
UPSC नागरी सेवा परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला असून महाराष्ट्राने यंदा यशाचे नवे शिखर गाठले आहे. राज्यातील नऊ वाजून अधिक विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावून राज्याचा झेंडा उंचावला आहे.
केंद्र सरकारच्या विविध उच्च सेवांमध्ये प्रवेशासाठी प्रत्येक वर्षी हजारो उमेदवार कठोर परीक्षेची तयारी करत असतात. यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. देशभरातून एकूण 1009 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्याने एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. 90 पेक्षा अधिक उमेदवारांनी यश संपादन केले आहे.

राज्याच्या गुणवत्तेत आणि कठोर परिश्रमाचे प्रतिक असलेल्या अर्चित पराग डोंगरे यांनी देशभरात तिसरा क्रमांक मिळवून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. याशिवाय, शिवांश सुभाष जगदाळे यांनी 26वा ऑल इंडिया रँक मिळवून राज्याच्या गौरवात भर घातली आहे. यंदाच्या परीक्षेत राज्यातील 7 उमेदवार पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवून दाखवले आहेत, जे एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे.
उमेदवारांची निवड
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 2024 च्या नागरी सेवा परीक्षेतील हे यश राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तराचे आणि कठोर परिश्रमाचे प्रमाण आहे. परीक्षा 2024 मध्ये विविध शासकीय सेवांमध्ये 1009 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. ज्यात भारतीय प्रशासन सेवा (IAS), भारतीय विदेश सेवा (IFS), भारतीय पोलिस सेवा (IPS) आणि केंद्रीय सेवांमध्ये विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यंदाच्या परीक्षेतील यशस्वी उमेदवारांमध्ये 725 पुरुष आणि 284 महिला उमेदवारांचा समावेश आहे. या यशस्वी उमेदवारांमध्ये 50 दिव्यांग उमेदवारांचा समावेश असून, 230 उमेदवारांची आरक्षित सूची तयार करण्यात आली आहे.
अर्चित पराग डोंगरे (03) यांच्या वाचनाची निवड प्रक्रिया एक उत्तम उदाहरण आहे. या यशाची प्रेरणा घेऊन अनेक युवक-युवती आगामी UPSC परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित होऊ शकतात. त्यांच्यापाठोपाठ, इतर यशस्वी उमेदवारांच्या नावांमध्ये शिवांश सुभाष जगदाळे (26), शिवानी पांचाळ (53), अदिती संजय चौघुले (63), साई चैतन्य जाधव (68), विवेक शिंदे (93), तेजस्वी प्रसाद देशपांडे (99), दिपाली मेहतो (105), ऐश्वर्या मिलिंद जाधव (161), शिल्पा चौहान (188), कृष्णा बब्रुवान पाटील (197) आणि यादीतील इतर उमेदवारांनी देखील आपल्या कर्तृत्वाने जागतिक स्तरावर देशाचा ठसा उमठवला आहे.
IAS Transfer : चंद्रपूर, बीड अन् नागपूरला नवे कर्तृत्ववान नेतृत्व
नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये यश मिळवणाऱ्या उमेदवारांच्या यशस्वितेने राज्यभरातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन आशा आणि उत्साह निर्माण केला आहे. या यशाचे श्रेय संबंधित विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम, मार्गदर्शन आणि प्रगतीशील शैक्षणिक धोरणाला जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने अधिकृत निकाल आणि यशस्वी उमेदवारांची यादी www.upsc.gov.in या वेबसाइटवर प्रकाशित केली आहे.