गडचिरोली, विदर्भातील एक संवेदनशील जिल्हा, जिथे रात्री लोक बाहेर फिरत नाहीत आणि भीतीचे वातावरण असते. येथे लोक दररोज संघर्ष करतात. पण त्यांच्या मनात शौर्य आणि आशेचा दीप कायम प्रज्वलित असतो.

गडचिरोली, विदर्भाचा असा भाग जिथे बाकीचं जग रात्रीचा आनंद साजरा करतं, दिव्यांच्या उजेडात रंगतं. पण गडचिरोलीत सायंकाळ पडताच भीतीचं सावट उतरू लागतं. तिथे दुपारनंतर रस्ते ओस पडतात, वाऱ्यालाही गती नसते. जंगलात कुठेतरी गोळीबाराचा प्रतिध्वनी ऐकू येतो. जिथे इतरत्र दिवाळीच्या फटाक्यांनी आकाश गजबजलेलं असतं. तिथे दररोजच बॉम्ब, भूसुरंग आणि बंदुकींच्या आवाजात आकाश दणाणतं. तरीही या मातीच्या शिरांमध्ये एक आग आहे. ती म्हणजे तग धरण्याची, जिद्दीची, धैर्याची आणि देशप्रेमाची. या प्रदेशातील नागरिकांची धडपड, शौर्य आणि साहस या सर्व भावनांनी भरलेली आहे. दररोजच्या संघर्षातही ते आपल्या परंपरांचा सन्मान राखतात. आपल्या मातीची आणि देशाची रक्षा करण्यासाठी नेहमी तयार असतात.

गडचिरोलीच्या प्रत्येक कुटुंबात काहीतरी हरवलं आहे, कुणी वडील, कुणी भाऊ, कुणी मुलगा. पण हरवलेलं हे त्या घरासाठी फक्त एक व्यक्तिमत्त्व नसतं, तर घराचा प्रकाश असतो. प्रेमाचा आणि स्नेहाचा दिवा असतो. तरीही हे लोक जगतात. दुःखातही शौर्याने, अंधारातही आशेच्या किरणाने. त्यांच्या हृदयात दिव्यांसारखी स्मृती प्रज्वलित असते. ज्याला कोणतीही अडचण किंवा संकट विझवू शकत नाही. शौर्य आणि बलिदानाची ही कहाणी त्यांच्या प्रत्येक दिवसात, प्रत्येक क्षणात दडलेली आहे.

Harshwardhan Sapkal : मतदारयादीतील गोंधळापासून ‘मनाचे श्लोक’पर्यंत

कृतज्ञतेचा उजेड

गडचिरोली जिल्हा हा माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून ओळखला जातो. या मातीतल्या पोलीस जवानांनी माओवादाच्या दहशतीवर जिद्दीने मात केली आहे. या संघर्षात गडचिरोली पोलीस दलातील तब्बल 213 जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले. आपलं जीवन देशासाठी वाहिले. त्यांच्या त्यागाचा सन्मान राखत याही वर्षी गडचिरोली पोलीस दलाने दिवाळीचा सण शौर्याला आणि कृतज्ञतेला अर्पण केला. या कार्यक्रमात उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या भावनिक, आर्थिक आणि सामाजिक अडचणी समजून घेत त्यांना आधारही दिला.

अपर पोलीस महासंचालक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या प्रमुख उपस्थितीत 16 ऑक्टोबरला शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी पोलीस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांची उपस्थिती या सोहळ्याला विशेष तेज देणारी ठरली. कार्यक्रमादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. फराळाच्या भेटीद्वारे त्यांनी गोडी आणि आत्मीयतेचा संदेश दिला. त्यांच्या हस्ते दिलेली भेट म्हणजे एका कुटुंबाचा हात दुसऱ्या कुटुंबाच्या खांद्यावर ठेवण्यासारखी होती.

Local Body Election : जागावाटपाच्या जुगलबंदीत कलहाचे काळे ढग

आश्वासक, संवेदनशील आणि आत्मीयतेने भरलेली. या दिवाळीत सणाचा आनंद तर होताच. पण बलिदान, शौर्य आणि कृतज्ञतेचा एक महान संदेशदेखील होता. गडचिरोलीत आजचा दिवस अंधारातून उजेड शोधणाऱ्या लोकांच्या धैर्याचा आणि देशभक्तीचा उत्सव होता. शौर्य, स्मृती आणि प्रेम यांचं मिश्रण असलेल्या या दिव्यांनी गडचिरोलीच्या आकाशात असा उजेड पसरवला. जो फटाक्यांच्या आवाजात हरवत नाही. तो कायमच्या प्रकाशाचा आहे. देशभक्तीच्या तेजाचा आहे. मानवतेच्या संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. गडचिरोलीत या दिवाळीने प्रत्येक कुटुंबाच्या मनात शौर्य, सन्मान आणि आशेची ज्योत प्रज्वलित केली. जी काळाच्या अंधारातही कधीच विझणार नाही.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!