महाराष्ट्र

Maharashtra Police : बाळाचे पाणावलेले डोळे, खाकीही अस्वस्थ पण..

Festival Bandobast : कर्तव्याच्या बेड्यांमध्ये अडकून पडले पोलिस

Share:

Author

सायंकाळी होत चालली होती. आईबाबांनी घरी येतो हे सांगितले होते. पण ते आले नाही. त्यामुळं एक चिमुकला हिरमुसला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू येत होते. आईबाबांना घरी येण्याची मनापासून इच्छा होती. पण ‘खाकी’ने त्यांच्या पायात बेड्या टाकल्या होत्या.

सध्या राज्यभरात गणेशोत्सव साजरा होत आहे. महालक्ष्मींचेही घरोघरी आगमन झाले आहे. अनेक लोक दुचाकी, चारचाकीत आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांसह गणपतीचे देखावे पाहण्यासाठी बाहेर पडले आहेत. अशात एका चिमुकल्यानेही आपल्या आईबाबांकडे हट्ट धरला. मला गणपती बघायला घेऊन चला. आईबाबांनी पक्के प्रॉमिस केले. आज काही झाले तरी आपण जाऊ. मुलाला केलेले प्रॉमिस आईबाबांना पाळायचे होते. ते निघणारही होते. पण अचानक पावसाचा जोर वाढला. ट्रॅफिक जाम झाला. आईबाबांना घराची ओढ लागली होती. मुलाची आठवण येत होती. पण मध्यरात्री उशिरापर्यंत ते घरी आलेच नाही. ‘खाकी’मुळे. अखेर आईबाबांवर नाराज होऊन चिमुकला रडून रडून झोपी गेला.

मध्यरात्री केव्हातरी आई बाबा घरी आलेत. त्यांनी हिरमुसल्या चेहऱ्यानी झोपी गेलेल्या आपल्या मुलाकडे पाहिले. त्यानंतर खिन्न मनाने एकमेकांकडे पाहिले. आई म्हणाली, झोपलं बिचारं लेकरू नाराजीने हो.. बाबाही म्हणाले, हो गं, त्याला प्रॉमिस केलं होतं. पण आपण आलोच नाही. रुसणार नाही तर काय? आपण आलोही असतो गं वेळेत. सगळे लोक बाइक, कारमध्ये आपल्या मुलाबाळांसह गणपती पहायला निघाले होते. गौरींचा महाप्रसाद घेऊन येत होते. आपलीही इच्छा होती. पण या ‘खाकी’ने आपल्या पायात बेड्या घातल्या. आपण येऊच शकलो नाही.

Raj Thackeray : मराठा बांधवांचा लढा त्रास नाही, गर्व आहे

कहानी घर घर की..

हे कथानक जरी थोडे फार काल्पनिक असली तरी महाराष्ट्रात यापेक्षा वेगळे चित्र नाही. हे चित्र असावे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील पोलिस दलात कार्यरत प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याच्या घरातील. सध्या देशभरात गणेशोत्सव साजरा होत आहे. लोक घराघरातून गणपतीचे देखावे पाहण्यासाठी बाहेर पडत आहेत. सोमवार, 1 सप्टेंबरला महालक्ष्मी भोजन आणि पूजन राज्यात पार पडले. मात्र अचानक पावसाने राज्यात अनेक ठिकाणी जोर धरला. त्यामुळे बाइक सोडून प्रत्येकानं कारचं स्टॅअरिंग हाती घेतलं. ‘द लोकहित लाइव्ह’ने माहिती घेतली तर राज्यातील बहुतांश शहरांमध्ये सोमवारी रात्री पावसानं हजेरी लावली. त्यामुळं अनेक शहरांमध्ये कारनं लोकं बाहेर पडले.

सहाजिकच चारचाकी वाहनांमुळं वाहतूक कोंडी झाली. अनेक ठिकाणी मेट्रो, रस्त्यांची कामं सुरू आहे. त्यामुळं या वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. त्यामुळं मंत्री, राजकीय नेते, पदाधिकारी वेगवेगळ्या मंडळांमध्ये आरती करण्यासाठी दौरे करीत आहे. अशातच सोमवारी महालक्ष्मीचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी अनेक मंत्री, नेते अन् व्हीआयपी वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होते. ‘प्रोटोकॉल’ असल्यानं पोलिस त्यांच्या बंदोबस्तात होते. एकीकडे पावसाचा जोर, दुसरीकडे वाहतूक कोंडी, तिसरीकडे व्हीआयपी मुव्हमेंट असं सुरू होतं. पण महाराष्ट्र पोलिस दलातील शिपायापासून अधिकाऱ्यापर्यंत सगळेच रस्त्यावर होते. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ असे ब्रिद उराशी बाळगत ते चोखपणे बंदोबस्तावर तैनात होते.

