महाराष्ट्र

Parinay Fuke : दादांच्या मनामध्ये जय जिनेंद्र?

Rajendra Jain : खादीवर डाग नाही; आता सहकारावर शिक्कामोर्तब

Author

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेच्या निवडणुकीत महायुतीने 11 जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र या विजयानंतर अध्यक्षपदाची जवाबदारी कुणाला मिळेल याची चाहूल पूर्व विदर्भाच्या राजकारणात लागली आहे.

‘जैन समाज’ हा आपल्या सात्विकतेसाठी, अहिंसावादी विचारांसाठी आणि पारदर्शकतेसाठी ओळखला जातो. कधीही कोणालाही त्रास न देता, कोणाचेही नुकसान न करता, समाजहितासाठी कार्य करणारा हा समाज आहे. या समाजाचे प्रतिनिधित्व माजी आमदार राजेंद्र जैन हे पूर्व विदर्भात अभिमानाने करतात. त्यांच्या या विकास कामांचे आणि निष्टेचे फळ अखेर त्यांना मिळाले आहे. पूर्व विदर्भात गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर राजकारणात जोरदार हलचल निर्माण झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेच्या निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश मिळवत तब्बल 11 जागांवर वर्चस्व गाजवले आहे.

विजयाचा झेंडा फडकावणाऱ्या नेत्यांमध्ये राजेंद्र जैन यांचं नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. आता या विजयानंतर राजेंद्र जैन यांना कुबेराच्या खजाण्यचे मालक बनविण्याचा विचार ‘दादांच्या’ मनात आला आहे. राजकारणात अनेकदा आरोपांची कुचंबणा होते. पण राजेंद्र जैन यांचा प्रवास मात्र त्या सगळ्या आरोपांपासून कोसो दूर आहेत. अंगावरील खादीवर एकही डाग नाही, अशी त्यांची ओळख आहे. ना भ्रष्टाचार, ना वाद, ना आरोप. फक्त समाजहित आणि विकास यालाच त्यांनी नेहमी प्राधान्य दिले. विधानसभा सदस्य असताना त्यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला होता. त्यानंतर सहकार क्षेत्रातही आपली विश्वासार्ह छाप सोडली.

Nana Patole : राजदंडापुढे घोषणा महागात; सभागृहातून दिवसभरासाठी निलंबित

डॉ. फुके-पटेल यांची विजयगाथा

अश्या बेदाग विचारांच्या नेत्याला अध्यक्ष बनविण्याचा विचार दादांनी केला आहे. हे दादा दुसरे तिसरे कोणी नसून राजकीय बुद्धिबळाच्या सारीपाटावर विरोधकांना ‘चेकमेट’ करणारे विधान परिषद सदस्य माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके आहेत. सहकार क्षेत्रातही महायुतीचे वर्चस्व अबाधित ठेवणारे भाजपचे जेष्ठ नेते डॉ. परिणय फुके हे एकमेव नेते आहेत. त्यांना यात मदत केली आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांनी. दोन दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यात दूध संघाच्या रणांगणात भगवा फडकावणारे डॉ. परिणय फुके यांनी पुन्हा एकदा आपली अचूक रणनीती सिद्ध केली आहे.

डॉ. फुके यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या रणनितीचा डाव पुन्हा एकदा अचूक लागला. या निवडणुकीत महायुतीने तब्बल 11 जागांवर विजयश्री खेचली आणि स्थानिक सहकार क्षेत्रात भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने फडकला. त्यांच्या या विजयाने हे सिद्ध केलं की सहकार असो किंवा राजकारण डॉ. फुके साहेबांची चाल कधीही चुकीची ठरत नाही. डॉ. फुके आणि पटेल यांच्या या जोडीने गोंदिया जिल्ह्यामध्ये महायुतीला मजबुती मिळवून दिली आहे. पुन्हा एकदा एकमेकांसोबत येत डॉ. फुके आणि पटेल हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती महायुतीचे वर्चस्व कायम राखतील यात शंकाच नाही. दोघांच्या या हातमिळवणीने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा दुथळी भरून वाहत आहे. आता सहकार क्षेत्रामध्येही महायुतीचे वर्चस्व भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये कायम राहणार आहे.

Nana Patole : भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्रिभाषा सक्तीचा प्रयोग

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!