
कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आता बरेच दिवस झाले आहेत. सरकार स्थापनेनंतर दोन अधिवेशन देखील पार पडले आहेत. त्यानंतरही अनेक मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही.
आवडते खाते न मिळाल्याने महायुती मधील अनेक मंत्री नाराज झाले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. नाराज असलेल्या या मंत्र्यांनी अद्यापही आपला पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे अद्यापही मंत्रालयातील कामकाज पाहिजे त्या पद्धतीने सुरू झालेले नाही. शिवसेनाप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गृह विभाग पाहिजे होता. मात्र अद्यापही भाजपने त्यांना नकारच कळवला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पाहिजे त्या ताकदीने मंत्रालयात दिसत नाहीत.
शिवसेनेमधील आणखीन एक मंत्री दादा भुसे हे देखील नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी देखील परभार स्वीकारलेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर अद्यापही 17 मंत्र्यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे सरकारचे कामकाज पूर्ण प्रभावीपणे सुरू झालेले नाही. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारला आहे. सर्वाधिक नाराजी शिवसेनेच्या गटात दिसत आहे.

विभागणी करून Responsibility
महायुती सरकारमध्ये अनेक विभागांना दोन मंत्र्यांकडे देण्यात आले आहे. त्यामुळे एकाच विभागातील अधिकाऱ्यांना दोन मंत्र्यांचे मन जपावे लागणार आहे. या सर्व परिस्थितीत 17 मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नसल्याने सरकारचे कामकाज कसे चालणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक मंत्री सध्या पदभार स्वीकारण्यासाठी चांगल्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत. काही मंत्री नवीन वर्षामध्ये पदभार स्वीकारतील असे दिसत आहे. सध्या शाळांना ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील अनेक नागरिकांसह सध्या मंत्री देखील ‘व्हेकेशन मूड’मध्ये आहेत.
ख्रिसमसच्या सुट्ट्या संपल्यानंतर नवीन वर्षात मंत्री पदभार स्वीकारतील असे दिसत आहे. मात्र यापैकी नाराज असलेले मंत्री आपापल्या खात्यांचा पदभार घेणार की नाही? याबद्दल अद्यापही संभ्रम आहे. मुख्यमंत्री न केल्याने एकनाथ शिंदे अद्यापही नाराज आहेत. नागपुरातील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर ते सुटीसाठी सातारा या गावी गेले होते. यानंतर, नुकतीच त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे संपूर्ण कुटुंबासह सुट्टीच्या मूडमध्ये आहेत.
एकनाथ शिंदे यांना नवीन महायुती सरकार मध्ये उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम, हे विभाग देण्यात आले आहेत. मात्र त्यांची नाराजी अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कॅबिनेटमंत्री दत्तात्रय भरणे हेही आवडते खाते न मिळाल्याने नाराज आहेत.त्यांना नव्या सरकारमध्ये क्रीडामंत्री करण्यात आले आहे. त्यामुळे ते देखील किती प्रभावीपणे काम करतील याबद्दल शंका आहे.