Prashant Padole : पंचायत निवडणुकीसाठी खासदाराने रचला रणनीतीचा गड

अंगावरील खाकीच्या बेड्या त्यांना ड्यूटीच्या जागेवरून हलण्याची परवानगी देत नव्हत्या. पण, त्यांचं चित्त त्यांच्या पाखरांमध्ये होतं. पोलिसांपैकी अनेक आईबाबांनी आपल्या पाखरांना काहीना काही प्रॉमिस केलं होतं. मी लवकर येते मग आपण महालक्ष्मीचा प्रसाद घ्यायला जाऊ. आज माझी ड्यूटी लवकर संपणार आहे. मी येतोच. मग आपण गणपती पहायला जाऊ असं पक्कं प्रॉमिस त्यांनी आपल्या बाळांना केलं होतं. चिमुकल्यांनी आधीच म्हटलं होतं, आईबाबा तुम्ही फक्त प्रॉमिस करता. पण येत कधीच नाही. खाकीतल्या त्या आईबाबांनी आपल्या बाळांना समजावलंही की, तुला तर माहिती आहे, आमची ड्यूटी कशी आहे. बाळ म्हणाले, ठिक आहे पण आज नक्की या. नाहीतर मी बोलणार नाही. आईबाबांनी प्रॉमिस केलं अन् ते वर्दी घालून घराबाहेर पडले.

कही खुशी, यहा गम

इकडे बाइक अन् कारमध्ये महालक्ष्मी आणि गणपतीचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी लोक घराबाहेर पडले होते. ही सगळी मंडळी आपल्या ‘खुशी’मध्ये होती. पण अचानक आलेला पाऊस, त्यात व्हीआयपी मुव्हमेंट आणि ट्रॅफिक जाम यामुळं ड्युटीचे तास वाढले. जाममध्ये अडकलेले लोक 112 क्रमांकावर फोन करून मदत मागत होते. अनेक गल्ल्यांमध्ये लोकांनी कोणतीही परवानगी न घेता रस्ता बंद होईल अशा प्रकारे मंडप लावले होते. त्यामुळं बाइक अन् कारवाले या गल्लीतून त्या गल्लीत भटकत होते. सगळीकडे जाम लागला होता. पोलिस नियंत्रण कक्षातून वायरलेसवर मेसेजवर मेसेज येत होते. पोलिसांची नुसती धावपळ सुरू होती.

Parinay Fuke : गणरायाच्या आशीर्वादाने भाजपला मिळाले खरे ‘विघ्नहर्ता’

अशात काही लोक एसी कारमध्ये बसून व्हिडीओ काढत होते. बघा कसा जाम लागलाय. मुख्यमंत्र्यांच्या गावात ही स्थिती. उपमुख्यमंत्र्यांच्या गावात गैरसोय. क्रीडा मंत्र्यांच्या गावात पोलिस गायब. अजितदादांच्या पुण्यात चालायला रस्ताच नाही.. वगैरे वगैरे.. पण त्यांना या गोष्टीचा सोयीस्कर विसर पडला होता की, खाकी कामावर होती. एसी कारमध्ये बसून ते जेव्हा व्हिडीओ काढत होते, तेव्हा खाकी वर्दी घातलेले काही आईबाबा असेही होते, जे भर पावसात ड्यूटी करत होते. त्यांचा चिमुकला तिकडे डोळ्यात पाणी आणून होता. आईबाबा प्रॉमिस करूनही घरी आले नाही, म्हणून रुसला होता. रडून रडून झोपला होता. आईबाबा इकडे लोकांना ट्रॅफिक कोंडीतून बाहेर काढत होते, कारण त्यांना लोकांच्या आनंदावर विरजण पडू द्यायचे नव्हते.

गणेशोत्सव असो की ईद, होळी असो की दसरा-दिवाळी, लोकांचे एन्जॉयमेंट सुरू असते. क्रिकेट मॅचमध्ये भारताने विजय मिळविला की लोक रस्त्यांवर फटाके फोडून गर्दीत जल्लोष करतात. पण या साऱ्यांच्या खुशीसाठी ‘खाकी’ वर्दीतील प्रत्येक पोलिसवाला आपल्या चिमुकल्यांना ‘गम’ देत असतो. याचा सर्वांना सोयीस्करपणे विसर पडतो. पोलिस हे देखील माणूसच आहेत. त्यांनाही भावना आहेत. त्यांनाही कुटुंब आहे. त्यांनाही मुलंबाळं आहे, याचं भान कुणीच ठेवत नाही. उलट जरा काही झालं की दगडं फेकली जातात ती खाकीवरच. पण या खाकीच्या आतील मनाचा कोणीच विचार करत नसतो, जे हळवं असतं. आपल्या पिल्लांसाठी कळवळत असतं. या पोलिसांचं मनही समजून घेणं आता गरजेचं झालं आहे.

