प्रशासन

Akola : महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनाचे भव्य आयोजन

Vidarbha : अकोल्यातून उठणार जनजागृतीची लाट

Post View : 25

Author

अकोल्यात ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन’ आयोजित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये चारशेहून अधिक मंदिर विश्वस्त एकत्र येणार आहेत.

मंदिरसंस्कृतीच्या रक्षणासाठी आणि हिंदू धर्माच्या भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. महाराष्ट्रातील चारशेहून अधिक मंदिरांचे विश्वस्त एकत्र येऊन मंदिरांच्या संरक्षणासाठी आणि हिंदू संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन’ भरवले जाणार आहे. हे अधिवेशन 28 मार्च 2025 रोजी स्वयंभू महादेव मंदिर, अंत्री मलकापूर, अकोला येथे सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत पार पडणार आहे.

अधिवेशनाचे आयोजन महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदू जनजागृती समिती, स्वयंभू महादेव मंदिर अंत्री मलकापूर अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. श्री चंडिका देवी संस्थान कुरणखेड अकोला यांचाही समावेश आहे. याबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली. यावेळी श्री चंडिकादेवी संस्थानचे विश्वस्त प्रशांत देशमुख, अंत्री महादेव संस्थानचे अरविंद देठे, कान्होबा महाराज संस्थानचे पंकज श्रीवास्तव, श्री गजानन महाराज संस्थानचे महेश गाडे, श्री गजानन महाराज विहीर संस्थानचे निळकंठ लांडे आणि हिंदू जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर उपस्थित होते.

Nitesh Rane : राणेंच्या विधानांवर संतापाचा भडका, मोदींकडे तक्रारीचा तडका 

व्यापक संघटन

गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने देशभरातील मंदिरांचे संघटन करण्याचे कार्य सुरू आहे. अकोला शहर आणि तालुक्यातील विविध मंदिर विश्वस्तांना या अधिवेशनात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी मंदिरे भक्तांच्या स्वाधीन असावीत, मंदिर संस्कृती टिकवावी आणि मंदिरे केवळ पूजा-अर्चनेपुरती मर्यादित न राहता ती हिंदू धर्म शिक्षणाची केंद्रे व्हावीत, यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

मंदिर सरकारीकरणाच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार आणि देवस्थान निधीची लूट रोखण्यासाठी मंदिर महासंघाने महत्त्वाचे पावले उचलली आहेत. अनेक मंदिरांच्या भूमी घोटाळेबाजांच्या ताब्यात जाण्यापासून वाचवण्यात आली आहे. विशेषतः कर्नाटकमधील ‘मंदिर आणि धर्मादाय संस्था कर सुधारणा विधेयक 2024’ रोखण्यात महासंघाला यश मिळाले आहे.

Amit Shah : शिवरायांचा जो करेल अपमान, त्याला व्हावे कठोर संधान 

वस्त्रसंहितेचा प्रसार

मंदिर महासंघाच्या प्रयत्नांमुळे आजपर्यंत 15 हजार हून अधिक विश्वस्त, पुजारी आणि धार्मिक संस्था एकत्रित आल्या आहेत. याशिवाय 800 हून अधिक मंदिरांमध्ये ‘वस्त्रसंहिता’ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर संस्कृती आणि परंपरा जपण्याचे कार्य वेगाने सुरू आहे.

येत्या अधिवेशनात मंदिरांच्या भविष्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे. सर्व मठ-मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. हिंदू धर्माच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे अधिवेशन एक ऐतिहासिक पर्व ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!