महाराष्ट्र

विदर्भाचा Industrial नकाशा झपाट्याने बदलणार

 'ॲडव्हांटेज विदर्भ 2025'मुळे गुंतवणुकीचा पाऊस

Post View : 21

Author

हा नागपूर आणि संपूर्ण विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. 7 ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील कॅम्पसवर होणाऱ्या या मेगा इव्हेंटमध्ये किमान 50,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार होण्याची शक्यता आहे. या महोत्सवामुळे विदर्भाचा औद्योगिक नकाशा झपाट्याने बदलणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, नागपूर आणि गडचिरोली विभागातील पोलाद उद्योगात लक्षणीय गुंतवणूक होत आहे. या कार्यक्रमामुळे या प्रदेशातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनेक महत्त्वाचे गुंतवणूक करार अंतिम करण्यात येतील.

जिल्ह्यात विकासकामे गतिमान करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय 

गडचिरोलीतून सर्वाधिक Revenue येणार 

गडकरी यांनी यावेळी गडचिरोली जिल्ह्याचा उल्लेख केला. सध्या राज्यातील सर्वाधिक मागासलेला हा जिल्हा येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील सर्वोच्च महसूल देणारा जिल्हा बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय, दसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस प्लांटमध्ये येत्या दोन वर्षांत 26-27 फाल्कन बिझनेस जेट तयार होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

‘ॲडव्हांटेज विदर्भ 2025’ चे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विदर्भाला जागतिक औद्योगिक केंद्र बनवणे. या कार्यक्रमात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोरणकर्ते, गुंतवणूकदार, उद्योगपती, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. स्टार्टअप्सना चालना देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

शिक्षण, अक्षय ऊर्जा क्षेत्रांवर लक्ष

या मेगा इव्हेंटमध्ये पोलाद, खाणकाम, पर्यटन, बांबू, आयटी, लॉजिस्टिक, शिक्षण आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. विदर्भातील 300 हून अधिक स्टॉल्स प्रदर्शित होणार असून यामध्ये 100 MSME साठी राखीव असतील. आजपर्यंत 170 स्टॉल्स आधीच बुक करण्यात आले आहेत.

अपात्र महिलांनी Ladki Bahin Yojana लाभ सोडण्याचे आवाहन

कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महाउद्योग मंत्री उदय सामंत यांसारख्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. JSW समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल, लॉयड्स स्टीलचे एमडी बी प्रभाकरन, boAtचे अमन गुप्ता आणि प्रिस्टिन केअरचे वैभव कपूर यांसारखे उद्योगक्षेत्रातील दिग्गज देखील या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

विदर्भाच्या औद्योगिक भविष्याचा संकल्प

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी विदर्भातील वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातील उद्योजकांना या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी नागपूरला भारताची लॉजिस्टिक राजधानी बनवण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. अजनी रेल्वे स्थानकाचा विकास, सिंधी ड्राय पोर्ट, मिहानचा विस्तार, आणि मदर डेअरीचा 670 कोटी रुपयांचा प्रकल्प यांचा उल्लेख त्यांनी केला.

या कार्यक्रमाद्वारे विदर्भाला गुंतवणुकीचे पसंतीचे ठिकाण बनवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आयोजकांनी विदर्भातील उद्योगांना पुढे येण्याचे आणि या क्षेत्राला औद्योगिक उत्कृष्टतेचे केंद्र बनवण्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

उद्योग, रोजगार आणि विकासाचे स्वप्न

‘ॲडव्हांटेज विदर्भ 2025’ हा केवळ औद्योगिक महोत्सव नसून विदर्भाच्या सर्वांगीण विकासाचा आणि संधींचा उत्सव ठरणार आहे. यामुळे केवळ औद्योगिक गुंतवणूकच नव्हे, तर रोजगार निर्मिती आणि आर्थिक स्थैर्याचाही मोठा मार्ग खुला होईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!