महाराष्ट्र

निवडणूक पराभवाच्या Congress नेते अजूनही धक्क्यात

महाराष्ट्रात Mahavikas Aghadi कोमातच

Author

लोकसभा निवडणुकीत यश आणि विधानसभेत अपयश अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे. पराभवाच्या धक्क्यातून अद्यापही काँग्रेस नेते सावरलेले दिसत नाहीत.

राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच महाविकास आघाडला झटका बसला. निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार अद्यापही सावरले नाहीत. निवडणूक प्रक्रियेत घोळ झाल्याची शंका विरोधक व्यक्त करीत आहेत. ईव्हीएमला घेऊन काँग्रेस नेत्यांच्या मनात आधीपासूनच शंका आहे. निवडणूक काळात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून हस्तक्षेप करण्यात आला, असा आरोप करून काँग्रेस करीत आहे. यासंदर्भात विदर्भातील आठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

काँग्रेस, महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत मोठा विजय प्राप्त केला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठी आशा होती. महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार, असा दावाही करण्यात येत होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांमार्फत अनेक दावे केले जात होते. परंतु विधानसभा निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला.

आघाडीचे केवळ 16 MLA

राज्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या फक्त 16 आमदारांना यश प्राप्त झाले. अनेक दिग्गज नेते पराभूत झालेत. पहिल्या निवडणुकीपासून कधीच पराभूत झाले नसलेले बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर यांचा देखील यात समावेश आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अनेक नेत्यांना निवडणुकीत घोळ झाल्याची शंका आहे. ईव्हीएमने निवडणूक घेण्यापूर्वी निवडणूक आयोगाने कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केली नाही. ईव्हीएमने निवडणूक घ्यायची असल्यास काही निकष देण्यात आले होते.

अकोल्यात केव्हाही Power Cut, लोकांनी फलकच लावले 

ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यासाठी नोटिफिकेशनसुद्धा निवडणूक आयोगाने काढले नाही. यासर्व बाबींची कारणे देखील आयोगाने स्पष्ट केली नाहीत. सर्व प्रक्रिया कायदेशीर कराव्या लागतात, असे याचिकाकर्ते काँग्रेस नेते प्रफुल गुडधे पाटील यांनी नमूद केले. पराभूत झालेल्या उमेदवारांनी निवडणुकीच्या निकालानंतर मागणी केली होती. परंतु सीसीटीव्ही फुटेज, फॉर्म नंबर 17 देण्यात आले नाहीत. पाच व्हीव्हीपॅटची फेरमोजणी करण्यास मान्यता आहे. अनेकांनी यासाठी पैसे भरले आहेत. मात्र व्हीव्हीपॅटची मोजणी देखील केली जात नाही. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती देणे बंधनकारक असताना देखील हक्क डावलल्या जात आहेत, असे प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून प्रफुल गुडधे पाटील निवडणूक लढले. दक्षिण नागपूरचे उमेदवार गिरीश पांडव, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, सुभाष धोटे, शेखर शेंडे, संतोष सिंह रावत, सतीश वारजूरकर यांनीही याचिका दाखल केली आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातील उमेदवारांनीही याचिका न्यायालयात दाखल केली आहे. निवडणूक रद्द करून पुन्हा मतदान घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणुकीला आव्हानसुद्धा देण्यात आले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!