महाराष्ट्र

Prakash Ambedkar : सत्ता हातात द्या, आरक्षणाचा गोंधळ मिटवतो

Maharashtra : भाजपच्या फसव्या जीआरवर मराठा-ओबीसी एकत्र येणार?

Post View : 21

Author

महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा वाद कमी न होता अधिकच वाढत चालला आहे. भाजपच्या जीआर नंतर विरोधकांनी त्यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणाचा मुद्दा जणू आगीसारखा पेटला आहे. रस्त्यावरचे मोर्चे, न्यायालयातील लढाया आणि राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप यामुळे हा विषय सतत चर्चेत आहे. मराठा, ओबीसी, धनगर आणि भटक्या-विमुक्त समाजांच्या मागण्या जोर धरत असताना, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावर थेट हल्लाबोल केला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या नावाखाली सरकार फसवणुकीचा डाव खेळत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

भाजपचा हा जीआर म्हणजे मराठा समाजाला धूळफेक आहे, असे आंबेडकरांनी ठणकावून सांगितले. त्यांच्या मते, मराठा समाजाला खरं आरक्षण हवं असेल तर त्यांनी स्वतंत्रपणे मागणी करायला हवी. अन्यथा हा खेळ फक्त राजकीय डावपेचांचा भाग ठरेल. आंबेडकर यांनी पुढे सांगितले, तुम्ही मला सत्ता द्या, मी हा आरक्षणाचा गहन प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवतो. वंचित बहुजन आघाडीला संधी द्या, आम्ही हा गोंधळ निकालात काढू. त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण वेगवेगळे असायला हवे, असे मत मांडले. त्यांच्या मते, भाजपने काढलेला जीआर हा अजित पवार, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह संपूर्ण मराठा समाजाला फसवणारा आहे.

Prashant Padole : राष्ट्रीय महामार्गाच्या खड्ड्यांवर खासदारांचा ‘फावडा प्रहार’

मनोज जरांगेंना पाठिंबा

सर्व मराठ्यांना कुणबी समजावे, असा जीआर काढून सरकारने ओबीसी समाजाच्या हक्कांवरही कुरघोडी केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ओबीसी समाजाला आता आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावं लागेल, मोर्चे काढावे लागतील आणि मंत्रिमंडळात दबाव टाकावा लागेल, असेही आंबेडकरांनी आवाहन केले. आंबेडकर यांनी भाजपवर समाजात तेढ निर्माण करण्याचा थेट आरोप केला. भाजपच्या शासनकाळात मराठा-ओबीसी, हिंदू-मुस्लिम आणि हिंदू-ख्रिश्चन अशा विविध समाजांमध्ये जाणीवपूर्वक फूट पाडण्याचा प्रयत्न झाला आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते, भाजप सत्तेत येण्यापूर्वी मोठमोठ्या घोषणा करते. पण सत्तेत आल्यानंतर जनतेची फसवणूक करते.

निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा करायची आणि सत्तेत आल्यानंतर त्याकडे पाठ फिरवायची, हा भाजपचा नेहमीचा खेळ आहे, असा टोला त्यांनी लगावला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे कारणही याच धोरणांशी जोडले गेले आहे.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आंबेडकरांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना भाजपच्या जीआरवर टीका केली. हा जीआर जरांगे आणि मराठा आंदोलकांना गंडवणारा आहे. भाजप सांगतं की आम्ही कोणाला फसवत नाही, पण त्यांचा इतिहास जनतेची फसवणूक करण्याचा आहे, असं ते म्हणाले. त्यांनी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी करताना ओबीसी कोट्याला धक्कालावण्याचं आवाहन केलं. मराठा आणि ओबीसी समाजाने एकमेकांविरुद्ध नाही, तर सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध एकत्र लढावं, असं त्यांनी सुचवलंआरक्षणाचा हा गोंधळ कधी सुटणार आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!