महाराष्ट्र

Shambhuraj Desai : लाडक्या बहिणींना पर्यटनासाठी खास मेजवानी

MTDC Offer : महिना दिनानिमित्त सरकारकडून खास व्यवस्था

Post View : 27

Author

महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विभागाने महिलांसाठी खास भेट दिली आहे. MTDC रिसॉर्ट्समध्ये महिलांना 50 टक्के सवलत मिळणार असून, हा उपक्रम महिलांच्या सुरक्षित आणि आनंददायी प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी राबवला जात आहे.

आजकाल स्त्रिया अवकाशात झेप घेत आहेत, पायलट झाल्यात, वेगवेगळ्या बँकेच्या कंपन्यांचे सीईओपदी विराजमान आहेत. पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती आहेत, पण तरीही आतापर्यंत स्त्री जन्माची ही कहाणी सुखद व संपन्न झालेली नाही. तिच्या प्रवासात यशाची चमक आहे, पण अजूनही अनेक अडथळे पार करायचे आहेत. स्त्रिया म्हणजे संघर्ष, जिद्द आणि प्रेमाचा संगम. त्यांच्या कष्टांमुळे कुटुंब उभं राहतं, समाज घडतो आणि संपूर्ण जग पुढे सरकतं. जागतिक महिला दिन हा एक साधा दिवस नसून, महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे.

गेल्या काही दशकांत महिलांनी अनेक क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली आहे परंतु अजूनही अनेक अडथळे पार करण्याची गरज आहे. समान वेतन, सुरक्षित प्रवास, शिक्षणाच्या संधी, नेतृत्वाची भूमिका यांसारख्या मुद्द्यांवर सातत्याने काम करण्याची आवश्यकता आहे. या दिवसाचे खरे यश हे केवळ भाषणांमध्ये नाही, तर समाजाच्या मानसिकतेत झालेल्या सकारात्मक बदलांमध्ये आहे.

Gulabrao Patil : कालपर्यंत साहेब-साहेब करणारे, आज ‘बाप’ म्हणतायेत

स्पेशल ऑफर

आंतरराष्ट्रीय महिला दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि या खास दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) महिलांसाठी एक अभिनव उपक्रम जाहीर केला आहे. एक ते आठ मार्च या कालावधीत राज्यभरातील MTDC रिसॉर्ट्समध्ये महिलांना राहण्यासाठी 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या योजनेमुळे महिलांना पर्यटनाचा आनंद घेण्याची उत्तम संधी मिळणार आहे आणि त्याच वेळी राज्य सरकारच्या महिला-सशक्तीकरणाच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ मुंबईत करण्यात आला. या वेळी त्यांनी सांगितले की, मागील वर्षी हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला होता आणि महिलांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यंदाही हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या ‘एआय’ (AI) धोरणांतर्गत महिलांसाठी सुरक्षित, आनंददायी आणि सुलभ पर्यटनाच्या संकल्पनेला चालना दिली जात आहे.

Dhananjay Munde : भंडाऱ्याच्या वाल्मिक कराडचा काळा चिठ्ठा तयार

पर्यटन अधिक सुलभ

महिलांसाठी ही योजना केवळ एका आठवड्यापुरती मर्यादित न राहता, वर्षभरातील 22 अतिरिक्त दिवसांसाठीही लागू असेल. महिलांना एकूण 30 दिवस 50 टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे. संबंधित तारखा लवकरच MTDC अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जातील. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी स्पष्ट केले की ही योजना केवळ सवलतीपुरती मर्यादित नाही. महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि समावेशक पर्यटन स्थळे विकसित करण्याच्या व्यापक दृष्टिकोनाचा एक भाग देखील आहे. महिलांना पर्यटनात अधिक सहभाग घेण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांना स्वतंत्रपणे प्रवास करण्यास अनुकूल वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

महिला दिन हा केवळ साजरा करण्याचा दिवस नसून, तो महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक सशक्तीकरणावर भर देणारा क्षण आहे. पर्यटन हा महिलांसाठी आत्मविश्वास वाढवणारा आणि त्यांच्या क्षमतांना चालना देणारा घटक ठरू शकतो. अनेक महिला आता एकट्याने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत, तसेच महिला-मित्र पर्यटन स्थळांची मागणीही वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, MTDC महिलांसाठी सुरक्षित आणि आरामदायी पर्यटन अनुभव देण्यासाठी विविध सुविधा निर्माण करत आहे. यामध्ये महिलांसाठी खास निवास व्यवस्था, महिला गाईड्स आणि सुरक्षेसाठी विशेष उपाययोजनांचा समावेश आहे. यामुळे महिलांना पर्यटनाच्या माध्यमातून स्वतःचा शोध घेता येईल आणि नवीन ठिकाणे आत्मविश्वासाने पाहण्याची संधी मिळेल.

Mahavikas Aghadi : यंदाच्या होळीला महायुतीविरुद्ध शिमगा

लाडकी बहीण योजना

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या धोरणांवरही प्रकाश टाकला. त्यांनी लाडकी बहिण योजनेचा उल्लेख करत सांगितले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध धोरणे राबवली जात आहेत. महिलांना पर्यटनामध्ये अधिक मोठी भूमिका निभावता यावी यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

महिलांसाठी पर्यटनाच्या संधी निर्माण करण्याबरोबरच महाराष्ट्र शासन राज्यातील पर्यटन स्थळांवर महिलांसाठी सुरक्षित आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर भर देत आहे. पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी महिलांना गाईड, टूर ऑपरेटर आणि अन्य सेवांमध्ये संधी दिल्या जात आहेत.

Washim : हसन मुश्रीफ यांना GPS मध्ये वाट सापडली नाही

महाराष्ट्र आदर्श ठिकाण

संपूर्ण भारतात महिलांसाठी सुरक्षित आणि आकर्षक पर्यटन स्थळांच्या मागणीत वाढ होत आहे. महाराष्ट्र हे पर्यटकांसाठी नेहमीच एक लोकप्रिय ठिकाण राहिले आहे आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे आता हे ठिकाण महिलांसाठी आणखी सुरक्षित आणि सोयीस्कर बनत आहे.

कोकणचा सागरकिनारा, सह्याद्रीतील निसर्गरम्य डोंगररांगा, ऐतिहासिक किल्ले, वाईनरी टूर आणि शहरी पर्यटन यांसारख्या पर्यायांमुळे महाराष्ट्रातील पर्यटन वैविध्यपूर्ण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर महिलांना प्रवासाच्या नव्या संधी मिळाव्यात आणि त्या निर्भयपणे पर्यटनाचा आनंद घेऊ शकाव्यात, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग विशेष प्रयत्नशील आहे.

MTDC सवलतीमुळे महिलांना महाराष्ट्राच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद घेता येईल. महिलांनी याचा लाभ घेऊन पर्यटनाच्या माध्यमातून स्वतःला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करावा, कारण पर्यटन हा केवळ फिरण्याचा अनुभव नसून, तो आत्मशोधाचा आणि सशक्तीकरणाचा मार्गही असतो.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!