प्रशासन

Amravati : गुप्त माहितीच्या आधारे एमडीची तस्करी उघड

Special Police Team : तीन जण गजाआड, लाखांचा मुद्देमाल जप्त

Author

अमरावतीत पोलिसांनी बडनेरा-अकोला मार्गावर एमडी आणि इतर अमली पदार्थांच्या तस्करीवर मोठी कारवाई केली.

अमरावती शहरात अमली पदार्थांची तस्करी दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन तस्करांना अटक केली आहे. बडनेरा-अकोला मार्गावर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 40.34 ग्रॅम एमडीसह कार, तीन मोबाइल आणि वजन काटा असा तब्बल 8 लाख 32 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बडनेरा शहरातील तीन आरोपी मुंबईहून कारद्वारे अमरावतीत एमडी ड्रग्स विक्रीसाठी आणत होते.

पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर, अमरावती पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने सापळा रचून कारचा पाठलाग केला आणि तिघांना अटक केली. त्यांची नावे अब्दुल एजाज अब्दुल अजीम, शाहरुख खान बिसमिल्ला खान, आणि अविनाश मनोज खांडेकर अशी आहेत. पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. मुंबईवरून अमरावतीत एमडीची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या आरोग्यक्रांतीला नवी दिशा 

पोलिसांची धडक कारवाई

विशेष पथकाने यानंतर बडनेरा-अकोला मार्गावर सापळा रचला आणि संशयास्पद कार (क्रमांक एमएच 27 बीझेड 2011) अडवली. कारमध्ये आरोपी बसलेले होते. झडती घेतल्यावर पोलिसांना तब्बल 40.34 ग्रॅम एमडी सापडले. तिन्ही आरोपींना घटनास्थळीच अटक करून त्यांच्याकडून अमली पदार्थ, कार, मोबाइल आणि वजन काटा असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. बडनेरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांची ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक तुषार गावंडे, युसूफ सौदागर, छोटेलाल यादव, रणजित गावंडे, निखिल माहुरे, आशिष डवले, निवृत्ती काकड, संजय भारसाकडे, अमोल मनोहर, नईम बेग आणि गजानन सातंगे यांच्या विशेष पथकाने केली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी एमडीची तस्करी रोखण्यात यश आले आहे.

Girish Joshi : डास चावतात म्हणून मनपा आयुक्तांच्या अंगणात झोपणार

युवकांसाठी धोक्याची घंटा

अमली पदार्थ तस्करीच्या या घटनांमुळे पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. दारू आणि सिगारेटसारख्या व्यसनांपासून मुलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकांसाठी अमली पदार्थांचे वाढते प्रमाण धोक्याची घंटा ठरत आहे. वैद्यकीय चाचणी लक्षात घेता, अमली पदार्थांमुळे शरीराची क्रिया मंदावते किंवा अति प्रमाणात उत्तेजित होते. मज्जासंस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होतो. काही अमली पदार्थ उदासीनता निर्माण करतात, काही गुंगी आणतात, तर काहींमुळे संभ्रमावस्था निर्माण होते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!