मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना, शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील शाब्दिक चकमकीने राजकीय वातावरण तापले आहे.
महाराष्ट्रातील राजकीय आकाश मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने ढगाळले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वादाने वातावरण तापले आहे. मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाने राज्यातील सामाजिक आणि राजकीय चर्चेला नवे वळण दिले आहे. शरद पवारांनी राष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक बदलाची आवश्यकता स्पष्ट केली. तसेच केंद्र सरकारला जबाबदारीची आठवण करून दिली, तर अजित पवारांनी या सूचनांना प्रत्युत्तर देत शरद पवारांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करून सूचक शब्दांत प्रतिक्रिया नोंदवली. या वादाने काका-पुतण्यांमधील जुने नाते आता राजकीय वैराच्या जाळ्यात अडकले असल्याचे चित्र उभे राहिले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी केंद्राने नियमांमध्ये बदल घडवावा, अशी शरद पवारांची भूमिका स्पष्ट झाली. ज्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढला. अजित पवारांनी मात्र या सूचनांना प्रत्युत्तर देत शरद पवारांच्या मागील सत्ताकाळातील कामगिरीचा संदर्भ देत, त्यांच्या अनुभवाला आदर दाखवतानाही खोलात जाण्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला. या शाब्दिक चकमकीमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा केवळ सामाजिक न राहता, राजकीय पक्षांतर्गत संघर्षात रूपांतरित झाला आहे. राज्यातील निवडणूक हवामानावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Ravikant Tupkar : ‘दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई’ मलकापूरात पेटली
मुख्यमंत्री एकाकी नाहीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत एकटे पडल्याच्या चर्चांना अजित पवारांनी तात्काळ खोडून काढले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी आणि स्वतः पुण्यात असल्याने उद्भवलेल्या या अफवांना प्रत्युत्तर देत, अजित पवारांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकटे पडलेले नाहीत. स्वतः काल मुंबईत होते. उद्या पुन्हा तिथे जाणार असल्याचे नमूद करत, सरकारची एकजूट दाखवली. या स्पष्टीकरणाने महायुती सरकारमधील आंतरिक सामंजस्यावर विश्वास निर्माण झाला.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना अजित पवारांनी लोकशाही मूल्यांचा उल्लेख करत, उषोषणाला बसणाऱ्यांना मत मांडण्याचा संवैधानिक अधिकार असल्याचे सांगितले. राज्य सरकार वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे नमूद केले. राज्याच्या निर्मितीनंतरच्या अनुभवावरून चर्चेनेच प्रत्येक समस्या सोडवता येते, अशी आशावादी भूमिका घेत, आरक्षणाच्या मुद्द्यावर संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्याची वकिली केली. या दृष्टिकोनाने मराठा समाजाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्याचा संकेत मिळाला. ज्यामुळे सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.
IPS Archit Chandak : बाप्पाच्या उत्सवात ‘प्रहार’ने केले गोवंश तस्करांचे ‘विसर्जन’
