
कुही गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने आमदार संजय मेश्राम यांनी जलसंपदा विभागाला सात दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याचा अल्टीमेटम दिला.
कुही तालुक्यातील आजणी गाव अनेक दिवसांपासून भीषण पाणीटंचाईने ग्रस्त आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर उमरेडचे आमदार संजय मेश्राम यांनी जलसंपदा विभागाला ठणकावून सांगितले आहे. येत्या सात दिवसांत ही समस्या सोडवली नाही, तर कठोर पावले उचलली जातील.

आजणी गावातील नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे पाणीपुरवठ्याची मागणी केली होती. मात्र, अद्यापही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना ही समस्या अधिकच गंभीर बनत आहे. ग्रामस्थांनी वारंवार निवेदन देऊनही जलसंपदा विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
अधिकाऱ्यांची बैठक
आमदार संजय मेश्राम यांच्या उपस्थिती 2 एप्रिल 2025 रोजी आजणी येथे पाणीटंचाईच्या समस्येवर आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी प्रशासनाला पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करण्याची जोरदार मागणी केली. आम्हाला कारणं नकोत. आम्ही मागणी केली आहे, आणि ती त्वरित पूर्ण झाली पाहिजे.
आजणी गावात पाईपलाइन टाकण्यात आलेली आहे, मात्र अद्याप त्यावर कनेक्शन मिळालेले नाही. त्यामुळे हा पाणीपुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी आमदारांनी अधिकाऱ्यांना ताकीद दिली आहे. सात दिवसांत पाणी कनेक्शन लागलेच पाहिजे. नागरिकांना नाहक त्रास होऊ नये. आम्ही आधीच पैसे भरले आहेत, डिमांड तुम्हाला पाठवतो. तुमचा विभागीय प्रश्न तुमच्याच विभागाने सोडवायचा, आम्हाला कारणं नकोत.
Parinay Fuke : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी, डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नांमुळे जलक्रांती
उपाययोजनांचे आदेश
आमदार संजय मेश्राम यांनी महावितरण आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, गावकऱ्यांनी पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेले पैसे भरले आहेत. आता प्रशासनाने कोणतेही कारण न देता येत्या सात दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करावा. नाहीतर आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल.