महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : साडे तीन कोटी रुपये उडवण्याइतका मी नक्कीच मोठा नाही

Maharashtra : राज्याच्या राजकारणात 'टिंब' वरून टोमणे

Author

राजकारणात आरोप-प्रत्यारोपाचं रण कायम असताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर बालिशपणाची टीका केली. या टीकेला आता सपकाळ यांनी रोखठोक उत्तर दिले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज शाब्दिक चकमकी घडत असतात. पण यावेळी भाजप आणि काँग्रेसमधील टीका-प्रतिटीकांच्या या नव्या पर्वाने खऱ्या अर्थाने रसिकांची नजर खेचली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दवडत नाहीत. नुकताच एक असाच सामना पाहायला मिळाला. भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोरकटपणाचा आरोप केला.

बावनकुळे यांच्या या विधानांनंतर हर्षवर्धन सपकाळ देखील शांत बसले नाहीत. त्यांनीही आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं. बावनकुळे साहेब, मी लहानच आहे. पण मकाऊच्या कॅसिनोमध्ये एका तासात साडे तीन कोटी रुपये उडवण्याइतका मोठा नक्कीच नाही. सपकाळांनी इशारा दिला की, आकड्यांचा खेळ करणाऱ्यांनी स्वतःच्या इतिहासाकडे पाहावं, इतरांना पोरकट म्हणण्याआधी स्वतःचा वावर तपासावा. त्यांनी माहिती जनसंपर्क विभागाने चूक मान्य केल्याचेही स्पष्ट केले.

Chandrashekhar Bawankule : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर बालिश वर्तवणुकीचा ठपका

जाहिरातीचा गोंधळ

घटनेचा उगम झाला तो काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे यांच्या भाजपमध्ये झालेल्या प्रवेशानंतर. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत थोपटेंचा भाजपमध्ये मोठ्या धुमधडाक्यात प्रवेश झाला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी काँग्रेसवर तसेच हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर बोचरी टीका केली. त्यांनी सपकाळ यांना पोरक संबोधले. सपकाळ अजूनही लहान आहेत. मोठा पल्ला गाठायचा असेल तर आधी पोरकटपणा सोडावा लागेल असे सुचवले. याच मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण तापले आहे.

बालिशपणा करण्याऐवजी खरी माहिती घ्या, असा सल्ला दिला. या साऱ्या गोंधळाची सुरुवात झाली ती चौंडी येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या जाहिरातीच्या खर्चावरून. सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहिरात प्रसिद्ध केली होती. ज्यामध्ये ती जाहिरात दीड कोटी रुपयांची असल्याचे स्पष्टपणे नमूद होते. पण एका वृत्तपत्रात छापलेल्या जाहिरातीत टिंब चुकीमुळे ती 150 कोटींची वाटू लागली. गोंधळलेल्या टिंबावरून सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका करत ही फिजूलखर्ची मानसिकता असल्याचा आरोप केला.

Ram Shinde : नागपूरच्या विधानभवनाचा कायापालट

चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर उत्तर देताना सपकाळ यांच्या टीकेला माध्यमांमध्ये झळकण्यासाठी केलेला पोरकटपणा असे संबोधले होते. त्यांनी सांगितले की, वास्तविक चूक वर्तमानपत्राची आहे. सरकारी संकेतस्थळावरील आकडे बिनचूक आहेत. वृत्तपत्रांवर खापर फोडण्यापेक्षा माहिती जनसंपर्क विभागाकडून माहिती घ्या, असा टोला त्यांनी लगावला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!