महाराष्ट्र

Mallikarjun Reddy : विकास रखडला, नागपूरकर त्रस्त

Nagpur : रेड्डींची निवडणुकीसाठी ठाम भूमिका

Post View : 14

Author

नागपूरमध्ये अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक झालेल्या नाहीत, त्यामुळे नागरी प्रशासन ठप्प झाले आहे. माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी त्वरित निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.

नागपूर आणि महाराष्ट्रातील प्रशासकीय व्यवस्था सक्षम करण्यासाठी तसेच नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी सरकारकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तत्काळ घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडणूकीचा तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.

नागपूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांचे अस्तित्व नाही. त्यामुळे नागरी प्रशासन ठप्प झाले असताना विकासकामांमध्ये मोठा खोळंबा होत आहे. महापालिका, नगर परिषद, ग्रामपंचायती यांसारख्या संस्थांच्या अनुपस्थितीमुळे नागरी सुविधांचा अभाव जाणवत आहे. नागरिकांना त्यांच्या हक्कांच्या सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, असे मल्लिकार्जुन रेड्डी यांनी ठामपणे सांगितले.

Shiv Sena : पाच वर्षानंतर पुन्हा वाढल्या आदित्य ठाकरेंच्या अडचणी

मजबूत लोकशाही अनिवार्य

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना थेट प्रशासनाशी संवाद साधता येतो आणि त्यांचे प्रश्न जलदगतीने सोडवले जातात. मात्र, निवडणूक न झाल्यामुळे नागपूरकरांना प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेत आपला सहभाग नोंदविता येत नाही. विकास प्रकल्प रखडले आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागपूरकरांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी यावर ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लांबणीवर टाकल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यामुळे लोकशाहीचा गाभा दुर्बल होतो आणि नागरी सुविधांचा अभाव अधिक गंभीर बनतो.

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि नागपूरच्या विकासाच्या दृष्टीने त्वरित निवडणूक होणे गरजेचे आहे. नागपूर हे औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे शहर असून, येथे सुशासन आणि स्थिर प्रशासन आवश्यक आहे. माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी स्पष्टपणे सांगितले की, लोकप्रतिनिधींची निवडणूक झाली तरच नागपूरच्या विकासाला गती मिळेल आणि प्रशासन लोकाभिमुख होईल. या मागणीमुळे नागपूरमधील राजकीय हालचाली वेगवान झाल्या आहेत. नागपूरकरांच्या हितासाठी आणि विकासाच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लवकरात लवकर घ्याव्यात, यासाठी रेड्डी यांनी सरकारवर दबाव टाकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रशासनाला लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि नागपूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

Parinay Fuke : एमआयडीसीतील प्लॉट बळकावणाऱ्यांविरुद्ध एल्गार 

प्रश्न अनूत्तरित

गेल्या काही वर्षांत नागपूर आणि परिसरातील नागरी समस्या अधिकच वाढल्या आहेत. नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी वारंवार सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. प्रशासनात जबाबदार लोकप्रतिनिधी नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्यात अडथळे येत आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. जर निवडणूक त्वरित झाल्या नाहीत, तर नागपूरकरांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले जाईल, हे सरकारने लक्षात ठेवावे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्यास उशीर झाल्यास नागपूरच्या विकासावर विपरीत परिणाम होईल. नागरी सुविधांची व्यवस्था अधिकच ढासळेल आणि नागरिकांच्या अडचणी अधिक वाढतील. डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी सरकारला तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली आहे. नागपूरकरांच्या हितासाठी हा मुद्दा ते पुढे नेणार आहेत. या मागणीला नागपूरमधील नागरिक आणि सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत आहेत. नागपूरच्या भविष्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून, सरकारने यात दिरंगाई न करता लोकशाहीला बळकटी देण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, अशी जनतेची अपेक्षा आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!