महाराष्ट्र

राज्यपालांसह Sudhir Mungantiwar यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंजचे Chandrapur येथे उद्घाटन

Post View : 34

Author

चंद्रपुरात इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंजचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी राधाकृष्णन आणि माजी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यावरण संवर्धनाबद्दल जनतेला दिला संदेश. 

पर्यावरण संवर्धनाचे धडे शिक्षणाच्या माध्यमातून देण्याची गरज आहे. त्यासाठी पर्यावरण शिक्षणाला प्राधान्य द्यावे लागणार. पर्यावरण संवर्धनासाठी राज्यातील जनतेला प्रवृत्त करावे लागेल. पर्यावरण संवर्धनाची माहिती नागरिकांना असणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. एसएनडीटी महिला विद्यापीठातर्फे आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज- 2025’चे उद्घाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल सी. पी राधाकृष्णन म्हणाले, जसजशी लोकसंख्या वाढत आहे. तसतशी नागरिकांच्या गरजाही वाढत आहेत. निसर्गाने दिलेल्या संसाधनांचा वापर वाढला आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पाण्याची बचत आणि वृक्षांचे रक्षण यावर पर्यावरणाचे संवर्धन अवलंबून आहे. आपण या दोन्हींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे राज्यपाल म्हणाले आहेत.

Saif Ali Khan वरील हल्ल्यामागे कुठल्या टोळीचा हात?

Chandrapur राहणार पुढे

या कार्यक्रमात माजी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित होते. मुनगंटीवार म्हणाले की, परिषदेत फक्त भाषण ऐकण्याचे काम होऊ नये. चर्चा आणि संवाद होणार. चिंता व्यक्त करण्यात येतील. पण केवळ त्यापुरती ही परिषद मर्यादित राहू नये. उपायांवर अंमलबजावणीही करायची आहे, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पर्यावरण संवर्धनासाठी लोकशिक्षण, अंमलबजावणी आणि संशोधन हीच महत्त्वाची त्रिसूत्री आहे, असे प्रतिपादन आमदार मुनगंटीवार यांनी केले आहे.  ‘सी’ फॉर चंद्रपूर, ‘सी’ फॉर ‘क्लायमेट चेंज’च्या युद्धात सर्वांत आघाडीवर राहणार, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.जेव्हा ‘क्लायमेट चेंज’चा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्यात चंद्रपूरचे नाव असले पाहिजे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. एसएनडीटीच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, आमदार देवराव भोंगळे, जलपुरुष राजेंद्रसिंह, एसएनडीटीचे विलास नानीवाडेकर, यूएसचे कॉन्सिलेट जनरल सलील कादेर, कुणी युनिव्हर्सिटी न्यूयॉर्कचे प्राध्यापक नील फिलिप, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, एसएनडीटी बल्लारपूर कॅम्पस संचालक राजेश इंगोले, महापालिका आयुक्त विपीन पालीवाल, गोंडवानाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आदी नेते उपस्थित होते.

पालकमंत्री पदाबाबत Chandrashekhar Bawankule म्हणाले..

Environment Conservation का महत्त्वाचे ?

पर्यावरण संवर्धनामध्ये पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, संरक्षण आणि पुनर्संचयित करणे समाविष्ट आहे. जैवविविधता राखण्यासाठी, हवामानातील बदल कमी करण्यासाठी तसेच मानव आणि सृष्टी या दोघांचे दीर्घकालीन कल्याण सुनिश्चित करण्यासाठी हे आवश्यक आहे. संवर्धनाचे प्रयत्न अधिवासाचा नाश रोखू शकतात, लुप्तप्राय प्रजातींचे रक्षण करू शकतात आणि पर्यावरणातील नाजूक संतुलन राखू शकतात. नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करून, आपण पर्यावरणाचा ऱ्हास कमी करू शकतो. प्रदूषण कमी करू शकतो आणि शाश्वत विकासाला चालना देऊ शकतो.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!