महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : महाविकास आघाडीला काँग्रेसचं इट्स कॉम्प्लिकेटेड साइन

Corporation Elections : हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

Post View : 52

Author

महाविकास आघाडीच्या राजकारणात नवे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेसने स्थानिक स्वराज्य निवडणुकींसाठी स्वतंत्र रणनिती आखत चर्चेचा नवा मुद्दा पेटवला आहे.

राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आलेला पराभव अजूनही गाजत आहे. असे असताना, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची धामधूम सुरू झाली आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या रणनितीवर विचारमंथन करत आहे.

विशेष म्हणजे, काँग्रेस पक्षाने या निवडणुकींसाठी नव्या दिशादर्शक विधानांची नोंद करून राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढवली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानामुळे आघाड्यांच्या समीकरणात सूक्ष्म बदल दिसू लागले आहेत. जे राज्याच्या पुढील राजकीय प्रवासावर ठसा उमटवू शकतात.

Parinay Fuke : वैनगंगेच्या लाटांवर आता लघु उद्योग होणार स्वार

नवीन धोरणाची रूपरेषा

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी काँग्रेसच्या उच्चस्तरीय बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार अमित देशमुख, विश्वजित कदम, मधुकरराव चव्हाण, खासदार डॉ. कल्याण काळे यांसारख्या अनुभवी नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी नव्या रणनितीवर शिक्कामोर्तब झाले. या बैठकीत कार्यकर्त्यांना सक्षम करण्यावर आणि स्थानिक स्तरावर नेतृत्व उभारण्यावर भर देण्यात आला.

काँग्रेसने स्पष्ट केले आहे की, राज्यव्यापी आघाड्यांचे धोरण बाजूला ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक स्वतंत्रपणे लढण्यावर भर देण्यात येणार आहे. आघाडी करण्याचा अधिकार आता शहर, तालुका आणि जिल्हा पातळीवर देण्यात आला आहे. स्थानिक पातळीवरच चर्चा, समन्वय आणि निर्णयप्रक्रिया यावर भर दिला जाईल. या नव्या भूमिकेमुळे काँग्रेस आपली संघटनात्मक ताकद वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करत असल्याचे दिसते.

Maharashtra Government : भंडारा जिल्ह्याला इम्पोर्टेड पालकमंत्र्यांचे वरदान

सरकारवर टीकेची झोड

बैठकीतच हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लाडकी बहीण योजनेत झालेल्या अनियमिततेचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर महिलांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. लाभार्थ्यांना जाहीर केल्यापेक्षा कमी निधी देण्यात आल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली. बोगस लाभार्थी ओळखून संबंधित अधिकाऱ्यांकडून रक्कम वसूल करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. दोषींना सेवेतून दूर करावे, असे मतही त्यांनी मांडले.

स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना मजबूत करण्यावर काँग्रेसने विशेष भर दिला आहे. निवडणुकींमध्ये विजयासाठी केवळ आघाड्यांवर अवलंबून न राहता संघटनात्मक बळकटपणावर भर देणे हा पक्षाचा उद्देश आहे. या रणनितीमुळे महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांचेही समीकरण बदलू शकते. काँग्रेसचा हा निर्णय राज्याच्या राजकारणात नवीन वळण देऊ शकतो.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!