महाराष्ट्र

महसूल मंत्र्यांच्या आदेशानंतर Nagpur प्रशासन कामावर

ड्रोनव्दारे ठेवणार Sand Mafiya वर नजर

Post View : 43

Author

राज्यातील वाळू माफियांविरोधात मोहिम सुरू करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. त्याची सुरूवात आता नागपुरातून झाली आहे.

वाळू माफियांवर लगाम कसण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. त्यानंतर यासंदर्भातील मोहिमेची सुरुवात आता नागपुरातून झाली आहे. नागपूर महसूल विभागातील वाळू चोरी रोखण्यासाठी आता प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सरकारनं दिलेल्या आदेशांचं काटेकोरपणं पालन करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

अवैध वाळू व गौण खनिजाच्या उत्खननावर आळा घालण्यासाठी आता नागपूर महसूल विभागात मोहिम राबविण्यात येणार आहे. चोरी करणाऱ्या दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कारवाई व्हावी यादृष्टीनं जिल्ह्यातील वाळूघाट व खदानींवर ड्रोनद्वारे पाळत ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले. वाळूघाट व गौण खनिज संदर्भात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड आदी उपस्थित होते.

गैरप्रकाराचा आरोप असलेल्या Puja Khedkar हिला दिलासा

सर्वांना चोख आदेश

वाळू आणि गौण खनीज चोरी ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. यासाठी पूर्व विदर्भातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना निर्देश देण्यात आले आहे. वाळू चोरी पकडण्यासाठी जाणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आता पोलिसांचं संरक्षण देखील मिळणार आहे. यासंदर्भातील आदेश महानिरीक्षक भुजबळ यांनी पोलिसांना दिले. नागपूरसह पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणावर वाळू घाट आहेत. सा वाळू घाटांच्या प्रत्यक्ष जागेवरील फुटेज हाती लागल्यामुळे गुन्हेगारांवर आरोप सिद्ध करण्यास मदत होणार आहे.

गुन्हा सिद्ध करण्यासह कारवाईतील पारदर्शकता वाढविण्यात येणार आहे. याच बरोबर सरकारच्या कारवाई पथकाला सुरक्षित करण्यासाठी ड्रोन आणि पोलिसांची मदत होणार आहे. अधिकाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं प्रगत सेन्सर आणि कॅमेऱ्यांनी सुसज्ज ड्रोनद्वारे वापरण्यात येणार आहे. वाळू चोरी पकडण्यासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांवर माफिया बरेचदा हल्ला करतात. त्यामुळं यापुढं संयुक्त पथक कारवाई करेल, असं ठरविण्यात आलं आहे.

मनुष्यबळाच्या सहाय्याने तपासणीसाठी लागणारा वेळ लागतो. त्याबदल्यात ड्रोन तंत्रज्ञानातून मोठ्या क्षेत्राची एकाच वेळी अचूक पाहणी करता येते. यात अचूकता असल्यानं संबंधित गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल, असे बैठकीत सांगण्यात आलं. नगापूर जिल्ह्यामध्ये सद्य:स्थितीत 40 वाळूघाट आहेत. या घाटावरुन यापुढे वाळूची तस्करी रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळेल. वाळू घाटासमवेत अवैध खनिज उत्खननाला मोठ्या प्रमाणात आळा घालता येईल, असा विश्वास विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी व्यक्त केला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!