अकोट तालुक्यातील ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार रणधीर सावरकर यांनी त्वरित हस्तक्षेप करून प्रशासनाला पंचनाम्याचे निर्देश दिले.
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सध्या पावसाचे संकट मोठे ठरले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. विदर्भात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अकोट तालुक्यातील देवरी, पाठसूल आणि आलेवाडी परिसरात ढगफुटीसारखा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. ही माहिती मिळताच भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी तात्काळ संकटाची दखल घेतली आहे. आमदार रणधीर सावरकर यांनी प्रशासनाला तत्काळ सूचना दिल्या आणि नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याचे आदेश दिले.
शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. त्यांच्या हितासाठी प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, असे आमदार सावरकर यांनी या प्रसंगी स्पष्ट केले. अकोट तालुक्यातील महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी अढाऊ, तलाठी केळकर आणि कृषी सहाय्यक साबळे यांनी चिखलात रुतून प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानाचे पंचनामे तयार केले आहे. प्रशासनाने सांगितले की, पुन्हा एकदा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शेत पाहणी करून योग्य ती मदत शासनाच्या माध्यमातून दिली जाईल. आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे नेहमीच संवेदनशील दृष्टिकोन ठेवला आहे.
Parinay Fuke : स्वातंत्र्य दिनी नशेच्या सावटावर आमदाराचा प्रहार
पंचनाम्याचे त्वरित आदेश
संकटाच्या त्वरित निवारणासाठी त्यांनी प्रशासनासोबत सतत संपर्क ठेवून, नुकसानग्रस्त भागात त्वरित पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यांच्या या कृतीमुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे आणि प्रशासनाचे कामकाज जलद गतीने सुरू राहिले आहे. छावा संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आणि उपजिल्हा अध्यक्ष यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, शेतकरी संकटात असताना आमदार रणधीर भाऊ सावरकर आणि प्रशासन यांनी वेळेवर लक्ष दिले, ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे हे नेते आहेत.
रणधीर सावरकर हे शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच पुढाकार घेत आले आहेत. गेल्या वर्षीदेखील विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी त्यांनी तात्काळ मदतीसाठी प्रशासनाशी संपर्क साधला होता. तसेच, त्यांनी शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मार्गदर्शन व आर्थिक मदतीच्या योजना राबवल्या आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी रणधीर सावरकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये विश्वास वाढला असून, प्रशासन आणि स्थानिक नेत्यांच्या समन्वयातून शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळेल, असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
Akola Congress : ‘मत चोर, कुर्सी सोड’चा नारा पश्चिम विदर्भातही गाजला