Jayashree Shelke : बुलढाणा पालिकेच्या प्रभाग रचनेत घोटाळ्याचा गंध

व्याप मोठा, बळ कमी

राज्यातच नव्हे तर देशात सर्वत्र शहरीकरण वाढत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिस दलाकडे मनुष्यबळ नाही. निम्मे पोलिस झेडप्लस आणि तशी सुरक्षा असलेल्या नेत्यांच्या सुरक्षेमध्ये अडकून पडले आहेत. काही नेते येतात. भडक आणि जातीवाचक भाषणं करून जातात. लोकांची डोकी भडकावतात. त्यानंतर सोयीस्करपणे राजकारण करून आलीशान कारमध्ये बसून निघून जातात. निस्तरत पोलिसांना बसावं लागतं. भडकावू भाषणांमुळं दंगली होतात. त्यात घर जळतं ते अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या गरीबाचं आणि जखमी होतो तो खाकीतील पोलिस. भडकावणारे मात्र घरी एसी लावून मस्त दारूच्या ग्लासमध्ये पेग मारत बसतात. लोकंही प्रत्येक गोष्टीचं खापर पोलिसांवर फोडून मोकळे होतात.

सगळेच पोलिस चांगले किंवा वाईट नसतात. काही चांगले असतात. काही वाईटही असतात. पण सरसकट सगळ्यांना एकाच कॅटॅगिरीत तोलता येत नाही. त्यामुळं आपल्या पिल्लांना दुसऱ्याच्या भरवश्यावर सोडून खाकीचं कर्तव्य निभावणाऱ्या अशा सगळ्या पोलिसांना एक सलाम नक्कीच केला पाहिजे. त्यांच्यामुळं देशाच्या आतील, राज्याच्या आतील व तुमच्या शहराच्या-गावाच्या आतील कायदा व सुव्यवस्था सुरळीत असते. सरकारनेही पोलिसांना एखाद्या गुराढोरांसारखं राबवून घेणं आता कमी केलं पाहिजे.

Harish Pimple : आपत्तीसमयी आमदार ठरले आधारस्तंभ

सरकारनंही बघावं

काही दिवसांपूर्वी नागपूर शहरात एक मंत्री आले होते. त्यांना झेडप्लस सुरक्षा आहे. ते मंत्री महोदय सकाळी साडेचार वाजता विमानानं नागपूरला आले. सकाळी साडेचार वाजता तशी कोणतीही ट्रॅफिक नसते. परंतु मंत्री जाणार म्हणून रात्री तीन वाजतापासून नागपूर पोलिस रस्त्यावर होते. अचानक मंत्री महोदयांना काही काम आलं. त्यामुळं ते साडेचारच्या फ्लाइटने गेलेच नाही. त्यांनी वेळ बदलली. साडेचार ऐवजी ते सहा वाजताच्या फ्लाइटने गेले. पण तीन वाजतापासून सकाळी सातपर्यंत पोलिस रस्त्यावर होते. त्याचे कारण म्हणजे मंत्र्यांनी टेकऑफ केल्यानंतर नियंत्रण कक्षाने बंदोबस्त विसर्जनचा ऑर्डर दिला नव्हता.

राज्यातील पोलिस मनुष्यबळ वाढविणं आता गरजेचं झालं आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसबळ असेल तर एखाद्या चित्रपटाप्रमाणे सगळं झालं गेल्यावर पोलिस येतात हे चित्र थांबेल. पोलिस ठाण्यांची, ट्रॅफिक विभागाची प्रचंड मोठी हद्दही छोटी छोटी करणं गरजेचं आहे. छोटी राज्यं लवकर विकास करतात असं अनेक नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळंच  देशातील अनेक राज्यांचे विभाजन करून नवीन राज्य स्थापन करण्यात आले. मग हा नियम पोलिस स्टेशन आणि ट्रॅफिक झोनच्या बाबतीत लागू नाही का? हा विचार व्हावा. असं झालं तर प्रचंड मोठी जागतिक क्रांती घडेल असं अजिबात नाही. पण खाकीतील आईबाबांची वाट पाहून पाहून आणि रडून रडून झोपणाऱ्या त्या पिल्लांचा हिरमुसलेपणा नक्कीच थांबेल. आपल्या पिल्लांना वेळ देता येत नाही म्हणून पोलिसांना होणारा त्रागा नक्कीच बंद होईल. त्यातून अनेकदा सामान्यांवर निघणारा पोलिसांचा रागही नक्कीच कमी होईल.

Congress : चंद्रपूरच्या निवडणुकीत खळबळजनक खुलासे

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!